आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १५ जानेवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, January 15, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आजचे ग्रहमान आपल्याला आनंद मिळवून देणारे आहे. आपल्या नोकरीमध्ये काही अडचणी असतील त्या इतरांच्या सहाय्याने आपण सोडवणार आहात.

वृषभ - अनोळखी व्यक्ती वर जास्त जबाबदाऱ्या सोपवू नका.फसवणूक होण्याची शक्यता आहे. आज महत्त्वाची कामे करू नका. कामा मध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे .

मिथुन - शिक्षण संस्थेची संबंध येण्याची शक्यता आहे. त्यातून काम मिळण्याची शक्यता आहे.नियोजनपूर्वक कामे होणार आहे.कामामध्ये सातत्य राहणार आहे.नातेसंबंध सांभाळले जातील.

कर्क -आपल्या कार्यक्षेत्रात सफलता मिळवण्यासाठी संयम फार आवश्यक आहे.कुटुंबातील वाद विवाद त्वरित मिटवणे आवश्यक आहे.घरातील आजारी व्यक्ती कडे जास्त लक्ष द्यावे लागणार आहे.

सिंह- नातेवाईकांशी चांगले संबंध राहणार आहेत.नव्या योजना कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रगती होणार आहे. परदेशातून अपेक्षित शुभसंदेश येण्याची शक्यता आहे.

कन्या - आपल्या खाजगी बाबी इतरांशी चर्चा करू नका.घरातील काही प्रसंगात दक्ष राहणे इष्ट आहे. नवीन बातम्या समजतील. चांगल्या विचारांचा पाठपुरावा कराल.

तुळ - आज नवीन कामाला सुरुवात सुरुवात करू नका. नोकरीमध्ये थोडासा तणाव जाणार आहे. व्यवसायामध्ये चांगले यश मिळणार आहे. भावंडांच्या गाठीभेटी होण्याची शक्यता.

वृश्चिक - आरोग्याची काळजी घेणे फार आवश्यक आहे. दगदग होईल अशी कामे करू नका. प्रवास शक्यतो टाळलेलाच चांगला. नोकरीमध्ये चांगली स्थिती राहील. मुलांना यश येणार आहे.

धनु - व्यापार-व्यवसायात सकारात्मक बदल करणार आहात. त्याचा आर्थिक फायदा होणार आहे.नोकरीमध्ये अडचण येण्याची शक्यता आहे, पण आपल्या सहकार्यामुळे काम साध्य होणार आहे.

मकर - हाती घेतलेली कामे पूर्ण करा. आपले कर्तुत्व पुन्हा एकदा दाखवून द्याल.आपल्या कार्यक्षेत्रात वादाचे प्रसंग येऊ शकतात असता . गोड बोलून हाताखालील व्यक्तींकडून काम करून घ्या.

कुंभ - आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. तर त्या दृष्टिकोनातून काळजी घेणे फार आवश्यक आहे.आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.

मीन - कार्यक्षेत्रामध्ये प्रयत्नशील रहाणे फार आवश्यक आहे. त्यामुळे यशाचे मार्ग सुलभ होणार आहेत. नोकरदारांना दिलासा मिळणार आहे. हाती घेतलेल्या कामांमध्ये सफलता मिळणार आहे.

BMC Election : आज मतदान; मुंबईच केंद्रस्थानी; बोटावर उमटणार लोकशाहीचा ठसा, तरुणाईमध्ये उत्साहाचे वातावरण

Thane Election : व्होटर स्लिपमध्ये घोळ; नाव, अनुक्रमांक बरोबर; पत्ते मात्र बदलले

BMC Elections 2026: मुंबईत मतदानाला झाली सुरूवात; आज काय सुरू, काय बंद?

मतदार आज 'राजा'; मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी निवडणूक; साडेतीन कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क

अजित पवारांनी फोडला सिंचन घोटाळ्याचा 'बॉम्ब'; मतदानाआधीच मित्रपक्षांवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे खळबळ