आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २३ डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, December 23, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - शांत राहून समाधान मिळेल. क्रोधावर नियंत्रण आवश्यक आहे. लहान सहान गोष्टींवर जास्त विचार न करता सोडून द्या. त्याने त्रास कमी होईल.

वृषभ - अचानक रित्या पाहुण्यांचे आज बंद होऊ शकते. त्यांच्या स्वागतासाठी व त्यांच्या पाहुणचारासाठी वेळे सह खर्च करावा लागेल.

मिथुन - आपल्या मतांशी ठाम राहा. नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी संपादित करण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता राहील. कौटुंबिक सुख मिळेल.

कर्क - घरातील कामांसाठी वैयक्तिक वेगळा वेळ काढावा लागेल. अडलेली कामे होतील. प्रलंबित कामांसाठी लक्ष द्यावे लागेल. घरातील मुलांकडेही विशेष लक्ष द्यावे.

सिंह - नोकरीत सकारात्मक बदल घडून अधिकारांमध्ये वाढ होईल. मात्र सरकारी नोकरीत आपल्या कार्य कक्षेचे भान ठेवावयास लागणार आहे. प्रलोभने टाळा.

कन्या - आपल्या बोलण्याने इतरांचे ध्यान आकर्षित कराल. मित्रमंडळींच्या समावेत मनोरंजना मध्ये वेळ व्यतीत कराल. सरकारी कामे पूर्ण होतील.

तुळ - कुटुंबियांसाठी तसेच स्वतःसाठी नवीन खरेदी कराल. राहत्या घरातल्या सुखसोयी साठी खर्च करण्याचे नियोजन कराल. दिवस मजेत जाई..

वृश्चिक - नव्या संकल्पनांचा वापर व्यवसायांमध्ये करून व्यवसायांमध्ये पूरक बदल घडू शकाल. व्यवसाय विस्ताराची कल्पना असेल. आर्थिक परिस्थिती ठीक राहील.

धनु - अध्यात्मिकता, धार्मिकता याकडे कल असेल सहकुटुंब सहपरिवार धार्मिक प्रवासाच्या योजना आप्तेष्ट मित्रमंडळीं सह आखाल.

मकर - कुटुंबातील वडीलधाऱ्या व ज्येष्ठ मंडळीं बरोबर आदराने वागा. समोरील व्यक्तीचे म्हणणे पूर्णपणे ऐकून त्यावर आपली प्रतिक्रिया द्या. क्रोध आवरा.

कुंभ - आपल्या आवडत्या ठिकाणी भेट द्यावयास मिळाल्यामुळे आनंदित उत्साहित रहाल. जुन्या मित्रमंडळींच्या सहवासात रमाल.

मीन - आपल्याला झेपतील एवढीच कामे करण्याचे वचन इतरांना द्या. शब्दात अडकून नका. व्यापारामध्ये नवीन डावपेच आखावे लागतील.

Thane Election : जागावाटपावरून घमासान सुरूच! भाजपची स्वबळाची चाचपणी; भाजप-सेना बैठक झालीच नाही

BMC आयुक्त आणि MPCB सचिव 'हाजिर हो'! HC चा आदेश; हवा प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरल्याचे म्हणत पालिकेला फटकारले

एकनाथ शिंदे मुंबईत १०० जागांवर ठाम; स्वतंत्र लढण्याचीही रणनीती; भाजपच्या ६० जागांच्या प्रस्तावास नकार

पुण्यात अजित पवारांची काँग्रेसशी ‘हात’मिळवणी? सतेज पाटलांना केला फोन; आघाडीविषयी दोन्ही नेत्यांमध्ये प्राथमिक बोलणीही झाली?

मुख्यमंत्रीपद कायमस्वरूपी नसते! भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा भाजप नेतृत्वाला घरचा आहेर