आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २३ ऑगस्ट २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, August 23, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - तुम्ही तुमच्या महत्वाकांक्षा घरातील ज्येष्ठ व्यक्तींना सांगितल्यास ते आपणास सर्वतोपरी मदत करण्याची शक्यता आहे. - प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका.

वृषभ - जे जातक नोकरी करत आहे, अशा जातकांना आज आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करण्याची संधी मिळणार आहे. | कुटुंबातील सदस्य आपल्या विचारांच्या दृष्टीने सहमत आहे.

मिथुन - इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करणार आहात. आपले वैवाहिक आयुष्य आनंदी आणि समाधानी असेल. सामाजिक कार्य करताना आपणास आनंद होणार आहे.

कर्क - आपण एखाद्याला दुखावले असेल तर त्याची माफी मागा. चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्या. जोडीदाराच्या सहाय्याने आर्थिक स्थिती सुधारणार आहे.

सिंह - आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे. आज आपण दिवस चांगल्या प्रकारे व्यतीत करू शकता. व्यापार व्यवसायामध्ये आर्थिक फायदा होणार आहे. भागीदारांना बरोबर चांगले संबंध असतील.

कन्या - नोकरी व्यवसायामध्ये समाधानकारक परिणामांसाठी सर्व कामे नीटनेटकी करणे आवश्यक आहे. कामाकडे दुर्लक्ष करू नका, - चुका झाल्यास ताण येणार आहे.

तुळ - आज आपला आत्मविश्वास चांगला असणार आहे आपल्या लिखाणात किंवा कवितेला प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रामध्ये नवीन संधी येतील.

वृश्चिक - आपले सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहणार आहेत. आपल्या व्यवसायात वृद्धी होणार आहे. एखादी चांगली बातमी समजण्याची शक्यता आहे. कामासाठी प्रवास होण्याची शक्यता.

धनु - नवीन प्रगतीचे मार्ग समोर येणार आहेत. जास्तीच्या कामाने आपल्याला ताण शक्यता आहे. आपली कामे मनासारखी होणार आहेत. सातत्याने काम केल्यामुळे कार्यक्षेत्रात आर्थिक उन्नती होईल.

मकर - आपणास आज कुटुंबातून सहकार्य मिळणार आहे. र्थिक प्रश्न सुटणार आहेत. आपल्याकडे पाहुणे येण्याची शक्यता आहे. त्यांचे स्वागत चांगले करणार आहात. उधारी वसूल होऊ शकते.

कुंभ - आज आपले मनोबल उत्तम असणार आहे. आपल्या कामाला सुरुवात उत्साहाने आनंदाने करणार आहात. आपल्या कार्यक्षेत्रात नवीन नवीन अनेक संधी येण्याची शक्यता आहे.

मीन - नोकरी व्यवसायातील आपले टार्गेट पूर्ण झाल्यामुळे आपण आनंदित असणार आहात. आपणास मित्रांचे सहकार्य मिळणार आहे. त्यामुळे काम उत्तम होणार आहे.

Mumbai : मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक; कुर्ला ते वाशी मार्गावर ब्लॉक

Mumbai Hit-and-Run : मिठीबाई कॉलेजजवळ भरधाव दुचाकीची १५ वर्षीय मुलीला धडक; चालक फरार, CCTV फुटेज व्हायरल

तेलंगणातील फार्मा कंपनीत भीषण स्फोट; २ जणांचा मृत्यू, ९ कामगार जखमी, Video

Thane : वर्षभर रखडलेल्या भरती प्रक्रियेला वेग; ७०८ पदांसाठी १ आणि २ सप्टेंबरला परीक्षा

Mumbai : ५० फेलोच्या जागेसाठी बीटेक, डॉक्टरांचे अर्ज; ५० जागांसाठी ४५०० जणांचे आवेदन, महापालिकेत कंत्राटी भरती