अभिजीत दिपके यांच्या आजीचं निधन; नातू दिल्लीत पोलिसांच्या ताब्यात, अंत्यसंस्कारासाठी गावी परतण्याची शक्यता

Abhijeet Dipke's Grandmother Passes Away : सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या आजी सावित्रीबाई दिपके यांचे हिंगोलीत निधन झाले.
अभिजीत दिपके यांच्या आजीचं निधन; नातू दिल्लीत पोलिसांच्या ताब्यात, अंत्यसंस्कारासाठी गावी परतण्याची शक्यता
Published on: 

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने (CJP) आज, शनिवारी (दि. १०) दिल्लीत जंतर-मंतर येथे आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनासाठी दिल्लीत पोहोचलेले सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना विमानतळावरच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एकीकडे दिल्लीत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला असतानाच दुसरीकडे दिपके कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिजीत दिपके यांच्या आजी सावित्रीबाई शंकर दिपके यांचे आज सकाळी निधन झाले. हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी या मूळ गावी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दीर्घ आजाराने आजींचं निधन

सावित्रीबाई दिपके गेल्या काही महिन्यांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. मात्र, शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. अभिजीत दिपके दिल्लीतील आंदोलनासाठी गेले असतानाच त्यांच्या आजींच्या निधनाची बातमी समोर आली. सावित्रीबाई यांनी नातवाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांसह संतुक पिंपरी परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

अभिजीत दिपके यांच्या आजीचं निधन; नातू दिल्लीत पोलिसांच्या ताब्यात, अंत्यसंस्कारासाठी गावी परतण्याची शक्यता
CJP Protest : अभिजीत दिपकेंसह सीजेपीच्या कार्यकर्त्यांना विमानातच घेतले ताब्यात; आंदोलनापूर्वी दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

अंत्यसंस्कारासाठी दिपके गावी परतणार?

मिळालेल्या माहितीनुसार, सावित्रीबाई दिपके यांच्या अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीय हिंगोलीतील संतुक पिंपरी येथे जाणार आहेत. अभिजीत दिपके हेदेखील आजींच्या अंत्यसंस्कारासाठी दिल्लीतून महाराष्ट्रात परतण्याची शक्यता आहे. मात्र, ते सध्या दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असल्याने त्यांना गावी परतण्यासाठी परवानगी मिळणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे अभिजीत दिपके आजींच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकणार का, याकडे लक्ष लागले आहे.

logo
marathi.freepressjournal.in