राशीभविष्य

मे महिना कसा जाईल? बघा कुंभ आणि मीन राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे मे महिना? जाणून घ्या...

नवशक्ती Web Desk

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण

कुंभ रास

विशिष्ट  विजयोत्सव साजरा कराल

मान  उंटा सारखी पुढे आलेली शिरा व विशेष केस राठ उंच शरीर पाय मांड्या पोटऱ्या पाठ तोंड कंबर पोट यांचे आकार मोठे वर्ण काळा डोक्याला टक्कल कपाळ दोन्ही बाजूस जास्त निमुळते चेहरा देखणा विद्या  व्यासंगी बुद्धिमान कल्पक   कावेबाज तत्त्वज्ञ   परस्त्री व परधन यांची अपेक्षा बाळगणारा चांगले मित्र लाभणारा सुगंधी पदार्थांवर विशेष प्रेम करणारा कधी कधी मूर्खाप्रमाणे वागणारा क्षणात लहान सहान कारणांवरून राग येणारा आळशी  जुगारी कठोर अंतकरणाचा  बंधुंच्या पासून वेगळा राहणारा  संपत्ती नेहमी कमी जास्त होत राहणारा ज्याच्या संपत्तीचा लोक  हेवा करतात  असा विवेक्षित कार्यात अथवा कार्यक्षेत्रात फारशी प्रसिद्धी न पावणारा संतती फार कमी असणारा असे कुंभ राशीचे वैशिष्ट्य सांगितले  जाऊ शकते.

शिक्षण - चालू काळ शिक्षणासाठी अनुकूल आहे आपण घेतलेल्या कष्टाचे चीज होईल दिलेल्या परीक्षांच्या मध्ये अपेक्षित यश मिळाल्यामुळे कुटुंब परिवारातील वातावरण चांगले राहील आनंदी राहील पुढच्या शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे प्रयत्न सफल होतील या कामी कुटुंबातून तसेच गुरुजनांकडून आपल्याला मदत मिळू शकते ओळखींचा उपयोग होईल परंतु प्रयत्न सोडू नका प्रयत्नांना यश मिळेल विद्यार्थ्यांनी मात्र ज्यांना परीक्षा द्यावयाच्या आहेत अशांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे ठरेल काही वेळा लक्ष केंद्रित करण्याला प्रश्न निर्माण होऊ शकतो थोडक्यात लक्ष केंद्रित होणार नाही त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील.

पारिवारिक -  कुटुंब परिवारामध्ये अथवा बाहेर अतिशय विरोधी ग्रहमालातूनही   तगुन राहाल कोणत्याही प्रकारचा जुगार सदृश्य व्यवहार टाळा घरगुती सुरक्षा व्यवस्था घट्ट ठेवा चोरीची अथवा मौल्यवान कागदपत्रे चीज वस्तू गहाळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही महिलांनी विशेषतः आपल्या दागिन्यांची काळजी घ्यावी पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात मात्र विशिष्ट विजयोत्सव साजरा करू शकाल एखादे महत्त्वाचे काम होईल कुटुंब परिवारातील तरुण तरुणींचे विवाह विषयक प्रश्न संपुष्टात येतील विवाह ठरेल त्याचप्रमाणे नोकरी बद्दलच्या समस्या मिळतील अमावस्या जवळ दुखापतींना जपा कायदेविषयक बाबी कसोशीने पाळा पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र बुद्धिजीवी मंडळींना वाव देणारे आहे पर्यायी मार्ग सफल होतील संततीच्या बाबतीत आनंद देणाऱ्या घटना घडतील जोडीदाराला अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता शेतीवाडीतून लाभ मिळूशकतो.

नोकरी व्यवसाय धंदा -  या महिन्या मध्ये आपण सर्वांगीण प्रगती करू शकाल उन्नतीचा कालावधी आहे कुटुंब परिवारांमधील तरुण-तरुणींचे नोकरी विषयक प्रश्न सुटल्यामुळे कुटुंब परिवारात आनंदी आणि उत्साही वातावरण असेल त्याचप्रमाणे कुटुंबात मंगल कार्याचे आयोजन होईल तरुण-तरुणींच्या विवाह ठरण्यातील अडचणी दूर होतील तरुण-तरुणींचे मोठे  भाग्योदय होतील काहींचे परदेशी भाग्योदय नवीन नवीन संधी मिळतील त्यामध्ये आपली कारकीर्द करू शकाल आपल्या आवडत्या कार्यक्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळेल खेळाडू कलाकारांना अतिशय चांगला कालावधी आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल त्याबरोबर परदेश गमनाची ही संधी मिळू शकते उत्पन्न वाढेल जमीन जुमला स्थायी संपत्ती वडिलोपार्जित संपत्ती इत्यादी विषयांमध्ये असलेले वाद विवाद  ओळखी मध्यस्थी द्वारा क्षमतील सर्वमान्य मार्ग मिळेल त्यात आपला फायदा होईल कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची मध्यस्थता उपयोगी पडेल विद्यार्थी विद्यार्थिनींना परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेता येईल अडथळे दूर होतील मदत मिळेल तसेच ज्या जातकांना नोकरी नाही अशांना नोकरी मिळू शकते नोकरी विषयक मुलाखती सफल होतील व्यवसाय धंद्यात आर्थिक मदतीची गरज लागल्यास बँकांची कामे होतील कर्ज मंजुरी होईल शिवाय मित्रमंडळींच्या वर्तुळातूनही आर्थिक मदत उपलब्ध होऊ शकते कुटुंब परिवारातील तरुण तरुणींचे विवाह ठरतील

शुभ दिनांक - ३, ४, ६, ७, ९, १०, ११, १९, २१, २८

अशुभ दिनांक - २, ५, १२, १५, १६, १७, २२, २७, ३०

मीन रास

विशिष्ट कायदेशीर प्रश्न सुटतील

परधन जलधन यांचा भोक्ता  स्त्री व  वस्त्रे यात मग्न. गोंडस स्थूल व ठेंगू  शरीर काहीसा सुंदर नाक उंच मोठे किंवा लहान हात पाय आधी अखंड ज्ञानेन्द्रिय फार बारीक वर्ड साधारणतः फार काळा विद्या व सिद्धी  जाणारारा साधारण संतती विशेष व त्यात कन्या प्राधान्य स्त्रीवश गुप्तधन व योग जाणारारा  कीर्तीची व प्रसिद्धीची हाव धरणारा जनावरांची आवड मित्रा कर्तबगारी विशेष नसल्याने सात्विक भासणारा संगीताचा शौकीन महत्त्वाच्या निर्णयामध्ये इतरांच्या वर अवलंबून असणारा कमी आत्मविश्वास असलेला इत्यादी लक्षण मीन राशीचे जातकांच्या मध्ये आढळतात.

शिक्षण - शिक्षणाच्या बाबतीमध्ये नियम व शिस्त पाळावी संयम बाळगावा नियमितपणे अभ्यासासाठी वेळ देणे गरजेचे आहे त्याचा उपयोग होईल त्याचप्रमाणे इतरांच्या मार्गदर्शनाचा उपयोग होईल दिलेल्या परीक्षांच्या मध्ये अपेक्षित यश मिळेल उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे प्रयत्न सफल होतील कुटुंबातून व गुरुजनांकडून मदत त्याचप्रमाणे मार्गदर्शन लाभेल परंतु विद्यार्थ्यांचा कल मनोरंजनाकडे राहील परंतु अभ्यासास प्राधान्य देणे हीत कारक ठरेल.

पारिवारिक - कुटुंब परिवारामुळे खर्चाचे प्रमाण वाढेल पाहुण्यांचे येण्यामुळे घरामध्ये वर्दळ वाढेल घरातील मुला मुलींच्या वाढत्या मागण्यांमुळे खर्च वाढेल भावंडांच्या बाबतीत शुभ घटना  शुभ घटना सहकुटुंब सहपरिवार प्रवासाचे योग आहेत धार्मिक पवित्र स्थळी भेट द्याल कुटुंब परिवारा मध्ये सुवार्ता येतील. निराशा जाईल घरातील तरुण-तरुणींचे प्रश्न मार्गी लागतील.

नोकरी व्यवसाय धंदा - हा कालावधी आपल्याला  यशोदायक ठरेल यशाचे वाढते प्रमाण अनुभवता येईल. जी कामे करायला आपल्याला जास्त वेळ लागत होता ती आता अल्प प्रमाणात कष्ट करून व कमी वेळात होत असलेली अनुभवून आपल्याला आश्चर्य वाटेल अनुकूलित भरलेली असेल विद्यार्थी विद्यार्थिनी जे स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत त्यांचे मन अभ्यासात लागेल अभ्यास मन केंद्रीत राहिल्यामुळे अभ्यास चांगला होईल त्याचे परिणाम सुद्धा चांगले मिळतील त्यांना विशिष्ट स्पर्धक यश मिळू शकते आपल्या आवडत्या कार्यक्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळेल व्यवसाय धंद्यामध्ये आतापर्यंतच्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते अशा अडचणी संपुष्टात येतील आर्थिक कोंडी फुटेल कुटुंब परिवारातील नवपरिणीतांचे भाग्योदय अपत्य लाभ होऊ शकतो आपले रोजचे जीवन बदलेल कुटुंब परिवारातील पती अथवा पत्नीचा भाग्योदय उत्तरार्धामध्ये कोर्टकचेरीत ले निकाल आपल्या बाजूने लागल्यामुळे सुटकेचा निश्वास सोडाल समाधानी रहाल आपल्या रोजच्या जीवनात,आपल्या कार्यक्षेत्रात तसेच आपल्या कुटुंबात आपण लहान मोठे निर्णय  साहसी वृत्तीने धडाडीने घ्याल. त्यामुळे आपल्यामध्ये उत्साह व ऊर्जेचा जोरदर प्रभाव वाहिल. जीवनातील प्रत्येक क्षेत्रातील आव्हाने व प्रतिस्पर्धा यामध्ये सफलता प्राप्त करू शकाल चालू नोकरीत आपल्या कार्याची  प्रशंसा होईल आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. कार्यक्षेत्र रुंदावेल. आपल्या रूची मध्ये बदल होईल. अध्यात्मा मध्ये मन रमू शकते तसेच गूढविद्ये विषयी  आकर्षण वाटेल.  

शुभ दिनांक - ३, ९, १३, १८, २१, २४, २५

अशुभ दिनांक - २, ५, १२, १५, १६, १७, २२, २७, ३०

शासकीय कर्मचारी पुन्हा एकदा फसले की.. ?

आजचे राशिभविष्य, ६ मे २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

"त्याला ठेचून मारा अन् मला सांगूही नका"; नसरापूर प्रकरणानंतर आरोपीच्या पत्नी-मुलाची संतप्त प्रतिक्रिया

श्रीक्षेत्र महाबळेश्वर समस्यांचे ठिकाण; पर्यटक त्रस्त, प्रशासन मात्र सुस्त

Mumbai : ‘त्या’ जन्म-मृत्यू नोंदणी प्रमाणपत्रांची पडताळणी होणार; BMC करणार चौकशी; दोषी अधिकाऱ्यांवर होणार कारवाई