मेष - काही नवीन कामे हाती घ्याल.व्यवसाय धंद्यात काही बदल घडतील कुटुंबातील सदस्यांशी सामंजस्याने वागण्याची गरज. इतरांच्या मताला प्राधान्य द्या. आर्थिक आवक चांगली राहील.
वृषभ -आपल्या हातातील कामांना गती मिळेल. दीर्घकाळ एखादे रखडलेले काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असेल. विद्यार्थ्यांना उत्तम दिवस. अपेक्षित यश मिळेल.
मिथुन - कुटुंबातील समस्यांवर चर्चेने तोडगा काढता येईल. नोकरी व्यवसाय धंद्यात समाधानकारक परिस्थिती राहील. प्रवासाचे नियोजन कराल. कामाचा ताण पडेल.
कर्क -अवघड वाटणारे काम पूर्ण करण्यात यश मिळेल ओळखी मध्यस्थी उपयोगी पडतील. नशिबाची साथ राहील. आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा.
सिंह - व्यावसायिक क्षेत्रात प्रगती दिसेल. उलाढाल वाढून नफ्याचे प्रमाण वाढेल. इतरांचा सल्ला उपयोगी पडू शकतो. कौटुंबिक सुख लाभेल.
कन्या - कामानिमित्त लहान-मोठे प्रवास घडण्याची शक्यता आहे. आपल्या कार्यक्षेत्रात अधिकारांचा योग्य वापर उचित ठरेल. लहान सहान कारणांवरून वाद-विवाद करू नका.
तुळ -आर्थिक बाबतीतील चिंता अथवा समस्या संपुष्टात येतील कौटुंबिक समाधान लाभेल. नवीन कामे मिळतील. स्वतःसाठी काही खरेदी करू शकाल.
वृश्चिक -आरोग्याकडे लक्ष देणे हिताचे ठरेल सकारात्मक विचारांच्या व्यक्तींच्या सहवासात राहणे हिताचे ठरेल. कुटुंबामध्ये ज्येष्ठांच्या म्हणण्याला प्राधान्य द्या.
धनु - स्वप्नांमध्ये रमुन जाल. सरकारी कामे विलंब लावू शकतात मात्र निराश न होता आपल्या प्रयत्नांमध्ये कमी पडू देऊ नका. जुन्या ओळखींचा फायदा होईल.
मकर - मित्रमंडळींच्या मध्ये मजेत दिवस घालवाल लहान-मोठ्या प्रवासाचे बेत नक्की होतील. सामाजिक अथवा धार्मिक कार्यात रस निर्माण होईल.
कुंभ - दिवसाचा बराचसा वेळ कुटुंबासाठी द्यावा लागेल घरातील कामे पूर्ण कराल तसेच घरातील सदस्यांसाठी नवीन खरेदी करू शकाल. नातेवाईक आप्तेष्ट यांच्या गाठीभेटी होतील.
मीन -आपल्या छंदासाठी अथवा कलेसाठी वेळ द्याल आपल्या आवडत्या गोष्टी पूर्ण कराल. मनोरंजनाकडे कल राहील. खर्चात वाढ होऊ शकते.