मेष : आरामदायी वस्तूंवर आणि शान शौकीच्या वस्तूंवर खर्च होण्याची शक्यता आहे. आपली बचत होणे कठीण वाटते.लहानसहान गोष्टींवरून भांडणे आणि गैरसमज टाळा.
वृषभ : कल्पक आणि बौद्धिक ऊर्जेच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूलन असणार आहे. तुमच्या कामाला एक कलाप्रकार म्हणून समजून अनेक नवीन प्रकल्प अमलात आणाल.
मिथुन : कौटुंबिक आयुष्यामध्ये चांगले वातावरण राहील आरोग्याच्या दृष्टिकोनातून घरच्या ज्येष्ठांचे कुरबुरी राहतील. आपल्या प्रयत्नांना यश येणार आहे. नवीन कामाला गती येईल.
कर्क : कार्यक्षेत्रात विस्तार करण्याचा विचार असल्यास जरूर करा. चांगली बातमी समजणार आहे. नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी येतील. वसायिकांना परदेशातून काही फायदे मिळण्याची शक्यता.
सिंह : आपली मानसिकता उत्तम असणार आहे. आत्मविश्वासाचे प्रमाण वाढणार आहे. घरामध्ये महत्त्वाच्या कार्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. आपल्या कार्यक्षेत्रातून चांगली लाभ मिळतील.
कन्या : तुमच्याकडे संधी चालून येणार असली तरी याचा लाभ घेता येणार नाही. घरातील व्यक्तींची आरोग्याची समस्या उद्भवू शकतात. दूरचे प्रवास संभवतात. प्रवास टाळणे हितकारक राहील .
तुळ : आजचा दिवस संमिश्र घटनांचा काळ आहे. आरोग्याच्या किरकोळ तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काही कठीण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. धाडसाने काम करा.
वृश्चिक : तुमच्या व्यक्तिमत्वात अहंकाराचा समावेश होण्याची शक्यता आहे. आज कार्यामध्ये धाडसाने आपण काम करणार आहे. आर्थिक फायदा चांगला होणार आहे. लोकांशी संवाद चांगला.
धनु : नोकरी व्यवसायामध्ये आशादायक कामे राहणार आहे. नोकरीच्या ठिकाणी आपणास महत्त्व रहीर. तुम्ही धोका पत्करून काम कराल.कोणत्याही परिस्थितीतआपणास यश मिळणार आहे.
मकर : आपल्याशी संबंधित असलेल्या कार्यामध्ये आपणास सहज यश मिळणार आहे.संस्कृतीक कार्यक्रमात सहभागी होणार आहात. सहकारी व्यक्तींकडून आपल्याला सहकार्य मिळणार आहे.
कुंभ : आपल्या कार्यक्षेत्रामध्ये भरपूर ताण येऊ शकतो. प्रयत्न करूनही यश न मिळाल्याने मानसिक त्रास होणार आहे. आपण स्वतःचे खच्चीकरण होऊ देऊ नका. प्रयत्नांची साथ सोडू नका.
मीन : आपल्या सहकार्यामुळे आपल्या कामात गती येणार आहे. नोकरीमध्ये सर्वसाधारण परिस्थिती असणार आहे. व्यापार व्यवसायिकांना व्यापार वाढवण्याची संधी उपलब्ध होईल.