मेष - आपल्या आजचे कार्य उत्साहाने पार पाडला, प्रत्येक कार्यामध्ये नियोजन असल्यामुळे निश्चित सफलता मिळणार आहे. आपली देणी देऊन टाकल्यामुळे समाधान लाभेल.
वृषभ - घरी पाहुण्यांची ये- जा असू शकते.त्यांच्यासाठी पाहुणचार करावा लागेल. कौटुंबिक सौख्य मनासारखे लाभेल. उधारी उसनवारी वसूल होऊ शकते. आर्थिक फायदे होतील .
मिथुन -आरोग्य उत्तम राहणार आहे. मानसिक चिंता निघून जाईल. त्यामुळे मन प्रसन्न राहणार आहे. निर्णय घेताना मात्र विचारपूर्वक घ्यावेत. कार्यक्षेत्रामध्ये सुसंधी लाभणार आहे.
कर्क - दुसऱ्याच्या बोलणे जास्त मनावर घेऊ नका. उगाचच मनाला निराशा येण्याची शक्यता आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मात्र शांतपणे आणि विचारपूर्वक निर्णय घ्या.
सिंह - आजचे आपले कार्यक्षेत्रातील आपले अंदाज अचूक ठरतील. आपल्या नोकरीतील स्थिती चांगली असणार आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभणार आहे.
कन्या - आपली नियोजित कार्य निर्विघ्न पार पडतील. आपणास अधिकार मिळतील, सार्वजनिक कामात रस घ्याल, त्याच्यामध्ये प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे. नोकरदारांची स्थिती चांगली राहणार आहे.
तुळ -आर्थिक आवक चांगली राहील धार्मिक कार्यामध्ये विशेष रस घ्याल. प्रवास होतील, प्रवास आनंदाचे होणार आहेत. एखादी मनासारखे घटना घडेल.
वृश्चिक - काही सहकार्यांची गैरसमज होऊ शकतात. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. आराम करणे आवश्यक आहे. भविष्याची चिंता करणे सोडा त्यामुळे मनावरचे ओझे हलके झाल्यासारखे वाटेल.
धनु -घरातील वातावरण चांगले असेल. जोडीदाराशी संबंध मधुर राहतील. आर्थिक आवक चांगली असणार आहे. नोकरीमध्ये काम जास्तीत जास्त असू शकते.आज प्रवास शक्यतो टाळा.
मकर - आजोळ कडच्या व्यक्तींची भेट होण्याची शक्यता . नोकरीमध्ये चांगली संधी मिळेल. नोकरीमध्ये काही गोष्टी पटणार नाही त्या सोडून द्या, उगाच त्याचा विचार करू नका.
कुंभ -विद्यार्थ्यांना नवीन शिक्षण क्षेत्रात शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. त्या दृष्टीकोनातून सकारात्मक विचार पुढे केल्यास फायदे होतील. मानसिक प्रसन्नता मिळणार आह. लाभ होतील.
मीन -नोकरी-व्यवसायात चांगली स्थिती राहील. वाद मात्र टाळा. संयम आवश्यक आहे. जास्त दगदग करू नका. आर्थिक आवक चांगली राहील. भवितव्याची निष्कारण काळजी करू नका.