आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, ९ जून २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, June 9, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - गृहसौख्य चांगले राहील आरोग्य उत्तम राहील जीवनसाथीची चांगली साथ राहील आर्थिक व्यवहार सांभाळून करा. काही वेळेस महत्त्वाच्या कामांना विलंब लागू शकतो.

वृषभ - जीवनसाथी साथ मिळेल. नातेसंबंधात माधुर्य राहील. नातेवाईक आप्तेष्ट यांच्यामध्ये एखाद्या विषयावरून गैरसमज निर्माण होऊ शकतात.

मिथुन - कुटुंबातील मुला-मुलींना उत्तम संधी मिळून त्यांचा नोकरीविषयक प्रश्न सुटेल त्यांची प्रगती होईल घरातील सदस्यांशी समन्वय तसेच सुसंवाद राहील.

कर्क - व्यवसाय धंदा अथवा नोकरी मध्ये भाग्यकारक घटना घडून भाग्योदय होईल. कुटुंबामध्ये काही नवीन गोष्टी घडतील आर्थिक स्थिती चांगली राहील. खरेदी करू शकाल.

सिंह -आर्थिक परिस्थिती चांगली राहील. नवीन गुंतवणूक करता येईल. मात्र नवीन गुंतवणूक करताना सतर्क राहा नोकरीत बदलाची शक्यता. एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सक्रिय भाग घ्याल.

कन्या - महत्त्वाच्या कामात यश मिळेल हातातील कामे पूर्ण करू शकाल महत्वाच्या कामासाठी प्रवास करावा लागेल आर्थिक आवक चांगली राहील जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल.

तुळ - धार्मिक अथवा सामाजिक कार्यात सक्रिय योगदान द्याल सामाजिक मानसन्मान वाढेल .नोकरीत चांगली परिस्थिती राहील आपले महत्त्व वाढेल मित्रमंडळींच्या वर्तुळात प्रिय व्हाल.

वृश्चिक - कुटुंबातील मुलामुलींच्या समस्या समजावून घ्या महत्त्वाच्या कामात अडथळे येऊ शकतात. प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे कायद्याची बंधने पाळा. वाहने जपून चालवा.

धनु - नोकरीमध्ये समाधानकारक परिस्थिती राहील मिळकतीचे प्रमाण चांगले राहील महत्त्वाच्या कामात अडथळे येऊ शकतात विलंब लागू शकतो त्यामुळे थोडे संयमाने वागणे गरजेचे ठरेल.

मकर - आपल्या कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व राहील महत्त्वाच्या कामासाठी आपला विचार केला जाईल. कौटुंबिक आघाडीवर किरकोळ कारणांवरून वाद विवाद घडू शकतात.

कुंभ - नोकरीत बदल हवा असल्यास त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केल्यास ते सफल होतील काहींना नवीन कामे मिळतील व्यवसायात धाडसी निर्णय घ्यावे लागतील.

मीन - लहान मोठ्या प्रवासाची शक्यता प्रवासात सावधानता बाळगावी व्यवसायात आर्थिक मदतीची गरज भासू शकते आरोग्याची काळजी घेणे हितकारक ठरेल.

मशरूमपासून बनवा भन्नाट स्टार्टर; प्रत्येक घासात मिळेल चीजी स्वाद

'तात्काळ देश सोडा'; इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट, भारत सरकारकडून महत्त्वाच्या सूचना

पृथ्वीकडे येतंय शक्तिशाली सौर वादळ; मुंबईकरांना दिसणार का दुर्मिळ 'ऑरोरा'?

पावसाळ्यात डेंग्यू-मलेरियापासून बचावासाठी घरात काय काळजी घ्याल?

शिल्पा शेट्टीच्या वाढदिवसानिमित्त पती राज कुंद्राची खास पोस्ट; 'माझी देवी' म्हणत शेअर केला Video