आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २९ नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, November 29, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमुळे आपला गोंधळ उडू शकतो पण शांतपणे विचार केल्यास व निर्णय घेतल्यास योग्य व | अचूक मार्ग सापडेल घाईगर्दीत कोणतेही निर्णय घेऊ नका.

वृषभ - कौटुंबिक सुख मिळून कुटुंबातून तसेच बाहेरून सुवार्ता मिळतील त्यामुळे कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. अनपेक्षित रित्या काही मान्यवरांच्या मुलाखती आश्चर्यचकित करू शकतात.

मिथुन - सहकुटुंब सहपरिवार तसेच मित्रमंडळींच्या बरोबर जवळचे तसेच दूरचे प्रवास करू शकाल प्रवासाचा आनंद घेऊ शकाल प्रवास कार्य सिद्ध राहतील. खर्चाचे प्रमाण वाढू शकते.

कर्क - अति आत्मविश्वासामुळे अविचारी धाडस करू नका त्यात नुकसान संभवते लहान-मोठ्या आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगणे गरजेचे ठरेल. तज्ञांचा सल्ला उपयोगी पडेल.

सिंह - आपल्याला नवीन नवीन कल्पना सुचवून त्याप्रमाणे आपल्या घरा मध्ये बदल करू शकाल घराच्या सुशोभीकरणासाठी खर्च मुक्तहस्ते कराल आरोग्य चांगले राहील.

कन्या - आत्मविश्वास वाढल्यामुळे आपल्या कामात एक गतिशीलता येईल अशक्य वाटणारी कामे केवळ आपल्या | बोलण्याने आपण पूर्ण कराल.

तुळ - आपल्या बोलल्याने व आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावाने इतरांकडून आपण आपली महत्त्वाची कामे सहजपणे करू शकाल पण अतिआत्मविश्वास नको. कोणालाही गृहीत धरू नका.

वृश्चिक - मित्र आप्तेष्ट नातेवाईक यांचे शी संपर्क राहील एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन होऊ शकते सामाजिक कार्यात रस घ्याल. आपले चातुर्य वापरून आपण आपली कामे करून घ्याल.

धनु - आपल्या अधिकाराचा योग्य वापर करा तसेच आपल्या अधिकार कक्षा ओळखून त्यानुसारच कामे पूर्ण करा. लहान मोठी प्रलोभने टाळून होणारी बदनामी टाळता येईल.

मकर - दीर्घकाळ रखडलेली कामे, स्थायी संपत्ती विषयक कामे वडिलोपार्जित मालमत्तेसंबंधी असलेली कार्ये गतिमान होऊन पूर्णत्वाकडे जातील. घरी अचानक पाहुणे येऊ शकतात.

कुंभ - जुन्या गुंतवणुका भरघोस आर्थिक फायदा करून देतील नवीन गुंतवणूक करताना तज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यायला चुकू नका अर्थ मान उंचावेल विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळेल.

मीन - आपले म्हणणे इतरांना पटवून देण्यात यश मिळेल. त्यामुळे आपली महत्त्वाची कामे आपण पूर्ण करून घ्या. कौटुंबिक सुख मिळेल कुटुंबा बरोबर सहलीचा आनंद घ्याल.

Mumbai : लोकल प्रवाशांची गैरसोय होणार! मध्य रेल्वेसह ट्रान्स हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवरही दुरुस्तीची कामे, वाचा सविस्तर

RBI ATM Rules : एटीएममधून पैसे काढणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; मोफत व्यवहार, शुल्क आणि अलर्टबाबत नवे नियम

Bisleri Water Controversy : बिस्लेरीच्या अडचणीत वाढ; पाण्याच्या नमुन्यात बॅक्टेरिया, FSSAI कडून पुन्हा कारवाई

Afghanistan Blast : अफगाणिस्तानमध्ये शाळेजवळ भीषण स्फोट; ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू, ९७ जण जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

वडा खायला घेतला अन् दाताखाली आला लोखंडी बोल्ट; 'वंदे भारत'मधील प्रवाशाचा VIDEO व्हायरल, IRCTC ने दिली प्रतिक्रिया