डॉ. सविता महाडिक ज्योतिष भूषण
धनु रास
अपयश धुवून काढाल
मुख, मान व इतर अवयव भरदार लांबट छाती पुढे करून डुलवत चालणारा, हनुवटी मोठी शरीर बळकट व निरोगी केस कमी नखे-मलीन शक्तीच्या बाहेर उलाढाली करणारा काटक नाक चाफेकळी सारखे शरीराची ठेवण बांधणी सूद पिळदार दंड मनगटे जाड मारामारी पराभव न पत्करणारा बळाचा गर्व बाळगणारा वर्ण साधारण गोरा लढवय्या मोहक डोळे किंचित पिंगट राजाचा मित्र विद्या कमी तेजस्वी उदार कविता करणारा पितृद्रव्यप्राप्ती असणारा कर्मशील शिल्पज्ञ बंधूंचा द्वेष करणारा सामोपचाराने वश होणारा बलात्काराने वश न होणारा न्यायप्रिय लंजीत आपल्या कुलामध्ये प्रमुख पणाचा मान मिळवणारा शत्रू पक्षावर विजय मिळवणारा स्व पराक्रमाने श्रेष्ठतेस पोहोचणारा संतती संख्या मध्यम त्यात पुत्राधिक्य असे धनु राशीच्या स्वभावाचे वैशिष्ट्य आहे
शिक्षण - धनु राशीच्या जातकांना सदरचा कालावधी सर्वसामान्य म्हणता येईल केलेल्या कष्टाचे अपेक्षित फळ मिळेल विद्यार्थ्यांना यश मिळेल मात्र स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना वेळेचे नियोजन उपयोगी पडेल तसेच सततचा अभ्यास करणे हिताचे ठरेल जास्त कष्ट घेतल्यास चांगले यश मिळवू शकाल इतरत्र वेळेचा अपव्यय करणे हितकारक ठरणार नाही त्याचप्रमाणे कुसंगतीपासून अलिप्तता बाळगावी. परदेशासंबंधी शिक्षणाच्या योजना सफल होतील पण त्या दृष्टिकोनातून अविरत प्रयत्न करणे आवश्यक ठरेल कुटुंबातून मदत मिळण्याची शक्यता कलाकार व खेळाडू यांना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या अनेक संधी प्राप्त होऊ शकतात त्या संधीचे सोने करणे आपल्यासाठी आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे.
पारिवारिक - कुटुंब परिवारातील वृद्धांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी सरकारी माध्यमातून लाभ होण्याची शक्यता पूर्वी जर एखादी विशिष्ट गुप्त चिंता असेल तर ती सदरील काळामध्ये जाईल नुकसानी टळेल .पूर्वी मिळालेले एखादे मोठे अपयश या काळामध्ये धुऊन टाकले जाईल त्यामुळे कुटुंब परिवारात एक प्रकारचे समाधान असेल महत्त्वाचे कामांमध्ये यश मिळेल कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींच्या समस्या सुटतील विवाह विषयक प्रश्न संपुष्टात येतील एकूणच पारिवारिक वातावरण आनंदी व उत्साही राहील.
नोकरी व्यवसाय धंदा - सदरच्या कालावधी मध्ये आपण आपली महत्त्वाची कामे हाता वेगळी करू शकाल त्याचप्रमाणे महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा केल्याने ती कामे पूर्ण होऊ शकतात या महिन्यामध्ये आपल्याला शुभ ग्रहांची चांगलीच साथ मिळणार आहे त्याचा आपण फायदा घ्या कुटुंब परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील काहींचे प्रेम विवाह घटित होतील प्रेमात यश संपादित करू शकाल विद्यार्थ्यांना आपल्या विद्याभ्यासात अपेक्षित यश संपादित करता येईल सामाजिक तसेच धार्मिक कार्यामध्ये रस घ्याल प्रसंगी सक्रिय योगदान द्याल त्यासाठी खर्च पण कराल समाजाकडून आपल्याला विशिष्ट मानसन्मान मिळू शकतो आपली सामाजिक पतप्रतिष्ठा वाढेल व्यवसायातील पत वाढेल आपल्या शब्दाला एक प्रकारचे वजन येईल समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीं शी संबंध येतील ओळखी तसेच मध्यस्थीतून महत्त्वाची कामे पूर्ण होतील विशेषतः सरकारी कामे सहकुटुंब सहपरिवार एखाद्या धार्मिक स्थळी भेट द्याल हातून दानधर्माची शक्यता गुरू प्रचीती येईल एखादी गुप्त चिंता असल्यास ती संपुष्टात येईल . आपल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये आपुलकीची भावना तसेच सहयोग दिसेल असलेले वादविवाद शमून नाती सुधारतील. भावंडांमधील असलेले मतभेद संपुष्टात येतील सामाजिक तसेच धार्मिक कार्यात योगदान देण्याची इच्छा होईल.
शुभ दिनांक - ३, ६, ७, ९, १३, १८, १९, २४, २८
अशुभ दिनांक - २, ५, १२, १५, १६, १७, २२, २७, ३०
मकर रास
व्यावसायिक उत्पन्नात वृद्धी होईल
स्वस्त्री व स्वपुत्र यांचे लाड करणारा धार्मिक शरीराने कृष त्यात कमरे चा खालचा भाग जास्त कृष नेत्रउत्तम कंबर बारीक प्रेमळ अंतकरणाचा कित्येक वेळा शरीर लठ्ठ मिशा मोठ्या व झुपकेदार अपलपोटे खादाड चिडखोर जमा खर्च ठेवण्याची आवड असणारा जीवन अगदी कमी तर कधी जास्त जेवणारा तोंड वेडेवाकडे करण्याची सवय असणारा बोलताना एकदम मोठा किंवा अगदी कमी आवाजात बोलणारा वाटबद्ध शरीर स्नान संध्या नियमित करणारा दूर दूरचे प्रवास करणारा शरीराच्या मानाने डोक्याचा भाग मोठा असणारा जबडा मगरी सारखा असणारा किंवा बारीक असणारा विद्या कमी चंचल सामान्यतः संगीत तज्ञ डोंगर व वनात राहण्याची आवड असणारा उदार संततीचे प्रमाण कमी कन्याधिक्य अधिक असे मकर राशीचे स्वभाव वैशिष्ट्य आहे
शिक्षण - शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही शाखेपैकी शिक्षण घेण्यास अनुकूल कालावधी आहे विद्यार्थ्यांना अपेक्षित यश प्राप्त होईल मात्र त्यांनी आपल्या मित्र संगती वरती लक्ष द्यावयास पाहिजे सध्याच्या कालावधीमध्ये मित्र संगती ही कुसंगत ठरू शकते त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत त्याचप्रमाणे वाहने चालवताना वाहनाच्या वेगावरती नियंत्रण ठेवायला हवे. कलाक्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या जातकांना विशेष अनुकूल कालावधी आहे त्यांना प्रसिद्धीसह धनलाभ होतील परदेशी शिक्षण घेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त होईल थोरा मोठ्यांचे आशीर्वाद लाभतील गुरुजनांचे मार्गदर्शन लाभेल वादविवाद टाळणे व वेळेचा अपव्यय करणे हे हितकारक ठरणार नाही हे लक्षात ठेवावे.
पारिवारिक - पूर्वार्धाच्या काळामध्ये विचित्र मानवी उपद्रव होऊ शकतो कुटुंबात अथवा समाजामध्ये वाद विवादाची शक्यता राहील वादविवादन पासून दूर राहणे हितकारक ठरेल पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात व्यावसायिक उत्तम घडामोडी घडतील त्यामुळे उत्पन्नावर त्याचा सकारात्मक परिणाम होईल कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींचा नोकरी बद्दल चा प्रश्न संपुष्टात येईल चालू नोकरीमध्ये पर्यावरण चांगले राहील वरिष्ठांची मर्जी संपादित करू शकाल त्याचप्रमाणे धंद्यामध्ये पण जास्त फायदा होऊ शकतो समाजातील मान्यवरांचा परिचय होईल चैनीवर खर्च होईल अमावस्येच्या प्रभावक्षेत्रात संसर्गजन्य बाबींपासून जपा त्याचप्रमाणे व्यसनांचा अतिरेक नको.
नोकरी व्यवसाय धंदा - चालू कालावधी तसा अनुकूलच म्हटला पाहिजे आपल्या रोजच्या कामात आपल्याला मदत मिळेल आपण आपली कार्य पूर्ण करू शकाल मित्रमंडळींच्या वर्तुळातून तसेच कुटुंब परिवारातून आपले कार्य पूर्ण करण्यासाठी निरनिराळ्या स्तरांवरून मदत मिळू शकते भावंडे सुद्धा मदत करू शकतात मात्र त्यांच्या आरोग्याकडे वेळेसच लक्ष देणे हितकारक ठरेल. कलाकार खेळाडूंना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या अनेक संधी मिळू शकतात या संधीचे सोने करणे आपल्याच हाती आहे हे लक्षात ठेवणे जरुरी आहे परदेशातूनही अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात सरकार द्वारे मदत मिळू शकते प्रसिद्धीसह अर्थमान उंचावेल. कलाकार खेळाडूंचे स्वप्न साकार होण्यासाठी अनुकूल कालावधी आहे व्यवसाय धंद्यामध्ये आपण केलेले कष्ट फलद्रूप होतील पूर्वी घेतलेली मेहनत आत्ता रंग आणेल पूर्वी केलेले नियोजन प्रत्यक्षात उतरताना अनुभवून अधिक गतीने आपण आपली कार्य पूर्ण कराल चालू नोकरीमध्ये आपण घेतलेल्या कष्टाचा चीज झाले ले दिसेल मित्रमंडळींच्या समावेत सहल तसेच करमणुकीचे नियोजन होईल वेळ आनंदात जाईल त्यासाठी मुक्तहस्ते खर्च कराल व्यवसाय धंद्यात अथवा आपल्या कार्यक्षेत्रात मित्रांची मदत जरूर असल्यास उपलब्ध होईल ज्या तरुण-तरुणींना परदेशी राहून आपले करिअर नोकरीत करायचे आहे अशांचे प्रयत्न सफल होतील उत्तरार्धामध्ये तरुण-तरुणींना परदेशी नोकरी करण्याचे संधी उपलब्ध होतील चैनीवर तसेच मनोरंजनावर जास्तीचा खर्च होईल मात्र महत्त्वाची कागदपत्रे जपणे तसेच मौल्यवान वस्तू जपा.
शुभ दिनांक - ३, ९, १०, ११, १३, १८, २१, २४, २५
अशुभ दिनांक - २, ५, १२, १५, १६, १७, २२, २७, ३०