५२ वर्षांनंतर सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार? मुंबईत समुद्रकिनारी सहा मजली नव्या घराची तयारी

वाढत्या सुरक्षेच्या कारणांमुळे आणि कुटुंबासाठी अधिक गोपनीयता मिळावी या उद्देशाने समुद्रकिनारी सहा मजली नवे घर उभारण्याची योजना आखण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.
५२ वर्षांनंतर सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार? मुंबईत समुद्रकिनारी सहा मजली नव्या घराची तयारी
५२ वर्षांनंतर सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार? मुंबईत समुद्रकिनारी सहा मजली नव्या घराची तयारी
Published on

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान १९७४ पासून वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहे. तब्बल पाच दशकांहून अधिक काळ या प्रतिष्ठित निवासस्थानात राहिल्यानंतर आता तो हे घर सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. वाढत्या सुरक्षेच्या कारणांमुळे आणि कुटुंबासाठी अधिक गोपनीयता मिळावी या उद्देशाने समुद्रकिनारी सहा मजली नवे घर उभारण्याची योजना आखण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.

समुद्रकिनारी सहा मजली नवे घर उभारण्याची तयारी

माध्यमांतील वृत्तानुसार, ६० वर्षीय सलमान खान आपल्या कुटुंबासाठी अधिक सुरक्षित आणि प्रशस्त निवासस्थान उभारण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (MCZMA) ने १६ जून रोजी या प्रकल्पाला मंजुरी दिली असून, त्यानंतर नव्या निवासी इमारतीच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. ही इमारत वांद्रे येथील चिंबई परिसरात, त्याची आई सलमा खान यांच्या मालकीच्या जागेवर उभारण्यात येणार असून, हे ठिकाण गॅलेक्सी अपार्टमेंटपासून अगदी काही अंतरावर आहे.

मंजूर आराखड्यानुसार, या प्रकल्पात तळमजला, पार्किंग आणि त्यावरील सहा मजल्यांचा समावेश असेल. शाहरुख खानच्या 'मन्नत'प्रमाणेच सलमान खानचे गॅलेक्सी अपार्टमेंटही मुंबईतील प्रसिद्ध सेलिब्रिटी निवासस्थानांपैकी एक मानले जाते. वाढदिवस, ईद आणि इतर खास प्रसंगी सलमानची एक झलक पाहण्यासाठी येथे हजारो चाहते गर्दी करतात.

५२ वर्षांनंतर सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार? मुंबईत समुद्रकिनारी सहा मजली नव्या घराची तयारी
केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, "अत्यंत धक्कादायक, मुलांमध्ये सूडबुद्धी का तयार होते?"

गोळीबारानंतर वाढली सुरक्षा

१४ एप्रिल २०२४ रोजी गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खानच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली होती. या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा आरोप असलेल्या दोन दुचाकीस्वारांनी गोळीबार केल्याचे समोर आले होते. त्यानंतर सलमानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली असून, त्याला 'वाय प्लस' श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे.

सलमान खान आणि बिश्नोई टोळीतील वाद काय?

सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीतील वादाचे मूळ १९९८ मधील काळविट शिकार प्रकरणात असल्याचे मानले जाते. 'हम साथ साथ हैं' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान काळविटाची शिकार केल्याचा आरोप सलमान खानवर करण्यात आला होता. बिश्नोई समाजात काळविटाला पवित्र मानले जाते.

तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने यापूर्वी सलमान खानने या प्रकरणात माफी मागावी, अन्यथा त्याची हत्या करणे हेच आपले ध्येय असल्याचे सार्वजनिकरित्या म्हटले होते.

अधिकृत दुजोरा नाही

सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंटमधून स्थलांतर करणार असल्याच्या वृत्ताला अद्याप अभिनेता किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in