आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १६ नोव्हेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, November 16, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - काम जास्त असल्यामुळे मानसिक तणाव घेऊ शकतो. शारीरिक थकावट वाटणार आहे. स्वतःच्या भावनांवर कंट्रोल ठेवा. नोकरीमध्ये कोणतेही बेकायदेशीर व्यवहार टाळा.

वृषभ - व्यावसायिकांना उत्साहाच्या वातावरण असणार आहे. आर्थिक कोंडी फुटेल. विद्यार्थ्यांना चांगला दिवस. तरुणांना नैराश्य घालवणारा दिवस.

मिथुन - आहार-विहाराचे पथ्य पाळा, कोणाशी हुज्जत घालू नका. मालमत्ताविषयक निर्णय होतील, मात्र व्यवहार करताना ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला निश्चित घ्यावा.

कर्क - छोटे-मोठे प्रवास होण्याची शक्यता आहे. मात्र प्रवासात काळजी घेणे आवश्यक आहे. साहित्यिक व पत्रकारिता करणाऱ्या व्यक्तींना चांगला दिवस आहे.

सिंह - कुटुंबामध्ये धार्मिक कार्य असेल. त्याच्यामध्ये आपण पण व्यस्त रहाल. घरामधील पाहुण्यांचा पाहुणचार करण्यात आनंद वाटेल. खर्च वाढणार आहे.

कन्या - नोकरी व्यवसायातून आपणास सावध राहावे लागणार आहे. आपणावर क्रिया-प्रतिक्रिया होण्याची शक्यता आहे, मन मात्र शांत ठेवा.

तुळ - खाजगी नोकरी करणाऱ्यांना कामामध्ये कामाची प्रशंसा होणार आहे. त्यामुळे कामाला उत्साह येणार आहे. यामुळे काही जास्तीची कामे पण करावे लागण्याची शक्यता आहे.

वृश्चिक - कार्यक्षेत्र विस्तारण्याची संधी मिळणार आहे. कामामध्ये काही अडचणी असल्यास त्या सहजतेने सोडवाल. घरातील वरिष्ठ व्यक्तींची वाद घालू नका.

धनु - एखाद्या महत्त्वाच्या कामांमध्ये बाजी मारून जाल. कलाकारांचा भाग्योदय होईल. वास्तु विषयी काही कटकटी असतील तर त्या सोडवण्याचा प्रयत्न करा, सहजतेने सुटतील.

मकर - आजचा दिवस जास्त चांगला जाणार आहे. आपला उत्साहाचे वातावरणात अतिशय चांगले राहील. काही धार्मिक कृत्य कराल, त्यामुळे मानसिक शांतता लाभेल.

कुंभ - आज जास्त धावपळ करू नका. घरात शांत रहा. व्यावसायिकांना दिलासा देणारा दिवस आहे. छोट्या-मोठ्या अपघातापासून सुरक्षित रहा.

मीन - नोकरदारांना अतिशय चांगला दिवस आहे. तरुणांना शिक्षण नोकरी आणि विवाह या घटनेतून मोठे चांगले लाभ होऊ शकतात. व्यवसायिकांना उत्तम पर्याय मिळतील.

न्यायालयाच्या वेळेचे मूल्य एक लाख! वेळ वाया घालविल्याबद्दल शेतकरी कुटुंबियाला दणका

ठाण्यात पाळीव प्राण्यांसाठी पहिली गॅस शवदाहिनी

संजय केळकरांनी चमत्कार करून दाखवावाच; परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांचा सूचक टोला

नवी मुंबई विमानतळाच्या उड्डाणाला अखेर मुहूर्त! २५ डिसेंबरपासून उड्डाण; अकासा एअर, इंडिगोचे वेळापत्रक अखेर जाहीर

भायखळ्यात मलबा कोसळून दोन मजुरांचा मृत्यू