आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २८ ऑगस्ट २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, August 28, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - समाजामध्ये आपले वर्चस्व वाढणार आहे. अवघड कामे सुद्धा सहज रित्या पूर्ण करण्याची मानसिकता आपल्या मध्ये असणार आहे. पेंडिंग कामे पण पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

वृषभ - आपल्यावर कामाचा ताण असणार आहे.थोड्या प्रकृतीच्या कुरबुरी असल्यामुळे चिडचिड होऊ शकते.आपल्या जोडीदाराशी वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे.

मिथुन - आपल्या कार्यक्षेत्रात चांगल्या प्रकारे वाढ होणार आहे.आपण आपल्या बुद्धी चातुर्याने व कौशल्याने कोणत्याही प्रकारच्या कठीण समस्या चांगल्या प्रकारे सोडवू शकाल.

कर्क - आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या अधिकारांमध्ये वाढ होणार आहे.ज्या व्यक्ती सरकारी नोकरी करतात त्यांना आजचा दिवस अतिशय चांगला आहे.

सिंह -आपल्या कार्यक्षेत्रात काही नवीन योजना आपण अमलात आणण्याचा प्रयत्न करत होता त्या योजना आता कार्यरत होतील. त्यातून सामाजिक आणि आर्थिक फायदा होणार आहे.

कन्या - आज आपल्या मध्ये मनोबल फार कमी असणार आहे. त्यामुळे कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेण्याचे टाळा. व्यापार व्यवसायामध्ये हवे तसे परिणाम मिळणार नाहीत.

तुळ - आपल्या व्यापार-व्यवसायात नवीन योजना अमलात आणू शकता. त्यातून आपल्याला चांगले फायदे मिळू शकतात.आपला जबाबदारीचा व्यवसाय असेल तर त्यामध्ये चांगली वृद्धी होईल.

वृश्चिक - आपल्या जीवनसाथी व बरोबर छोट्या कारणांनी वाद-विवाद होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना आजचा दिवस चांगला आहे. आपल्याला सहकारी व्यक्तींचे सहकार्य मिळणार आहे.

धनु - विद्यार्थी वर्गाला काही नवीन करण्याची प्रेरणा मिळणार आहे. कला क्षेत्रातील व्यक्तींना तसेच लेखकांना चांगली संधी मिळणार आहे. व्यापार व्यवसायामध्ये नवीन नवीन योजना कार्यान्वित कराल.

मकर - आपण आपल्या कार्यक्षेत्रात किंवा खाजगी आयुष्यात प्रत्येक गोष्टी मध्ये सतर्क राहणे आवश्यक आहे. कोणी आपल्या पद प्रतिष्ठेला बाधा आणत नाही ना याची काळजी घ्या.

कुंभ - ज्या जातकांचा व्यवसाय इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे, त्यांना विदेशांमधून नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थितीमध्ये आता पेक्षा चांगली सुधारणा होणार आहे.

मीन - आर्थिक येणी येणार असतील तर ती येतील.कुटुंबीयांसाठी काही खर्च करणार आहात. जास्त खर्च झाला तरी पण त्याच प्रमाणात आपल्याला राहणार आहे.

नेपाळमध्ये ३०० भारतीय बेपत्ता; महापुरातील मृतांची संख्या ३५९; राज्यातील ११४ पर्यटक अडकले, ५३ पर्यटक सुरक्षित

महाराष्ट्राच्या प्रश्नांना द्वेषपूर्ण सरकारी उत्तर

Narali Purnima 2026 Wishes : नारळी पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा! प्रियजनांसोबत शेअर करा मराठी Quotes आणि HD कार्ड्स

Raksha Bandhan 2026 Wishes : राखीच्या धाग्यात प्रेमाची वीण! भावा-बहिणीला पाठवा खास मराठी शुभेच्छा संदेश आणि आकर्षक कार्डस्

Raksha Bandhan 2026 : यंदा रक्षाबंधनाचे ३ शुभ मुहूर्त! जाणून घ्या राखी बांधण्याची योग्य वेळ आणि पूजा पद्धत