राशीभविष्य

२ मेचे राशीभविष्य

तुमच्यासाठी कसा आहे आजचा दिवस? जाणून घ्या.

Swapnil S

मेष : वैवाहिक सुख लाभून संतती सौख्य मिळेल. व्यवसाय धंद्यातील रखडलेली जुनी येणी वसूल होतील. आजूबाजूला अनुकूलता भरून राहिल्याने उत्साह आणि उमेद वाढेल.

वृषभ : आपल्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडून आपली महत्त्वाची कामे पूर्ण करून घेण्यात यशस्वी व्हाल. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपल्या मित्रमंडळींची/ मान्यवरांची मदत.

मिथुन : काही महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे निर्माण झाल्यासारखे वाटू शकतात पण जिद्द आणि चिकाटी ठेवणे गरजेचे आहे हे कार्यमग्न रहा. इतरांवर डोळे झाकून विश्वास ठेवणे धाडसाचे ठरेल.

कर्क : नोकरीमध्ये वरिष्ठांचे तसेच सहकार्‍यांचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे लाभेल काही महत्त्वाचे बदल घडू शकतात ते बदल आपल्याला फायदेशीर ठरतील आर्थिक लाभ होतील.

सिंह : समाजातील सन्माननीय व मान्यवरांच्या ओळखी होतील लोक संग्रहामध्ये वाढ होईल. एखाद्या समारंभात मानाचे स्थान भूषविता येईल. अर्थप्राप्ती बरोबर प्रसिद्धी सुद्धा मिळेल गुरुकृपा लाभेल.

कन्या : आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात प्रकृतीकडे लक्ष द्या. शत्रु हितशत्रूंच्या कारवाया मध्ये वाढ होऊ शकते. परंतु त्याकडे लक्ष देऊ नका. आपल्या कार्यात मग्न रहा.

तुळ : नोकरीत समाधानकारक परिस्थिती राहून वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील. एखादी विशेष महत्त्वाची जबाबदारी आपल्याला पार पाडावी लागेल. लहान मोठे प्रवास सुद्धा करावे लागतील.

वृश्चिक : खर्चाच्या प्रमाणात वाढ होईल अनावश्यक खर्च नको. व्यापार-व्यवसायात अचानक काही खर्चिक बाबी पुढे येतील. सरकारी स्वरूपाच्या कामात यश मिळेल काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

धनु : वर्तमानात असलेल्या आरोग्याच्या तक्रारी दूर होऊन आरोग्य सुधारेल शासकीय स्वरूपाची कामे पूर्ण होतील ओळखी मध्यस्थी उपयोगी पडतील त्यासाठी थोडा खर्च करावा लागेल.

मकर : स्थायी संपत्ती अथवा जमीन-जुमला याबद्दलची कार्ये गतिशील होतील वडिलोपार्जित संपत्ती विषयक असलेले वाद मिटू शकतात. सरकारी कामे होतील मानसन्मान प्रतिष्ठा लाभेल.

कुंभ : दैनंदिन कार्यात अडथळे निर्माण झाल्याने ती कार्य पूर्ण करण्यासाठी जिद्दीने आणि चिकाटीने कार्यरत रहाल. काहींना दूरचे तसेच जवळचे प्रवास करावे लागतील.

मीन : व्यवसाय धंद्यातील जुनी येणी वसूल होतील आर्थिक परिस्थिती सुधारेल जुन्या गुंतवणुका लाभ देतील नवीन गुंतवणूक करण्याआधी त्या त्या क्षेत्रातील तज्ञ मंडळींचा विचार विमर्श घेणे महत्त्वाचे ठरेल.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस