

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण
सिंह
कोणाच्याही वादात पडू नये
सिंह राशीचा स्वामी सूर्य अथवा रवी आहे. आपल्या शरीरात आत्मा ज्याप्रमाणे स्थिर आहे, स्वतंत्रता पूर्ण आहे, त्याप्रमाणे सूर्यही आहे. म्हणूनच त्याला आत्माकारक म्हटले जाते.फल ज्योतिषात रवीला आरोग्यकारक समजले जाते. आयुष्यदायक ग्रह आहे आध्यात्मिक मानसिक शारीरिक व नैतिक जीवन हे रवीवरून कळते. उत्तम गुण नीतीचा कारक रवी आहे. ईश्वरी भक्ती शुद्ध सात्विक आचार विचार हे रविवार अवलंबून असतात. तंत्रज्ञान व अंतस्फूर्तीचा कार्यक्रम आहे. धारिष्ट व धैर्य रवीवरून पाहता येते योगी लोकांची ध्यानधारणा यावरूनच कळते. यासाठी रवी बलवान असावा लागतो. या राशीच्या लोकांचा बांधा चांगला असून शरीर उंच असते सूर रागीट बलवान असे हे जातक असतात. रवीचा अंमल नेत्र व हृदयाशी आहे. रवी पत्रिकेत अथवा कुंडलीमध्ये चांगला असल्यास त्याचे गुणधर्म व सिंह राशि मध्ये दिसून येतात. रवी व चंद्र दोन्हीही पत्रिकेमध्ये बिघडलेले असल्यास अथवा त्यावर पाप ग्रहांची दृष्टी असल्यास त्याच्याविरुद्ध गुणधर्म दिसून येतात.
शिक्षण: शिक्षणक्षेत्रासाठी या महिन्यांमध्ये आपल्याला अनुकूलता लाभलेली आहे. त्याचा फायदा करून घेता येईल मात्र परिश्रम व कष्ट घेणे महत्त्वाचे ठरू शकते. शुभ ग्रहांची साथ मिळणार आहे, परंतु कष्टाला पर्याय नाही. तुमच्याकडे अभ्यासाची आवड असेल त्यामुळे योग्य दिशेने प्रयत्न होऊ शकतात. परिणामतः चांगले यश प्राप्त होईल. कला व क्रीडा क्षेत्रातही चांगले यश मिळेल. उत्तम संधी प्राप्त होतील. टेक्निकल क्षेत्रात उत्तम यश मिळण्यासाठी विशेष अनुकूल ग्रहमान आहे. परदेशातील शिक्षणासाठी चांगले यश मिळू शकेल पण त्या दृष्टिकोनातून प्रामाणिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.
पारिवारिक: साधारणपणे या कालावधीमध्ये आपल्या आजूबाजूस उद्रेक स्वरूपाच्या घटना घटीत होऊ शकतात. त्याचप्रमाणे आरोग्याकडे नीट लक्ष देऊन दुखापती सांभाळा. कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींनी प्रसंगत टाळणे अतिशय महत्त्वाचे ठरेल. कोणतीही माहिती नसताना इतर कोणाच्याही वादात अथवा भांडणामुळे मध्यस्थी करू नये ते नुकसानकारक ठरू शकते. नोकरीच्या ठिकाणी असलेल्या राजकारण व गटबाजी यापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करावा ते आपल्या हिताचे ठरेल. संशयास्पद लहान-मोठे आर्थिक व्यवहार टाळणे महत्त्वाचे ठरेल. तात्पुरता फायदा बघू नका.
नोकरी, व्यवसाय व धंदा : हा कालावधी आर्थिक दृष्ट्या चांगला आहे. व्यवसाय धंद्याच्या दृष्टिकोनातून अतिशय अनुकूल कालावधी नवीन व्यवसाय सुरू करू शकाल. त्याचप्रमाणे एखादा जोडधंदाही सुरू करू शकाल. भागीदारीच्या व्यवसायात चांगला फायदा होईल. नवीन व्यावसायिक शुभारंभ होईल. स्वतःच्या मालकीच्या जागेत व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. व्यवसायात नवीन संकल्पनांचा वापर यशस्वी ठरेल. विशेषतः परदेशी प्रवास फायदेशीर राहतील. महागड्या वस्तूंची खरेदी कराल. राहत्या घरातील भौतिक सुख सुविधा वाढविण्यासाठी अथवा घराचे सुशोभीकरण व्करण्यासाठी मुक्तहस्ते खर्च कराल.
शुभ दिनांक : 2,4,5,12,13,19,20,24,25
अशुभ दिनांक : 1,3,9,10,11,15,30
कन्या
मोह टाळा
कन्या राशीचा स्वामी बुद्ध आहे बुधाकडे बुद्धी असते तो बुद्धीचा कारक आहे शिवाय चातुर्यही असते. ही बुद्धी सर्वगामी असते. स्वतःचा कमीपणा या व्यक्ती स्वबुद्धी व बुद्धी कौशल्याच्या जोरावर झाकू शकतात. तशी त्यांना सवय असते. समोरच्या व्यक्तीचे अनुकरण ते बारकाव्यासहित करू शकतात याचे कारण त्यांची निरीक्षण करण्याची वृत्ती लक्षणीय असते. त्यामुळे तपशिलासह एखाद्या गोष्टीचे चांगले वर्णन करू शकतात. बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतात व त्याप्रमाणे वागू शकतात जगण्याची कला तरतमभाव यासारखे गुण या राशींच्या जातकामध्ये प्रामुख्याने दिसून येतात, परंतु बऱ्याचदा यांना आपले स्वतःचे निर्णय घेता येत नाहीत. आत्मविश्वास कमी असू शकतो. इतरांचे मार्गदर्शन अथवा मदतीची आवश्यकता भासू शकते. पत्रिकेमध्ये अथवा कुंडलीमध्ये चंद्र व बुद्ध दोन्ही ग्रह बलवान असल्यास सुद्धा असल्यास कन्या राशीचे लोक विद्वान असू शकतात यामधील एक ग्रह जरी कोणत्याही कारणामुळे दूषित झाला असल्यास त्याच्याविरुद्ध फळे मिळू शकतात.
शिक्षण : शिक्षणातील सर्व शाखेसाठी अनुकूल कालावधी आपल्याला मिळणार आहे. या काळात केलेला अभ्यास आपल्या स्मृतीमध्ये चांगला राहील. अभ्यास मग्न राहू शकाल. आपली ग्रहण क्षमता उत्तम राहणार आहे. त्यामुळे अभ्यासात प्रगती करू शकाल. कला व क्रीडा क्षेत्रासाठी सुद्धा अनुकूल कालावधी आहे. प्रगती होईल. स्पर्धा परीक्षेत अपेक्षेनुसार यश प्राप्त होईल. परदेशासंबंधीच्या शिक्षणात चांगले यश मिळणार आहे. आपणास अपेक्षित सहकार्य लाभेल. तसेच कुटुंब व गुरुजनांकडून मार्गदर्शन मिळू शकते.
पारिवारिक : विचित्र अशा ग्रहयोगांच्यामुळे सध्याचे ग्रहमान व्यापलेले आहे मात्र शुभ ग्रहांची साथ राहील. आर्थिक व्यवहार सांभाळा. कोणतेही जुगार सदृश्य व्यवहार करू नका. त्याचप्रमाणे मोह टाळणे महत्त्वाचे ठरेल. कोणत्याही तात्पुरत्या फायद्यासाठी बेकायदेशीर कृत्य करू नका. तसेच लहान मोठ्या प्रलोभनांपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करा ते आपल्या हिताचे राहील. कुटुंब परिवारातील सदस्यांचे आरोग्याकडे वेळेसच लक्ष देणे महत्त्वाचे ठरेल. जुनाट व्याधींच्या पार्श्वभूमीवर पथ्य पाळणे गरजेचे ठरेल पण महत्त्वाची सरकारी कामे पूर्ण होतील. कुटुंब परिवारातील तरुण तरुणांच्या समस्या मिटतील. सरकारी महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. ओळखी मध्यस्थींचा उपयोग होईल.
नोकरी, व्यवसाय व धंदा : आपल्या हातातील कामे आपण उत्साहाने व गतीने करणार आहात. अतिउत्साहामध्ये बेकायदेशीर कामे करणे टाळा. नोकरीमध्ये अपेक्षित घटना होतील. कुटुंब परिवारामध्ये समृद्धी आणि सुख वाढणार आहे, परंतु आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे अपरिहार्य ठरणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात आपण जोमाने कार्यरत राहाल. आपण आपल्या व्यवसायात एक विशिष्ट उंची गाठू शकाल. सामाजिक मानसन्मानामध्ये वृद्धी होईल. आर्थिक आलेख उंचावेल.
शुभ दिनांक : 4,5,12,13,19,20,21,23,28
अशुभ दिनांक : 1,3,9,10,11,15,30