आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, ३१ जुलै २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, July 31, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - इतरांची मते न पटल्यामुळे वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. त्यापासून लांब राहणे हितकारक आहे. कोणत्याही प्रकारे टोकाची भूमिका घेऊ नका. अचानक धनलाभाचे योग आहे.

वृषभ -जोडीदाराचे योगदान फार महत्त्वाचे असणार आहे. जोडीदाराच्या सल्ल्याने वागण्या तच आपले भले आहे. छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे.

मिथुन - कोणते महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी खूप विचार करणे आवश्यक आहे. नंतर पश्चाताप करण्याची पाळी येऊ नये असे निर्णय होणे आवश्यक आहे.

कर्क - विरुद्ध लिंगी व्यक्तीचे आकर्षण वाटणार आहे त्याचे रूपांतर प्रेमात होऊ शकते. आर्थिक लाभासाठी मेहनतीला पर्याय नाही मित्रमंडळींच्या घोळक्यात आपण रमून जाणार आहात.

सिंह - घरातील छोटे-मोठे वाद विवाद ज्येष्ठांच्या मदतीने संपुष्टात येणार आहेत . विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार आहे. उच्च शिक्षणाची द्वारे खुली होणार आहेत. मनाप्रमाणे प्रवेश घेता येईल.

कन्या - आपण घेतलेले निर्णय फायदेशीर ठरणार आहेत परंतु मनापेक्षा व्यवहाराचा जास्त विचार करणे आवश्यक आहे. वय वाढले तरी आपण कायमच तरुण रहाण्यात वाकबगार आहात.

तुळ -आपल्याकडे असणारी उत्तम बुद्धिमत्ता याचा वापर आपण अतिशय चांगला करणार आहे आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. प्रिय व्यक्तींना भेटण्यास अनुकूल कालावधी आहे.

वृश्चिक - आजची कामे आत्मविश्वासात पूर्व करण्याची गरज आहे. घरातील व्यक्तींची मन सांभाळा. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये नवीन कामे मिळण्याची शक्यता आहे.

धनु - कोणतेही निर्णय विचारपूर्वक घेणे. घाई गर्दीत काम करू नये. व्यवसायामध्ये जपून व्यवहार करणे आवश्यक आहे फसवणूक होण्याची शक्यता आहे.

मकर - योग्य ठिकाणी बुद्धी वापरली तर आपल्या हातून उच्च पराक्रम घडून येण्याचे योग आहेत. इतर लोक आपल्या मताचा आदर करणार आहेत.

कुंभ - नवीन योजना कार्यान्वित करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आपणास गुरूचा आशीर्वाद मिळणार आहे आपले निर्णय योग्य ठरणार आहेत. महत्त्वाची कामे मार्गी लावणार आहात.

मीन - नोकरीमध्ये अपेक्षित बदल होणार आहेत. सुवी सुविधांमध्ये वाढ होणार आहे.एखाद्या कार्यक्रमाला केव्हा समारंभाला जाणे होईल.नातेवाईक किंवा नवीन ओळखी होतील.

शिक्षण व्यवस्थेला जडलेला पेपरफुटीचा कॅन्सर

घरातील बाथरूममध्ये ठेवा एक वाटी मीठ; छोटा उपाय ठरू शकतो फायदेशीर

पायांची खाज काही केल्या थांबत नाही? घरच्या घरी करा 'हे' उपाय, मिळेल झटपट आराम

CJP Protest : 'अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन चालवण्याचा पोलिसांना अधिकार'; RAF च्या दारुगोळा वापराच्या नोंदी जतन करा - SC

'तुम्ही पतंजलीवर लक्ष द्या नाहीतर बंद पडेल'; रामदेव बाबांना अभिजीत दिपकेंचे प्रत्युत्तर