मेष : आपली बाजू शांतचित्ताने मांडल्याने आपल्याविषयी झालेले गैरसमज दूर करता येतील. आपल्या क्षेत्रामध्ये आपण काढलेले अंदाज आणि ठोकताळे बरोबर येणार आहेत.
वृषभ : आपली आवक आणि खर्च याच्यामध्ये खूप तफावत असणार आहे खर्च करताना जपून करा .प्रभास होण्याची शक्यता आहे आपल्या तब्येतीची काळजी घेणे.
मिथुन : नवीन दिवस नवीन मार्ग याचा चांगला अनुभव आपणास आज येणार आहे. वरिष्ठांशी अपेक्षित साथ मिळणार आहे. कामे सुरळीत पार पडतील. विरोधकांच्या कारवायात वाढ होणार आहे.
कर्क : आवडते व्यक्तींचा सहवास लाभेल. तुम्ही मनोमन सुखावून जाणार आहात. आर्थिक आवक चांगली असेल. विवाह इच्छुकांचे शुभ कार्य होईल. घरातील महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्यावे लागेल.
सिंह : कार्यक्षेत्रात प्रगतीच्या संधी येणार आहे. याबाबतीत मित्रांशी संवाद साधाल. मित्रांची जरी चर्चा केली तरी स्वतःच्या मनाने कार्य कराल. पूर्ण पणे स्वतःचा निर्णय स्वतः घ्याल, यश येणार आहे .
कन्या : आवक वाढल्याने खर्चही वाढणार आहे. नोकरी व्यवसायात वरिष्ठांनी सोपविलेली कामे जबाबदारीने अधिक परिश्रमाने पूर्ण करावी लागतील. वेळ वाया घालू नका. कायद्याची चौकट पाळा.
तुळ : मनातील किल्मिष दूर होणार आहे. कामातील सातत्य व एकाग्रता हेच आपल्या यशाचे गमक ठरणार आहे. तुम्ही दिलेला शब्द पाळण्यासाठी काही अडचणी येऊ शकतात.
वृश्चिक : आपल्या कामामध्ये आपल्याला अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे मार्गी लावताना सहकाऱ्यांचा सल्ला घ्या. आपल्या जवळच्या व्यक्तींची वाद-विवाद होऊ शकतो.
धनु : आजचा दिवस आपल्या प्रगतीचा आहे. प्रयत्नाने यश मिळणार आहे. कोणाची मतभेद होतील असे वागू नका. कोणाला किती जवळ करायचे व किती लांब ठेवाय स्वतःच्या विचारावर अवलंबून आहे.
मकर : आपल्या कष्टाचे फळ आपणास मिळेल. आर्थिक व्यवहार करताना वरिष्ठांची चर्चा करा. कार्यक्षेत्रातील सहकार्यांना विश्वासात घेऊन महत्त्वाचे निर्णय घ्या. नियोजनानुसार कामकाज पार पाडाल.
कुंभ : उत्साहवर्धक असा दिवस आहे आर्थिक व्यवहारात लाभाचे संकेत मिळतील तुमचे मौजेची इच्छा पूर्ण होईल योग्य संधी आपण तत्परतेने पूर्ण कराल. मान अपमानाच्या प्रसंगाकडे दुर्लक्ष करा.
मीन : योग्य दिशेने व योग्य मार्गाने वाटचाल करून ध्येय साध्य करावे लागेल. विरोधकांना रोखण्यासाठी नवीन डावपेचआखावे लागतील. आपल्या कामांमध्ये दिरंगाई करू नका .