आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २१ फेब्रुवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, February 21, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आपल्यामध्ये आत्मविश्‍वास व ऊर्जा भरपूर असणार आहे. नियोजनपूर्वक कामे केल्याने कामे चांगली होणार आहेत. आपल्या कामाचा दर्जा या जातीचे चांगला असणार आहे.

वृषभ -काज आपले कार्य चांगले होणार आहे. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घेतल्याने फायदेशीर ठरणार आहे. कामातील नियोजन चांगले असणार आहे. धार्मिक कामाला वेळ देणार आहात.

मिथुन - व्यवसायामध्ये आवक चांगली राहील. नोकरदारांनी प्रलोभनांपासून दूर राहणे फार आवश्यक आहे. अनपेक्षित खर्चाचे प्रसंग समोर येतील. कायदेशीर प्रकरणातून त्रास होऊ शकतो.

कर्क - प्रवासामधून फायदेशीर घटना घडतील.व्यवसायिक आवक प्रमाणापेक्षा कमी राहणार आहे. आर्थिक समस्या उद्भवतील. नोकरीत संमिश्र परिणाम मिळणार आहेत.

सिंह - नोकरीमध्ये ठरवलेल्या कामामध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे.आर्थिक बाबी मध्ये बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे. वरिष्ठां मुळे मनस्तापाचे प्रसंग येण्याची शक्यता आहे.

कन्या - संततीच्या कामात सफलता मिळणार आहे. विद्यार्थ्यांना खूप परिश्रम घ्यावे लागतील. उद्योग-व्यवसायात आवक चांगली राहणार आहे. कामामध्ये अपेक्षित सफलता मिळणार आहे.

तुळ - कुटुंबा कडे जास्त लक्ष देणे भाग पडणार आहे. अनपेक्षित समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. घरातील महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. नोकरीच्या प्रश्नातून मार्ग निघतील.

वृश्चिक -भावंडांच्या बाबतीत चांगल्या घटना घडतील. प्रवासामधून काळजी घेणे आवश्यक. मित्रमंडळींकडून अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. सरकारी कामासाठी संमिश्र रहाणार आहे.

धनु - कुटुंबा मधल्या समस्या संपणार आहेत. आर्थिक प्राप्ती चे प्रमाण वाढणार आहे. नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होईल. योग्य मार्ग निघतील. उद्योग-व्यवसायात प्राप्ती चांगली राहणार आहे.

मकर -आज आपले मनोबल चांगले राहणार आहे. मात्र नोकरीमध्ये नियोजन करून काम करावे अन्यथा ठरवलेली कामे होणार नाहीत. घरातील व्यक्तींचे सहकार्य लाभणार आहे.

कुंभ - काही व्यक्तींना मनाविरुद्ध प्रवासाचे प्रसंग येण्याची शक्यता आहे .गुंतवणुकीमध्ये दूरदृष्टीचा विचार करणे फार आवश्यक आहे. मनस्तापाचे प्रसंग येण्याची शक्यता आहे.

मीन -आजचा दिवस आनंदात चालवण्याचा प्रयत्न करणार आहात. मात्र कामांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई करू नका. मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार आहे.

शिमग्याला गावी जाणाऱ्या कोकणकरांसाठी गुड न्यूज! मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी १ मार्चपासून; पाहा वेळापत्रक आणि तिकीट दर

नागपुरात १२ वीचा केमिस्ट्री पेपर लीक! विद्यार्थिनीच्या वारंवार वॉशरूमला जाण्यामुळे आली शंका; मोबाईलमध्ये सापडला पुरावा

आता शिळफाटा रस्त्यावर मेट्रोने प्रवास; मेट्रो १२ च्या विस्तारीकरणाची घोषणा; MMRDA च्या अर्थसंकल्पात समावेश

Mumbai : मोनोरेल पुन्हा धावणार! सीसीटीव्ही, चार्जिंग पॉइंट्स, स्मार्ट सिग्नलिंग अशा २१ नव्या सुविधांसह सज्ज; MMRDA ची घोषणा

महामार्गावर टोलवसुली होणार कॅशलेस; १ एप्रिलपासून अंमलबजावणीचे संकेत