आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, ४ जानेवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, january 4, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - दुपारपर्यंत आर्थिक व्यवहार करून घ्या. चांगले फायदे होतील. नातेवाईकांचे सहकार्य लाभणार आहे. प्रवास होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये अनुकूल दिवस जाणार आहे.

वृषभ - कोणत्याही कामाची घाई गर्दी करू नका. एका वेळेस एकच काम करा. कामामध्ये चूक होऊ देऊ नका. आत्मविश्वासपूर्वक काम केल्यास चांगली होणार आहेत.

मिथुन - आपले मनोबल कमकुवत असणार आहे. आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे. उद्योग व्यवसायासाठी गुंतवणूक करू नका. मानसिक त्रास आणि दुःख होण्याची शक्यता आहे.

कर्क - आपण नवीन कार्यक्षेत्रामध्ये काम करायचे ठरवले असेल तर त्यामध्ये अडचणी येणार आहेत. खर्च वाढू शकतो. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपण खूप व्यस्त राहणार आहात.

सिंह - तुमची स्वयंशिस्त आणि स्वयम् निरीक्षण आणि स्वतःवरचे नियंत्रण हे आपणास फायदेशीर ठरणार आहे. वरिष्ठ अधिकारी यांच्याशी तुमचे संबंध मैत्रीपूर्ण राहणार आहेत.

कन्या - आजचा दिवस आपल्यासाठी समाधान कारक असणार आहे. जास्त काम करावे लागले तरी त्याचे फायदे त्याच प्रमाणात मिळणार आहेत.

तुळ - मित्र व सहकार्य यांच्याशी चांगले संबंध राहणार आहे. नोकरीमध्ये चांगली प्रगती होईल. प्रवासाची शक्यता आहे. प्रवास फायदेशीर ठरणार आहे.

वृश्चिक - मनातील निराशा काढून टाकण्याची गरज आहे. कोणतेही काम विचारपूर्वक करणे आवश्यक आहे. आर्थिक दृष्ट्या आजचा दिवस ठीकठाकच असेल.

धनु - आपला भागीदारीचा जर व्यवसाय असल्यास आपल्याला स्वतःला लक्ष देणे फार आवश्यक आहे. भागीदारीच्या चुकीमुळे आपले नुकसान होऊ देऊ नका.

मकर - वादविवादाचे प्रसंग येण्याची शक्यता आहे. आज आपल्या मन उदरिया ची परीक्षा आहे. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

कुंभ - आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण त्यांना वेळ देणार आहात. काही महत्त्वाच्या निर्णयासाठी आपले मत महत्वाचे ठरणार आहे.

मीन - आजचा दिवस आपल्या कष्टाचे फळ निर्माण करणारा आणि प्रयत्नांना यशस्वी करून देणार आहे. प्रसिद्ध व्यक्तींच्या सहवासात येणार आहात.

१५ जानेवारीला मतदानासाठी सुट्टी, सवलत नाही? 'या' क्रमांकावर साधा संपर्क

Navi Mumbai Election : "... अन्यथा नाईकांचा 'टांगा' कुठे फरार होईल कळणार नाही", शंभूराज देसाई यांचा इशारा

'लाडकी बहीण'चे पैसे निवडणुकीनंतरच द्या! काँग्रेसचे राज्य निवडणूक आयोगाला पत्र

KDMC Election : पहिल्याच दिवशी ३११ कर्मचाऱ्यांनी बजावला टपाली मतदानाचा हक्क

BMC Election : मुंबई फक्त राजकीय आखाडाच आहे का?