राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, ११ ऑक्टोबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, October 11, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आपले कार्य वाढवण्यासाठी आपणास सु संधी मिळणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात यश मिळणार आहे. तसेच प्रसिद्धी ही आपणास मिळू शकते. नवीन कामास प्रारंभ करू शकता.

वृषभ - आपण आज जे कार्य कराल त्यामध्ये आपणास यश येईल. काम करण्याची कार्यक्षमता वाढणार आहे उत्तम मनोबल असल्यामुळे आनंदाने काम कराल.

मिथुन - कामात यश येण्यासाठी आपण खूप काम कराल सातत्याने काम करून यश मिळवा. आपल्या प्रयत्नांना चांगले यश मिळणार आहे.

कर्क -आर्थिक लाभाचे योग आहेत. पण तसे आपण खर्चही कराल. घरातील वातावरण सांभाळावे लागणार आहे, काही गैरसमज असतील तर ते दूर करा.

सिंह -आरोग्याच्या तक्रारी कमी होतील, त्यामुळे आपण उत्साही व आनंदी रहाल. कामाचे प्लॅनिंग करून कामाला सुरुवात करा.अनेक कामे जरी मिळाली तरी योग्य कामाची निवड करणे आवश्यक आहे.

कन्या - मानसिक अस्वस्थता जाणवेल आरोग्याच्या तक्रारी थोड्याफार असू शकतात.त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. महत्वाच्या निर्णयांमध्ये चुका होऊ शकतात.

तुळ - दैनंदिन कामे नीट होतील. महत्त्वाच्या कामांसाठी सहकाऱ्यांची मदत घ्यावीच लागेल त्यामुळे आधीच त्या दृष्टीने प्रयत्न करा महत्त्वाची कामे मार्गी लावाल. दिवस चांगला जाईल.

वृश्चिक - स्वतःच्या विचारावर ठाम राहा, आपण घेतलेले निर्णय योग्य असतील, त्यामुळे त्यानुसार निर्णय घेतल्याने आपणास यश येईल. यश आपलेच आहे.

धनु - घरातील वातावरण समाधानकारक असेल. जे कामाचे नियोजन केले असेल ते पूर्ण होईल सामाजिक कार्यांमध्ये कार्यrरत रहाल, त्यामुळे प्रतिष्ठा उंचावेल.

मकर -आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करू नका. नोकरीमध्ये कामामध्ये कामाच्या संधी येतील. नवीन नोकरीसाठी इंटरव्ह्यू असेल तर चांगला होईल त्याच्यामध्ये यशस्विता मिळेल.

कुंभ - जोडीदाराचे सौख्य लाभेल जोडीदाराशी वागता बोलता ना त्यांच्या मानसिकतेचा विचार करणे आवश्यक आहे.व्यापार-व्यवसायात आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले असणार आहे.

मीन - कुठलाही निर्णय घेताना विचारपूर्वक घेणे आवश्यक आहे. निर्णय चुकू शकतो, किंवा समोरची व्यक्ती आपणास फसवू शकते. त्यामुळे प्रॅक्टिकली विचार करणे आवश्यक आहे.

सरकारकडून शेती कर्जवसुलीला स्थगिती

मनपा निवडणुकीत युती म्हणूनच लढणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत

डिजिटल युगात मुलींच्या सुरक्षेबाबत सरन्यायाधीश भूषण गवई यांना चिंता

'पंतप्रधान धन-धान्य कृषी' योजनेचा शुभारंभ; ४२ हजार कोटींची योजना

अफगाणी परराष्ट्र मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना मज्जाव; देशभरातून संताप