आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, October 30, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - कुटुंब परिवारातील मुला मुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडल्यामुळे मानसिक उत्साह वाढेल कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

वृषभ - व्यवसाय धंद्यातील उलाढाल वाढून नफ्याच्या प्रमाणात वाढ होईल काही नवीन व्यावसायिक संधी उपलब्ध होतील नवीन करारमदार होण्याची शक्यता.

मिथुन - रोजच्या जीवनातील दैनंदिन कामे जिद्द व चिकाटीने पूर्ण कराल. जमिनी विषयक किंवा स्थावर मालमत्तेच्या विषयक असलेले व्यवहार गतिशील होतील ओळखीचा उपयोग होईल.

कर्क - आजचा दिवस अनुकूल जाईल महत्त्वाची कामे अथवा गाठीभेटी उरकून घ्या वैवाहिक जीवनात मात्र मतभेदांची शक्यता असल्यामुळे वादग्रस्त बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करू नका.

सिंह - कर्जाची आवश्यकता भासल्यास अथवा आर्थिक मदतीची गरज भासल्यास कर्जे मंजूर होऊ शकतात. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.

कन्या - आपल्या आजूबाजूला एखादी महत्त्वाची घटना घडल्यामुळे तुमच्या वैचारिक जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्यता आहे पण हा बदल सकारात्मक ठरवू शकतो.

तुळ - स्वतःचे काम स्वतः करा कोणाच्याही वरती जबाबदारी देऊ नका अथवा इतरांचे सहकार्य अपेक्षित ठेवू नका. कोणालाही गृहीत धरू नका. घरातील ज्येष्ठांची मदत मिळू शकते.

वृश्चिक - मित्रांचे सहकार्य लाभेल. व्यवसाय धंद्यातील उधारी उसनवारी वसूल झाल्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल आपली देणी आपण सुकती करू शकाल.

धनु - आपल्या इच्छेविरुद्ध प्रवास करावा लागण्याची शक्यता प्रवासामध्ये आपल्या वस्तू तसेच महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवा हरवण्याची किंवा गहाळ होण्याची दाट शक्यता.

मकर - अनपेक्षित धनलाभ झाल्यामुळे मनसोक्त खर्च करावा परंतु आपण चुकीच्या गोष्टींसाठी अथवा व्यक्तींसाठी खर्च करत नाही ना याचा विचार आवश्यक ठरेल.

कुंभ - कामाची व्याप्ती वाढल्यामुळे धावपळ व दगदग होईल. कामावर ती लक्ष केंद्रित करा गोंधळून जाऊ नका इतरांचे सहकार्यावर अवलंबून राहू नका.

मीन - रखडलेली शासकीय कामे पूर्ण करण्यात यश मिळेल. अपेक्षित पत्रव्यवहार पूर्ण होतील महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाठीभेटी घेऊ शकाल .

केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, "अत्यंत धक्कादायक, मुलांमध्ये सूडबुद्धी का तयार होते?"

खर्चात मोठी वाढ; मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये ५.४ लाख कोटींची भर

मुंबई-गोवा महामार्गाला ग्रामस्थांकडून हिरवाईची भेट; तळेकांटे ग्रामस्थ लावणार दोन हजार झाडे

आषाढी वारीसाठी लालपरी सज्ज; ठाणे विभागाकडून पंढरपूरसाठी १६ जादा एसटी फेऱ्यांचे नियोजन

‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा टीझर प्रदर्शित; अंकुश, कुशल, अभिजीत आणि संतोषच्या गँगचा चित्रपटगृहात होणार तुफान राडा