ऑक्टोबर महिना कसा जाईल? बघा मिथुन आणि कर्क राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे ऑक्टोबर महिना? जाणून घ्या...
ऑक्टोबर महिना कसा जाईल? बघा मिथुन आणि कर्क राशीचे भविष्य
Published on: 

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण

मिथुन

भाग्यबीजे पेरली जातील

मिथुन राशीवर बुध या ग्रहाचे कारकत्व आहे. त्यामुळे मिथुन राशी बुधाची रास म्हणून ओळखली जाते. मिथुन राशीच्या जातकांमध्ये बुधाचे गुणधर्म आहेत. मिथुन राशींच्या जातकांमध्ये निर्णय क्षमता कधी कधी कमी पडू शकते. मिथुन रास ही द्विस्वभाव राशी आहे. या राशीत स्वभावात एक प्रकारची दुटप्पी वागणूक दिसून येते. बोलणे व वागणे यामध्ये फरक होऊ शकतो. त्याचप्रमाणे काही वेळेस धरसोडवृत्ती असू शकते. यांच्या कोणत्याही कामांमध्ये अडचणी येऊन ते काम अर्धवट राहू शकते. कोणत्याही विषयांमध्ये सखोल ज्ञान असत नाही. अनेक विषयांमध्ये थोडे थोडे ज्ञान असते, म्हणून मिथुन राशीच्या व्यक्ती कोणत्याही विषयावर बोलू शकतात.

शिक्षण : मिथुन राशीच्या जातकांना चालू कालावधी शिक्षणासाठी अनुकूल काळ आहे. शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही शाखेमध्ये शिक्षण घेऊ शकतात. कोणत्याही शैक्षणिक क्षेत्रात त्यांना चांगले यश मिळू शकते. कला व क्रीडा क्षेत्रात सुद्धा चांगले यश मिळेल. स्पर्धा परीक्षेतही स्पर्धात्मक यश सदरील काळात मिळू शकते. परदेशासंबंधी शिक्षणामध्ये यश प्राप्त करण्याकरता यांना थोडे अधिक परिश्रम घ्यावे लागतील. योग्य दिशेने प्रयत्न केल्यास त्यामध्ये सफलता प्राप्त होईल व यश मिळू शकते.

पारिवारिक : या महिन्यातील ग्रहमान प्रत्येक सर्व क्षेत्रासाठी अनुकूल असल्यामुळे मिथुन राशीच्या जातकांना सतत यशाची परंपरा अनुभवण्यास मिळेल. सहकुटुंब प्रवासाचे योग आहेत. त्याचप्रमाणे कुटुंबातील तरुण-तरुणींचे नोकरीविषयक प्रश्न सुटतील. विवाहयोग्य तरुण-तरुणांचे विवाह जमतील. काहींचे ओळखीतून विवाह ठरतील, प्रेमविवाह होतील. व्यवसाय, धंद्यातील भागीदारीचे प्रश्न असल्यास ते सुटतील. स्वतंत्र व्यवसाय असल्यास स्वतंत्र व्यावसायिकांची भाग्यबीजे पेरली जातील. विद्यार्थी- विद्यार्थिनींना आपापल्या आवडत्या क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळू शकते. फक्त कुसंगतीपासून दूर राहा, तसेच व्यसनांपासून अलिप्त राहा.

नोकरी, व्यवसाय व धंदा : हा महिना सर्वसाधारणपणे ठिकठाक राहील. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. हरहुन्नरी व्यक्तींना मोठा उत्साहवर्धक पूर्वार्ध राहील. कलाकारांना तसेच बुद्धिजिवी व्यक्तींना मानसन्मान मिळेल. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. प्रसिद्धीसह आर्थिक परिस्थितीमध्ये प्रगती होईल. नोकरीमध्ये विशिष्ट जबाबदारी स्वीकारावी लागेल. जास्तीचे काम करावे लागेल. काही महत्त्वाची आव्हाने समोर उभी राहतील, पण ती आव्हाने आपण एक संधी म्हणून स्वीकारा. त्याचा आपल्याला भविष्यात निश्चितच फायदा होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळत राहील. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करू शकाल, मात्र खर्चाचे प्रमाण जास्त राहील. कुटुंबात शुभ वार्ता मिळतील. विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. काहींचे परिचय उत्तर विवाह ठरतील. त्याचप्रमाणे शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलीकडून त्यांच्या प्रगतीपर वार्ता कानी येतील. कुटुंबात होणारे पाहुण्यांचे आगमन आश्चर्यचकित करेल.

शुभ दिनांक : 4,7,12,16,20,21,26

अशुभ दिनांक : 2,8,9,10,11,13,15,17, 27

ऑक्टोबर महिना कसा जाईल? बघा मिथुन आणि कर्क राशीचे भविष्य
आजचे राशिभविष्य, २ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

कर्क

पूर्व संचितातून लाभ

कर्क राशीवर चंद्र या ग्रहाचे पूर्णपणे वर्चस्व असते. त्यामुळे चंद्राच्या अंगी जे जे गुण आहेत ते सर्व या राशीच्या जातकांमध्ये बघण्यास मिळतात. त्याचप्रमाणे कर्क राशी ही चर रास आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांच्या स्वभावात चंचलता व स्थिरता हे प्रामुख्याने गुण आढळतात, पण स्वतःच्या मनाच्या निग्रहावर हे अवगुण दूर करू शकतात. कर्क राशीच्या व्यक्तींना हिंडणे-फिरणे फार आवडते. त्याचप्रमाणे प्रवास करण्यास उत्सुक असतात. स्वतःच्या वापरत असलेल्या वस्तू, वाहन, कपडे इत्यादी बदलण्याची आवड असते. घरातील वस्तूंची सुद्धा रचना वारंवार बदलण्याची सवय असते. ही रास जलरास आहे. कर्क राशीच्या व्यक्ती जास्त भावनाशील आढळतात.

शिक्षण : शिक्षणासाठी अतिशय अनुकूल ग्रहमान असल्यामुळे आपण कमी कष्टामध्ये जास्त यश मिळवू शकाल, परंतु आपले प्रयत्न योग्य दिशेने होणे गरजेचे ठरेल. अभ्यास चांगला होईल, शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही शाखेमध्ये चांगले यश संपादित करू शकाल, कला व क्रीडा क्षेत्रातही अपेक्षित यश मिळू शकते. परदेशासंबंधीच्या शिक्षणात चांगल्या संधी उपलब्ध होतील. स्पर्धा परीक्षेत चांगले यश मिळेल. उपलब्ध अनुकूल ग्रहणाचा फायदा घेऊन आपण यश मिळवू शकता.

पारिवारिक : या कालावधीत सुरुवातीपासूनच अनुकूल असल्याचे जाणवू शकेल. कमी कष्टामध्ये अथवा कमी परिश्रमामध्ये कामे होत असलेली पाहून आश्चर्य वाटेल. एक सकारात्मक वातावरणाचा लाभ मिळू शकतो. आपल्या सभोवती शुभलक्षणी घटना घटीत होण्याची शक्यता आहे. कुटुंबामध्ये शुभ वार्ता मिळू शकतात तसेच कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न अथवा समस्या संपुष्टात येतील. चालू नोकरीमध्ये परिस्थितीजन्य लाभ मिळतील. पूर्वी दिलेल्या एखाद्या नोकरीविषयक मुलाखतीमधून नोकरीसाठी बोलावणे येऊ शकते, तसेच विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरू शकतात. काहींचे ओळखीतून विवाह ठरतील. चालू नोकरीमध्ये नवीन लाभ मिळू शकतात. जर काही विशिष्ट कायदेशीर प्रश्न असतील तर ते या कालावधीमध्ये सुटतील. व्यवसायात नवीन आर्थिक पर्याय उपलब्ध होतील.

नोकरी, व्यवसाय व धंदा : अत्यंत उत्साहाने आपल्या हातातील कामे पूर्ण करू शकाल. वेळोवेळी मदत मिळेल. विशेषत: सरकारी कामांमध्ये ओळखी मध्यस्थी फलद्रुप होतील, मात्र त्यासाठी पैसा व वेळ दोन्हीही खर्च करावा लागेल. दीर्घकाळ रखडलेली जमीनजुमला, स्थायी संपत्ती, वडिलोपार्जित संपत्ती इत्यादी क्षेत्रातील वादग्रस्त कामे तडजोड होऊन मार्गी लागतील. जमीनविषयक कामे होतील. स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होईल तसेच नवीन वाहन खरेदी करता येईल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील. आपल्या सकारात्मक दृष्टिकोनाने रोजचे जीवनमान बदलेल. आपल्या दैनंदिन जीवनात परिवर्तन घडू शकते. आपल्यामध्ये भरपूर आत्मविश्वास निर्माण झाल्याने आपण आपली कामे पूर्ण करू शकाल. आपली इच्छा-आकांक्षा पूर्ण होईल. विपरीत परिस्थितीत सुद्धा आपल्या इच्छा कशा पूर्ण होतील याच्या प्रयत्नात आपण असाल.

शुभ दिनांक : 1, 7, 12, 20, 26, 29

अशुभ दिनांक : 2,8,9,10,11,13,15,17,27

logo
marathi.freepressjournal.in