राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १२ ऑक्टोबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, October 12, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - महत्त्वाची कामे करू शकाल. संतती कडे लक्ष द्यायला वेळ मिळेल. त्यांच्या प्रगतीने मन आनंदी होईल, संतती सौख्य लाभेल. नवीन कार्यक्षेत्रात प्रवेश करू शकता.

वृषभ - आपल्यामध्ये आत्मविश्वास परिपूर्ण असणार आहे. आपल्या तत्त्वाप्रमाणे च पण काम कराल, सरकारी काम करून घ्यावी. काम करताना सातत्य ठेवणे आवश्यक आहे.

मिथुन - बहीण भावा मध्ये तणावाचं वातावरण असू शकते. त्यामध्ये तुम्ही पुढाकार घेऊन त्या तणावाचे वातावरणकमी करू शकता, तुमच्या बोलण्याने वातावरण आनंदी व सुखमय होईल.

कर्क - प्रवास टाळणे चांगले. आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात होणार आहे, त्यामुळे आर्थिक प्राप्ती पण चांगली होईल. उधारी उसनवारी निश्चित वसूल होऊ शकते.

सिंह - मनामध्ये जो ताण आहे तो निघून जाईल. मन शांत राहील, त्यामुळे कामांमध्ये लक्ष्मी लागणार आहे. कुटुंबातील बारीक-सारीक गोष्टीमध्ये लक्ष देण्याचा प्रयत्न करा.

कन्या - नोकरी-व्यवसायात मनासारख्या घटना घडतील. नोकरीमध्ये वर्चस्व राहिल्यामुळे मन स्थिर राहील. भावंडांशी वाद विवाद नको. परदेशातून नवीन संधी येतील.

तुळ - घरातील कामात अडकून राहू नका. खोळंबलेली कामे उरकून घ्या. दैनंदिन कामामध्ये यश मिळणार. जिद्द व चिकाटीने काम केल्यास महत्त्वाची पण मोठी काम होऊन जातील.

वृश्चिक - तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्य पण उत्तम राहणार आहे आहे त्यामुळे कामामध्ये उत्साह राहणार. नवीन नवीन काम हाती घेण्याची शक्यता आहे.

धनु - आपल्या कार्यक्षेत्रात उत्साह असणार आहे. स्वतःच्या बुद्धी आणि विवेकाने मोठे प्रश्न सोडवणार आहात. कार्यक्षेत्र विस्तारण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.

मकर - आपणाला नोकरी-व्यवसाय जास्तीचे काम दिले जाईल, याबरोबरच आर्थिक प्राप्तीचा प्रमाणही वाढणार आहे आपला जोडीदार आपल्या साठी सहकार्य करणार आहे.

कुंभ - नोकरीमध्ये बदल किंवा बदली होण्याची शक्यता आहे. भागीदारी व्यवसायात वाद होतील. प्रवासाचे योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील.

मीन - आरोग्य मध्ये सुधारणा होईल. नोकरीमध्ये विनाकारण संघर्ष करू नका, व्यवसायात नवीन प्रयोग करण्यास हरकत नाही. भावंडांच्या गाठीभेटी होतील.

सरकारकडून शेती कर्जवसुलीला स्थगिती

मनपा निवडणुकीत युती म्हणूनच लढणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत

डिजिटल युगात मुलींच्या सुरक्षेबाबत सरन्यायाधीश भूषण गवई यांना चिंता

'पंतप्रधान धन-धान्य कृषी' योजनेचा शुभारंभ; ४२ हजार कोटींची योजना

अफगाणी परराष्ट्र मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना मज्जाव; देशभरातून संताप