मेष - कार्यक्षेत्राची व्याप्ती वाढल्याने कामाचा ताण आणि दगदग जाणवेल. एका वेळेस एकाच कामाला महत्त्व द्या अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ दवडू नका.
वृषभ - कुटुंबातील तरुण-तरुणींचे विवाह बद्दलच्या वाटाघाटी यशस्वी होतील मंगलकार्य ठरेल. नातेवाईक आप्तेष्ट यांचे सहकार्य लाभेल कुटुंबासाठी वेळ देऊ शकाल. आनंदी वातावरण राहिल.
मिथुन - मानसिक स्वास्थ्य लाभल्यामुळे महत्त्वाची कामे पूर्ण कराल. प्रवासात वाहनाच्या वेगावर ती नियंत्रण आवश्यक आपल्या समोरील कामे जिद्द व चिकाटीने पूर्ण करा
कर्क - नातेवाईक तसेच मित्रमंडळी यांना आपल्या मदतीची गरज भासेल आपण ती मदत उपलब्ध करून द्याल. आपल्या कार्यक्षेत्रात आपण आत्मविश्वासाने कार्यरत राहणार आहात.
सिंह - महत्त्वाचे आर्थिक कामे पूर्ण करू शकाल. जुन्या गुंतवणुका भरघोस आर्थिक फायदा करून देतील नवीन गुंतवणूक करण्याची इच्छा होईल मात्र तज्ञांचा सल्ला आवश्यक ठरेल.
कन्या - दैनंदिन कामात सुयश लाभल्यामुळे उत्साह वाढेल आपल्या समोरील कामे आपण वेगाने पूर्ण करू शकाल काही बाबतीमध्ये महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. नुकसान संभवते.
तुळ - अनावश्यक खर्चाला कात्री लावणे हितकारक ठरेल मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे परंतु आपण गोंधळात न पडता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे हितकारक ठरेल.
वृश्चिक - व्यवसाय-धंद्यात अचानक धनलाभ संभवतो नवीन करार मदार होऊ शकतात त्यासाठी जवळचे प्रवास करावे लागतील जुनी व्यवसायिक नाती नव्याने प्रस्थापित होतील.
धनु - रखडलेली कामे मार्गी लावू शकाल त्या कामांसाठी ओळखी मध्यस्थी उपयोगी पडतील इतरांची मदत मिळेल. आप्तेष्ट नातेवाईक यांच्या गाठीभेटी होऊ शकतात. धार्मिकतेचे मध्ये रस घ्याल.
मकर - लहान-मोठ्या प्रवासाचे योग सहकुटुंब सहपरिवार प्रवासाच्या नियोजनामध्ये भाग घ्याल रखडलेली कामे पूर्ण करू शकाल तसेच धनलाभाचे योग.
कुंभ - काही वेळेस अप्रिय निर्णय स्वीकारावे लागतील त्यामुळे मनस्ताप होण्याची शक्यता शांतपणे परिस्थितीचे अवलोकन करून महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. कोणाशीही वाद-विवाद करू नका.
मीन - आरोग्य उत्तम राहील यामुळे उत्साहाने आपल्या पुढील कामे पूर्ण करू शकाल मानसिक स्वास्थ्य लाभेल जिद्द व चिकाटी वाढेल. कौटुंबिक सुख लाभेल कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळणार आहे.