मेष - स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवून पुढे जा. मात्र जास्त आक्रमक होऊ नका. आपल्या अधिकाराचा वापर योग्य कारणासाठी होणार आहे. समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याला भुलू नका.
वृषभ - चांगल्या विचारांना पाठबळ मिळणार आहे लोकांना मदत करणार आहात. विचारांच्या व्यक्तींच्या सहवासात येणार आहात. नोकरीमध्ये चांगला दिवस जाणार आहे. आर्थिक प्रगती होईल.
मिथुन - आर्थिक चणचण संपणार आहे. उधारी वसूल होईल. व्यापार व्यवसायामध्ये नफ्याचे प्रमाण वाढणार आहे.उत्साहाने कामाला सुरुवात करणार आहात.आवडती व्यक्ती भेटेल.
कर्क - मनावरील दडपण कमी होणार आहे.नोकरीतील स्थिती मनाप्रमाणे राहणार आहे.नवीन कामे समोर दिसतील, पण करावी की नाही अशी मनाची अवस्था राहणार आहे.हे निर्णय पुढे ढकला.
सिंह - नवीन नवीन परिचय होणार आहेत. सामाजिक प्रतिष्ठा वाढणार आहे. नवीन प्रकल्प कार्यान्वित होतील. प्रवासाचे योग येण्याची शक्यता आहे. प्रवास सुखकर होणार आहेत.
कन्या - सकारात्मक विचार असलेल्या व्यक्तींच्या सहवासात राहा चांगले विचारांनी प्रभावित राहाल वैवाहिक जीवनात वाद-विवाद संभवतात. शासकीय कामे पुढे ढकलावी. नव्या गुंतवणुका नको.
तुळ - आपल्या हातून चांगले काम होणार आहे. घरातील व्यक्ती आपणास मानसन्मान देणार आहेत.कुटुंबासाठी खर्च होणार आहे. घरातील जुनी कामे मार्गी लावाल. शांता व स्थिरपणे काम कराल.
वृश्चिक - नवीन कामांकडे नीट लक्ष द्यावे लागणार आहे.अचानक समोर येणाऱ्या कामांना सामोरे जावे लागणार आहे.आपण चांगल्या प्रकारेनवीन कामे हाताळाल.आज आपणास चांगले यश मिळेल.
धनु -आपल्या आत्मविश्वासाला तडा जाऊ देऊ नका. कामात अडथळे आले तरी आपण सातत्याने काम करून त्यामध्ये यश मिळवाल.
मकर -आपल्या मताचा सर्वजण आदर करणार आहेत.व्यापार व्यवसायामध्ये सुधारणा होणार आहे.भागीदार यामुळे व्यवसायात प्रगती होईल.आर्थिक फायदा होणार आहे.
कुंभ - आरोग्याची काळजी घ्या. अडलेली कामे मार्गी लागण्यासाठी सहकाऱ्यांची मदत घ्यावी लागणार आहे. नवीन कामे हाती घेऊ नका. नवीन कामांमध्ये अडचणी संभवतात.
मीन - नवीन कामात पूर्ण लक्ष द्या. चांगली काम होतील. आनंद मिळेल. उत्तम लिखाण वाचन होईल. न बोलता कामे करा. आर्थिक लाभ होणार आहेत. संततीकडून सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना यश.