

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण
तुळ
भाग्यवर्धक कालावधी
तुळ राशीमध्ये चित्रा स्वाती व विशाखा ही नक्षत्रे येतात. चित्रा नक्षत्राचा आराध्य वृक्ष बेल हा आहे. बेलचे खूप औषधी गुणधर्म आहेतच शिवाय त्याला अध्यात्मिकही महत्त्व आहे. बेल हा शंकराला अतिशय प्रिय आहे बेलाच्या पंचांगाची म्हणजेच पान, साल, फळ, मूळ, जवळ बाळगल्यास त्या व्यक्तीची सकारात्मकता वाढते व प्रगती होते. स्वाती नक्षत्राचा आराध्य वृक्ष अर्जुन आहे. अर्जुन वृक्षाचे औषधी गुणधर्म आहेत. अर्जुन साल किंवा सादडा असेही या वृक्षाला म्हणतात. अर्जुन साल बहुउपयोगी आहे. या झाडाचे पंचांग म्हणजे पान, फळ, साल, मूळ या नक्षत्राच्या व्यक्तींनी जवळ बाळगल्यास त्यांच्या सकारात्मकतेमध्ये वृद्धी होऊन प्रगती होते. विशाखा नक्षत्राचा आराध्य वृक्ष नाग केशर आहे. या नागकेशराचा औषधी उपयोगही आहे. धातु पृष्ठ होण्यासाठी व कर्करोगावर याचा उपयोग होतो, अर्थातच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचा उपयोग करू नये. या वृक्षाचे पंचांग पान, फूल, फळ, साल, मूळ जर जातकाने जवळ बाळगल्यास या नक्षत्रातील व्यक्तींना सकारात्मकता प्राप्त होते व सर्वत्र प्रगती होते
शिक्षण : शिक्षण क्षेत्रासाठी अनुकूल ग्रहमान आहे. चांगले योग्य दिशेने प्रयत्न केल्यास घवघवीत यश प्राप्त करू शकाल. स्पर्धा परीक्षेमध्ये अपेक्षित यश साध्य होऊ शकते. परदेशी शिक्षणासाठीही अनुकूल कालावधी आहे. कला व क्रीडा क्षेत्रात विशेष प्राप्त करू शकाल. एकूणच अनुकूलता मिळेल. यश मिळेल, स्वतःचे प्रयत्न कमी पडू देऊ नका. जातकांनाही अनुकूल कालावधी आहे. परदेशासंबंधी शिक्षणासाठी चांगले योग आहेत.
पारिवारिक : काही वेळेस आपल्याला आपल्या परिवारातील जास्त काम करावे लागण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारावे लागतील. विशेषतः मुला-मुलींच्या मागण्या वाढतील. त्यामुळे खर्चातही वाढ होऊ शकते. घरात गैरसमज किंवा मतभेद असल्यास योग्य संवादाने ते सुटतील. आर्थिक बाब चांगली राहिलेली असल्यामुळे वाढत्या खर्चाचे काहीही वाटणार नाही. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घेणे हितकारक ठरेल.
नोकरी-व्यापार-व्यवसाय : बदलत्या ग्रहमानाच्या पार्श्वभूमीवर सदरचा कालावधी आपल्यासाठी अनुकूलता घेऊन येत आहे. थोडक्यात या कालावधीमध्ये आपली इच्छापूर्ती होईल. ज्या जातकांनी आपल्या घराचे स्वप्न बघितले आहे त्यांचे स्वप्न पूर्ण होईल. त्याचप्रमाणे नवीन वाहन खरेदी करता येईल. आर्थिक परिस्थिती बळकट होईल. दीर्घकाळ रखडलेली कामे सहजी होताना बघून आश्चर्य वाटेल. सरकारी कामे होतील. जमीनजुमला, स्थायी संपत्ती खरेदी करू शकाल, त्याचप्रमाणे या क्षेत्रातील दीर्घकाळ रखडलेले व्यवहार गतिशील होतील. त्यातून भरघोस आर्थिक फायदा होऊ शकतो. चालू नोकरीमध्ये बदल करायचा विचार असल्यास त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केल्यास ते सफल होतील. बेरोजगारांना रोजगार मिळेल. कुटुंबातील तरुण- तरुणींचे नोकरीविषयक प्रश्न सुटतील. जीवनातील आत्मविश्वास वाढेल, मात्र पती-पत्नींनी वैवाहिक गैरसमज टाळणे गरजेचे आहे.
शुभ दिनांक : १, ७, १५, १६, २६, २७, २८, २९, ३०, ३१
अशुभ दिनांक : २, ३, ४, १०, ११, १७, १८, २२, २३वृश्चिक
वृश्चिक
वादविवाद टाळणे महत्त्वाचे ठरेल
वृश्चिक राशीमध्ये विशाखा, अनुराधा व ज्येष्ठा यातील नक्षत्रांचा समावेश होतो. विशाखा नक्षत्राचा आराध्य वृक्ष नागकेशर आहे. नागकेशर हे धातुपुष्ट होण्यासाठी व कर्करोग तसेच हाडांचे विकार यावर उपयोगी पडतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने याचा आपण योग्य तो उपयोग करू शकतो व योग्य त्यावेळेस करू शकतो. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तीने नागकेशर या वृक्षाचे पंचांग म्हणजेच पान, फळ, फूल, साल, मूळ जवळ बाळगल्यास त्यांच्यात सकारात्मक वृद्धी होऊन प्रगती होते. अनुराधा नक्षत्राचा आराध्य वृक्षही नागकेशरच आहे. त्यामुळे अनुराधा नक्षत्राच्या जातकांनी या वृक्षाचे पंचांग म्हणजेच पान, फळ, फूल, साल व मूळ हे जवळ बाळगल्यास त्याचा फायदा होतो. ज्येष्ठा नक्षत्राचा आराध्य वृक्ष सांबर आहे. त्याला शाल्मली वृक्ष सुद्धा म्हणतात तसेच दुसरे नाव काटेसांबर असेही आहे. या झाडाला डिंक असतो. ते झाड व डिंक औषधी गुणांनी युक्त आहे. या झाडाचे पान, फळ, फूल, साल जवळ ठेवल्याने या नक्षत्राच्या व्यक्तींची प्रगती होऊन सकारात्मकता मिळते. हे झाड पित्तनाशक आहे.
शिक्षण : शिक्षणासाठी ग्रहमान मिश्र स्वरूपाचे आहे. त्यामुळे अधिक प्रयत्न करायला हवे, तसेच ते प्रयत्न योग्य दिशेने होणे महत्त्वाचे ठरेल. इतर गोष्टींकडे कमी लक्ष देऊन अभ्यासाकडे जास्त लक्ष केंद्रित करणे आवश्यक ठरणार आहे. त्याचप्रमाणे प्रयत्नांवर सातत्याने भर द्यावा लागणार आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा आपणास अपेक्षित यश प्राप्त करता येईल. प्रयत्नांना चांगले यश येईल. कला व क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. परदेशातील शिक्षणासाठी अनुकूलता मिळत राहील.
पारिवारिक : कुटुंबातील वातावरण चांगले ठेवण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्नाची आवश्यकता आहे. आपल्याला आर्थिक बाबतीत चांगले परिणाम मिळणार आहेत. त्यामुळे आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबातील वाद वगैरे समज दूर करण्यासाठी प्रयत्न यशस्वी होतील. सहकुटुंब प्रवासाची शक्यता आहे. त्यातून आपणास आनंद मिळेल. घरातील वातावरण समाधानकारक राहणार आहे. त्यामुळे आनंदी आणि उत्साही वातावरण राहील.
नोकरी-व्यापार-व्यवसाय : आपल्या दैनंदिन जीवनात अथवा आपल्या दिनचर्येमध्ये परिवर्तनाची शक्यता. आपल्या उत्पन्नात वृद्धी होऊन आर्थिक स्थिती भक्कम होईल. मात्र काहींना चढउतार जाणवेल. कार्यक्षेत्रात जास्तीचे काम करावयास लागेल. त्याचबरोबर आपल्या कार्यक्षेत्रात तसेच आपल्या कुटुंबात वादविवाद टाळणे महत्त्वाचे ठरेल. महिन्याच्या पूर्वार्धामध्ये आपल्या मनासारखी कामे होतील. कुटुंबातून तसेच आपल्या कार्यक्षेत्रातून सर्वांचे सहकार्य राहील खासगी क्षेत्रात कार्य करण्याऱ्या जातकांना कामाचा ताण वाढल्यामुळे स्वभाव चिडखोरपणा येऊ शकतो. गुंतवणुकीच्या बाबतीत, नवीन गुंतवणूक नको. तरीही करावयाची असल्यास तज्ज्ञ व्यक्तींची मदत घ्या. आपली चालू नोकरी बदलण्याचा मनस्थितीत असतील तर अशा जातकांनी अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. निराश होऊ नका.
शुभ दिनांक : १, ५, १५, १९, २०, २४, २७, २८, २९, ३०, ३१
अशुभ दिनांक : २, ३, ४, १०, ११, १७, १८, २२, २३