आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १२ फेब्रुवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, February 12, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - कामाचा वेग वाढणार नाही. आपल्याला आपला आत्मविश्वास वाढवण्याची जरुरी आहे. काम जास्त पडण्याची शक्यता आहे. मानसिक तणाव राहणार आहे.

वृषभ - आपल्या हातून चांगली रचनात्मक कामे होणार आहेत. महत्वाच्या कामामध्ये सातत्य राहील. विद्यार्थ्यांना चांगला दिवस. कोणत्याही कामात विलंब होत नाही. याकडे लक्ष द्यावे.

मिथुन - आपण आपल्या बुद्धिचातुर्याने आज काम करणार आहात. पण कामामध्ये सतर्क असता. तरीसुद्धा कामात थोडे लक्ष देणे जास्त जरुरीचे आहे. शुभ ग्रह आपल्याला सहकार्य करणार आहेतच.

कर्क - शुभ ग्रहाच्या भ्रमणा मुळे आपली कामे वेगवान होतील. जर आपण कलाक्षेत्र साहित्य क्षेत्रात काम करत असाल तर मनासारख्या घटना घडतील. व्यापार-व्यवसायात अपेक्षित यश मिळेल.

सिंह - आपल्याला व्यापार व्यवसाय मध्ये यश येणार आहे. मिळकतीचे नवे प्रस्ताव समोर येतील. आर्थिक लाभ होणार आहे. कुटुंबामध्ये खेळीमेळीचे वातावरण राहणार आहे.

कन्या - आपले मनोबल चांगले राहणार आहे. समोर अनेक कामे दिसणार आहेत.एका वेळी एक काम करणे ईस्ट राहणार आहे.कामाच्या अनेक संधी समोर दिसणार आहे.

तुळ - आज विचारपूर्वक कामे करण्याची गरज आहे. कामे पूर्ण करताना अडचणी समोर दिसणार आहे. जुनी कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कोणतीही गुंतवणुक करू नका.

वृश्चिक - योग्य नियोजन आणि योग्य हालचाली यामुळे नवीन आशादायक चित्र समोर येणार आहे. आपणास मनोरंजनासाठी मित्रांसोबत बाहेर जाण्याची इच्छा असणार आहे.

धनु - शुभ ग्रहांची आपल्याला साथ राहणार आहे. नियमित व्यवहार चांगले होणार आहेत. व्यापार व्यवसाय चांगल्या प्रकारे गती घेणार आहे. प्रापंचिक समस्या चांगल्या तऱ्हेने सोडवाल.

मकर - सातत्याने काम केल्यामुळे काम मध्ये भरघोस यश येणार आहे. नियोजित कामे पूर्ण करणारा आहात. प्रवासाची शक्यता आहे. सामाजिक आणि धार्मिक कामांमध्ये मन रमणार आहे.

कुंभ - महत्त्वाचे काम करताना बारकाईने लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे. कुठल्याही महत्त्वाच्या कागदपत्रांवर नीट वाचूनच सह्या करा. योग्य व्यक्तीशी संपर्क आणि चर्चा करूनच महत्त्वाची कामे करा.

मीन - आपल्या विश्वास पात्र व योग्य व्यक्तीचा सल्ल्याचा महत्त्वाच्या कामात उपयोग करून घ्या. वादग्रस्त विषय टाळणे फार महत्त्वाचे आहे. लोकांचे योग्य संवाद साधणे हाच आपला योग्य मार्ग.

Navi Mumbai : हापूस आंबा झाला स्वस्त; APMCमध्ये दरात घट, १५००रुपयांपासून पेटी उपलब्ध

Mumbai : ४०० टन वजनी क्रेन उलटली; BKC मध्ये मेट्रो कामादरम्यान मोठा अपघात

पुण्यातील वरिष्ठ शास्त्रज्ञाला 'डिजिटल अरेस्ट'च्या जाळ्यात ओढले; सायबर चोरट्यांनी तब्बल ७८ लाख रुपये लुटले

"मुलगा माझ्यासारखा दिसत नाही..."; पत्नीवरील संशयामुळे पित्यानेच घेतला सहा वर्षीय मुलाचा जीव; चौकशीत धक्कादायक खुलासा

वेदांता पॉवर प्लांट स्फोटातील मृतांचा आकडा वाढला; मॅनेजमेंटविरूद्ध FIR नोंदवा, न्यायालयीन चौकशी करा - काँग्रेसची मागणी