डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण
तूळ
व्यावसायिक प्रतिष्ठा वाढेल
तूळ राशीचे चिन्ह तुला म्हणजे त्रास जो आहे तुला धारण करणारा माणूस असे या राशीचे स्वरूप आहे. समतोल, न्यायप्रियता, न्यायदान, व्यापारीवृत्ती हे तुला राशीचे प्रमुख कोन तुला राशीच्या जातकामध्ये आढळतात. ही राशी मध्यम प्रसव राशी आहे. या राशीचे तत्त्व वायू आहे. तुळ रास ही लग्नात बलवान असते तसेच ही रास दिवसा बलवान असते.
शिक्षण : कोणत्याही क्षेत्रातील शिक्षणासाठी अनुकूल ग्रहमान आहे. त्यामुळे आपण केलेले प्रयत्न यशस्वी होऊन चांगले यश प्राप्त करू शकता. अभ्यासामध्ये प्रामाणिकपणा व परिश्रम घेण्याची तयारी ठेवा. प्रामाणिकपणे कष्ट घ्या तसेच कुसंगत टाळा. स्वतःच्या प्रयत्नांवर जास्त भर देणे आवश्यक आहे. तुमच्या बुद्धीचातुर्याने प्रयत्न योग्य होतील. योग्य दिशेने होतील. अभ्यासाला योग्य वेळ देणे आवश्यक आहे. त्यातल्या त्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना अनुकूलता मिळणार आहे. कला व क्रीडा क्षेत्रात मात्र जास्त प्रयत्नाची आवश्यकता आहे. विशेष दृष्टिकोनातून प्रयत्न करावे लागतील. सरावाची जास्त आवश्यकता आहे. परदेशासंबंधी कला-क्रीडा क्षेत्रात चांगले यश मिळवू शकाल.
पारिवारिक : आर्थिक परिस्थिती चांगली राहील. त्यामुळे परिवारातील बहुतेक गरजा व जबाबदाऱ्या आपल्याकडून पूर्ण होतील, मात्र खर्चाचे प्रमाण जास्त असेल. आपल्या स्वतःवर किंवा स्वकियांवर खर्च होण्याचा संभव आहे. खर्च करताना भान ठेवा. अनावश्यक खर्च टाळणे महत्त्वाचे ठरेल तसेच स्वतःच्या वागणुकीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या जातकांना अनुकूलता मिळत असल्याकारणाने चांगले यश प्राप्त करू शकाल. स्पर्धात्मक यश मिळेल, मात्र कला व क्रीडा क्षेत्रात जास्त प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. योग्य संधीची वाट बघा. परदेशासंबंधी कला व क्रीडा क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या अनेक संधी मिळू शकतात, परंतु त्या संधीचे सोने करणे आपल्यासाठी आहे हे लक्षात ठेवा. परिस्थितीजन्य लाभ मिळेल.
नोकरी, व्यवसाय, धंदा : आपल्या कार्यक्षेत्रातील प्रगतीच्या दृष्टिकोनातून अनुकूल परिस्थिती. सर्व क्षेत्रातून अपेक्षित सहकार्य मिळू शकते. त्यामुळे व्यवसाय-धंद्यातील उत्पादनक्षमता वाढेल. परिणामतः उलाढाल वाढून नफ्याच्या प्रमाणात वृद्धी आपली कार्यकुशलता सुधारेल. परंतु किरकोळ विक्रेत्यांना व्यवसाय थंडावलेला जाणवू शकतो. नवी गुंतवणूक करू शकाल, परंतु गुंतवणूक कायदेशीर क्षेत्रात काम करणाऱ्या त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याची गरज भासेल. आपल्या जीवनात सौभाग्य प्रवेश करेल. बरेच दिवस मनात घर करून राहिलेली एखादी इच्छा पूर्ण होईल. परिवारातील परिस्थिती चांगली राहील, जमीनजुमला, स्थायी संपत्ती इत्यादीविषयी दीर्घकाळ प्रलंबित असलेले व्यवहार गतिमान होतील. बांधकाम व्यावसायिकांसाठी अनुकूल कालावधी, रखडलेले प्रकल्प पूर्ण होतील.
शुभ दिनांक : 6,7,9,10,11,14,19,24,28
अशुभ दिनांक : 2, 5, 13, 16, 18, 21, 23, 30,31
वृश्चिक
संमिश्र स्वरूपाची फळे मिळतील
वृश्चिक राशीचे चिन्ह विंचू आहे. भक्ष्य मिळविण्यासाठी टपून असलेला विंचू असे वृश्चिक राशीचे स्वरूप आहे. मार्मिकता, एकांत प्रियता, गूढपणा, दुर्बलांवर आक्रमण करणे, प्रबलांचे नमते घेणे, टीका करणे, गुप्तपणे पाप करण्याचा कल असतो. अतिरेक, मर्म भेदकता, मनकवडेपणा हे वृश्चिक राशीचे स्वाभाविक गुण आहेत. हे कोन वृश्चिक राशी असलेल्या व्यक्तींमध्ये आढळतात. वृश्चिक रास ही बहुप्रसव राशी आहे. या राशीचे तत्त्व जल आहे. मोक्ष त्रिकोणातील ही रास आहे. वृश्चिक रास सप्तम भावात बलवान असते. या राशीचा समय बल दिवसा आहे.
शिक्षण : कोणत्याही क्षेत्रातील शिक्षण घेण्यासाठी जरी अनुकूल कालावधी असला तरी आपल्याला स्व प्रयत्न आणि यश मिळवणे गरजेचे आहे. चालढकल करू नये अथवा कंटाळा करू नये. कुसंगत टाळणे गरजेचे आहे. तसेच व्यसनांपासून अलिप्तता बाळगावी. अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे, वेळेचे नियोजन उपयोगी पडेल, प्रयत्नांना ग्रहमानाची साथ मिळेल. त्यामुळे आत्मिक बल वाढेल. आत्मविश्वास वाढेल. त्याचा परिणाम आपल्याला यश मिळेल, कला व क्रीडा क्षेत्रात चांगल्या संधी उपलब्ध होतील तसेच आपणास इतरांकडून सहकार्यही मिळेल. परदेशासंबंधीच्या शिक्षणासाठी अनुकूल कालावधी आहे. प्रयत्नांद्वारे आपण त्यात यश मिळवू शकाल.
पारिवारिक : आपल्या अपेक्षेप्रमाणे परिवारातील प्रत्येक सदस्य आपल्याला वाढते सहकार्य देईल. विशेषतः भावंडांकडून सहकार्य मिळू शकते. कुटुंब व परिवारात एखादे मंगलकार्य घडण्याची शक्यता आहे. परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणांचे विवाह ठरतील. मंगलकार्याचे नियोजन ठरू शकते. नातेवाईकांची मदत मिळेल. परिवारात आपल्याला अपेक्षित असलेली शांतता राहील. अध्यात्मक तसेच सामाजिक कार्यात रुची घ्याल. सहकुटुंब, मित्रपरिवार एखाद्या धार्मिक, पवित्र स्थळी भेट देण्याचे घटित होत आहे. घरातील व्यक्तींच्या अपेक्षा पूर्ण होतील. मनोरंजन व आनंदाचा प्रवास घडेल. हातून दानधर्म घडू शकतो.
नोकरी, व्यवसाय, धंदा : चालू ग्रहमान मिश्र स्वरूपाचे असल्याकारणाने आपल्याला मिश्र फळे प्रतिपादित होतील. काही वेळेस अनपेक्षित अडचणींना तोंड द्यावे लागेल. त्यामुळे पूर्वनियोजित कामात बदल घडू शकतो तसेच नियोजन बदलावे लागू शकते. वस्तुस्थितीची जाण ठेवून मगच निर्णय घेणे गरजेचे ठरेल. घाईगर्दीमध्ये घेतलेले निर्णय चुकू शकतात. वेळ पडल्यास विश्वासू व्यक्तीचा सल्ला उपयोगी पडू शकतो, तसेच मदत मिळू शकते. परिवारात वादविवादाचे प्रसंग घडून नात्यांमध्ये ताणतणाव बघावयास मिळू शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रसंगांकडे दुर्लक्ष करणे हिताचे ठरेल. विशेषतः बहीण भावंडांच्या बाबतीत वादविवादात्मक प्रसंगांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे हिताचे ठरेल. त्या दृष्टिकोनातून परिवारातील शांततासुद्धा टिकेल. काही वेळेस कुटुंबातील सदस्यांच्या मागण्या वाढल्यामुळे विवंचना सतावतील. तरुण-तरुणींनी कुसंगत टाळावी.
शुभ दिनांक : 6,7,9,10,11,17,24,25,26
अशुभ दिनांक : 2, 5, 13, 16, 18, 21, 23, 30,31