एमपीएससी पेपरफुटी प्रकरण: आयोगाच्या अधिकाऱ्याला अटक; मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या कथित प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील सहाय्यक कक्ष अधिकारी रोहित कोलटक्के याला नवी मुंबईतून अटक केली आहे.
एमपीएससी पेपरफुटी प्रकरण: आयोगाच्या अधिकाऱ्याला अटक; मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई
एमपीएससी पेपरफुटी प्रकरण: आयोगाच्या अधिकाऱ्याला अटक; मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाईप्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

पूनम अपराज/मुंबई :

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या कथित प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील सहाय्यक कक्ष अधिकारी रोहित कोलटक्के याला नवी मुंबईतून अटक केली आहे.

कोलटक्के याने एमपीएससीचे अवर सचिव अभिजीत लेंडवे यांच्याकडून अडीच लाख रुपये देऊन प्रश्नपत्रिका मिळवल्याचा आरोप आहे. त्याने ही प्रश्नपत्रिका अन्य उमेदवारांना किंवा मध्यस्थांना विकली होती का, याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

एमपीएससी पेपरफुटी प्रकरण: आयोगाच्या अधिकाऱ्याला अटक; मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई
MPSC वरील आरोपांची न्यायालयीन चौकशी; आयोगाच्या सचिवांची बदली होणार

कोलटक्केला आज अटक झाल्याने या प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या १३ झाली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागांतर्गत औषध निरीक्षक पदाच्या १५४ जागांसाठी एमपीएससीने २२ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्रातील सहा केंद्रांवर छाननी परीक्षा घेतली होती.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in