आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २९ जानेवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, January 29, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - ज्या व्यक्तींची व्यापार व्यवसायातील भागीदार व्यक्तीची वाद विवाद झाले असतील तर ते संपतील. आपल्या कार्यक्षेत्रात नवीन नवीन कल्पना अमलात आणणे आपल्या दृष्टीने फायदेशीर आहे.

वृषभ - आपल्या व्यापार व्यवसाय मध्ये नवीन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतील. त्या जरी आपल्याला फायद्याच्या वाटल्या तरी निर्णय विचारपूर्वक घेणे फार आवश्यक आहे.

मिथुन - आपल्या व्यापार व्यवसाय या मधले नियोजन खूप चांगले असणार आहे. नवीन योजना कार्यान्वित करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यापारामध्ये चांगला फायदा होणार आहे.

कर्क - आपल्या जवळ आत्मविश्वास भरपूर असणार आहे. आपण आपल्या कार्यक्षेत्रात चांगली प्रगती करणार आहात. कामात चांगले यश आल्यामुळे वरिष्ठ ही खुश असणार आहेत.

सिंह - आपले महत्वाचे उद्दिष्ट आज आपण गाठणार आहात. आपल्यामध्ये प्रचंड ऊर्जा असणार आहे. अधिकारांमध्ये चांगले वाढ होणार आहे. सामाजिक पद आणि प्रतिष्ठा दोन्ही वाढणार आहे.

कन्या - आज आपल्या मेहनतीचे फळ चांगले मिळणार आहे.काहि दिवसापासून चाललेल्या कटकटी आणि त्रास संपूर्णपणे संपणार आहे. प्रगतीचे नवे मार्ग समोर येतील.

तुळ - आपल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. कामामध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी झाल्यासारखे आपल्याला वाटणार आहे.

वृश्चिक - कमी कष्टामध्ये जास्त पैसे मिळवण्याचे मार्ग स्वीकारू नका. त्यामध्ये आपणास त्रास होण्याची शक्यता आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये पूर्ण अभ्यास करूनच निर्णय घ्या.

धनु - आपल्या कार्यक्षेत्रामध्ये अचानक काही अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपण विचलित होऊ नका. पूर्णपणे आत्मविश्वासाने काम करा. अडचणींवर मात होऊ शकते.

मकर - व्यापार व्यवसायातील देण्याघेण्याचे व्यवहार चांगले होतील. आपल्या व्यवसायात सांगली मार्ग मिळणार आहेत. कार्य कुशलतेने काम केल्यास आर्थिक फायदे वाढणार आहेत.

कुंभ - ज्यांचा व्यवसाय हॉटेल आणि रेस्टॉरंट चा आहे त्यांना आजच्या दिवसात चांगला फायदा मिळणार आहे. कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी येणार आहेत.

मीन - घरातील व्यक्तींबरोबर कुठे फिरायला जाण्याचा प्रोग्राम असू शकतो. बेरोजगार व्यक्तींना नोकरी शोधण्याच्या प्रयत्नात यश मिळणार आहे. आजचा दिवस आपल्यासाठी चांगला आहे.

अजित दादा पंचतत्त्वात विलीन! शोकाकूल वातावरणात पार्थ आणि जय पवारांनी दिला मुखाग्नी; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

"दादांना सांगितले होते रात्रीच कारने जाऊ, पण..."; अजित पवारांच्या चालकाला 'त्या' रात्रीचा संवाद सांगताना अश्रू अनावर

Ajit Pawar death : अपघाताची बातमी दादांच्या आईने पाहिली तेव्हा..."मला दादांना भेटायचे आहे!"

'दादा'ला I Love You सांग...; अजित पवारांवर अंत्यसंस्कारापूर्वी बारामती मेडिकल कॉलेजबाहेर कार्यकर्त्याने फोडला हंबरडा, भावूक Video

एका चुकीबद्दल अन्नपाण्याविना केला होता आत्मक्लेश; यशवंतरावांचे स्मृतिस्थळ होते अजितदादांचे शक्तिस्थळ!