आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, October 29, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - मनोबल उत्तम राहून आरोग्य उत्तम राहील उत्साह आणि उमेद वाढल्यामुळे आपल्या समोरील कामे आपण वेगाने पूर्ण करू शकाल व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहील.

वृषभ - कुटुंब परिवारात शुभवार्ता मिळतील कुटुंबातील वातावरण चांगले राहील नातेवाईकांचे सहकार्य लाभेल तसेच मित्रमंडळींची मदत मिळेल. व्यवसायिक जुनी येणी येतील.

मिथुन - आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील त्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. व्यवसाय धंद्यातील रखडलेली कामे मार्गी लावू शकाल आपली देणी चुकती करू शकाल.

कर्क - समाजातील मान्यवर तसेच गुरुतुल्य व्यक्तींच्या मार्गदर्शना बरोबर सहवास लाभेल. मानसन्मानाचे योग उत्साह उमेद वाढेल आरोग्य चांगले राहील.

सिंह - मनोबल वाढवणाऱ्या घटना आजूबाजूस घडल्यामुळे आत्मविश्वास वाढेल काही बाबतीमध्ये निर्णय धाडसाने घ्याल त्या निर्णयाचा आपल्या भविष्यात चांगला फरक पडेल.

कन्या - रोजच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे चिडचिड वाढण्याची शक्यता महत्त्वाची कामे आज नको तो सरकारी कामांना विलंब लागेल तसेच खर्चातही वाढ होऊ शकते.

तुळ - मन आशावादी व आनंदी राहील उत्साह वाढेल नोकरी विषयक प्रश्न सुटून रोजगार मिळेल पूर्वी दिलेल्या मुलाखतीतून बोलावणे येऊ शकते.

वृश्चिक - महत्त्वाची कामे पुढे ढकलावी शक्यतो प्रवासही पुढे ढकलावा. नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी टिकवण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे.

धनु - बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळू शकते घेतलेले निर्णय अचुक ठरतील. मात्र इतरांना कमी लेखू नका तसेच आपल्या बोलण्यावर वर्तणुकीवर नियंत्रण ठेवा वादविवाद टाळा.

मकर - दीर्घकाळ रखडलेली शासकीय कामे पूर्ण करण्यात यश मिळेल ओळखीचा उपयोग होऊ शकतो मात्र खर्च करावा लागेल. एका वेळेस एकच कार्य करणे हिताचे ठरेल.

कुंभ - व्यवसायिक येणी आल्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत राहील व्यवसायात काही महत्त्वाचे बदल करू शकाल कामगार यांचे सहकार्य लाभत शकते.

मीन - व्यवसायिक उधारी उसनवारी वसूल होईल. आर्थिक मदत लागल्यास ती ही उपलब्ध होऊ शकेल आपण घेतलेले निर्णय अचूक ठरले यामुळे त्याचा आपल्याला व्यवसायात फायदा होईल.

दर्जाहीन कृत्रिम वाळूवर टाच! एम-सँड धोरणात मोठी सुधारणा; अंमलबजावणीचे अधिकार शासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांना; निर्णय जारी

Mumbai News : मध्य आणि पश्चिम रेल्वेवर BMC मेहेरबान; रेल्वेकडे ५०० कोटी रुपयांचे पाणी बिल थकीत!

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या निधीची चौकशी होणार; राज्य सरकारकडून निधी तपासण्याचे आदेश

महाराष्ट्राचे स्वप्न साकार झाले; ठाण्यातील ‘त्या’ फलकाची चर्चा!

कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकारला हायकोर्टाचा दणका; ‘आरएसएस’ला लक्ष्य करण्याच्या निर्णयाला स्थगिती