डॉ. सविता महाडिक
ज्योतिष भूषण
तुळ रास
व्यावसायिक महत्त्वाचे करारमदार होतील
अतिशय संतुलित विचार राखणारा स्वभाव देव ब्राह्मण साधू यांची पूजा करणारा सत्वगुणी स्वधर्मचारी पुण्य कर्म करणारा ईश्वर भक्त समतोल वृत्तीचा उंच शरीर उभटचेहरा बाकदार पाय शरीर सडपातळ वर्ण काळा किंवा सावळा उंच प्रवासाची आवड असणारा बोलताना मान हलवणारा वारंवार हस्ते तोंड आकुंचित करून मसालेवाईक भाषण करणे स्वर लहान तडजोडीची आवड असणारा न्याय कर्मामध्ये प्रवीण उभा चालत असताना बुक काढल्यासारखा दिसणारा सधन रोगी भावंडांच्या वर उपकार करणारा बंधुवर्गाकडून नेहमी निर्भसना पावणारा विद्वान शास्त्रज्ञ कफयुक्त शरीर दग दग फार भोगणारा आपल्या मनाचा अजिबात थांग न लागू देणारा, संतती कमी त्यातल्या त्यात पुत्र संतती कमी वृद्धावस्थेत आप्तेष्टांचा वियोग होणे असे तुळ राशीचे वैशिष्ट्य सांगता येईल.
शिक्षण- तुळ राशीच्या जातकांना चालू कालावधी फारसा अनुकूल नाही प्रतिकूलतेला सामोरे जावे लागण्याची तयारी ठेवा काही वेळेस मनाप्रमाणे काहीही घडणार नाही त्यामुळे प्रयत्न हे कायम करावे लागतील त्याचप्रमाणे त्या प्रयत्नांच्या मध्ये सातत्य ठेवावे लागणार आहे अभ्यासावर मन केंद्रित करण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे इतरांचे मार्गदर्शन उपयोगी पडू शकते त्याचप्रमाणे वेळेचे नियोजनही उपयोगी पडेल. काही ग्रहांची अनुकूलता मिळणार आहे त्यामुळे प्रयत्न योग्य दिशेने झाल्यास अपेक्षित यश साध्य होऊ शकते आपला आत्मविश्वास आपल्याला वाढवावा लागणार आहे सर्वच क्षेत्रात प्रयत्नांनी यश मिळेल परदेशासंबंधी शिक्षणासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे इतरांची मदत घ्यावी लागेल आत्मविश्वासाने व पूर्ण प्रयत्नाने आपली कामे होतील व अपेक्षित यश साध्य करता येईल.
पारिवारिक- महिन्याच्या सुरुवातीला शत्रुत्वाच्या पार्श्वभूमीवर क्रिया प्रतिक्रिया सावध पद्धतीने द्या कुटुंब परिवारामध्ये लहान मोठ्या कारणांवरून वादविवादाची शक्यता आहे त्यामुळे वादविवाद घडतील अशा घटनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा विशेषतः कुटुंब परिवारातील महिलांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी म्हणजे कुटुंबातील शांतता टिकून राहण्यास मदत होईल पौर्णिमे जवळ मात्र कुटुंब परिवारात काही वैयक्तिक सुवार्ता मिळतील त्यामुळे कुटुंबातील वातावरण बदलून जाईल व्यावसायिक महत्त्वाचे करार झाल्यामुळे एक प्रकारचे समाधान लाभेल नोकरीत वरिष्ठांची कृपा राहून त्याचा लाभ होईल अपेक्षित घटना घडून येतील उत्पन्नावर त्याचा चांगला परिणाम होईल उत्पन्न वाढल्यामुळे कुटुंब परिवारातील सर्व सदस्यांच्या गरजा आपण पूर्ण करू शकाल व्यावसायिक स्थिती चांगली राहील नोकरीमध्ये चांगलेच पूर्ण मिळतील संततीच्या बाबतीत शुभ परिणाम मिळणार आहेत विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल सरकारी कामात काही वेळेस दिरंगाई किंवा विलंब लागू शकतो. उष्णतेच्या विकारांपासून त्रास होण्याची संभावना संत सज्जनांचा सहवास लाभेल खेळाडू व कलाकारांना चांगला काळ आहे कर्तुत्व सिद्ध करण्याच्या अनेक संधी मिळतील प्रयत्न मात्र जरूर करा.
नोकरी व्यवसाय धंदा - आपल्या कार्यक्षेत्रात कोणतेही लहान मोठे बेकायदेशीर व्यवहार टाळा आपल्या हातून फसवणूक होते आहे का हे तपासून बघा काहींना कोर्ट प्रकरणांपासून त्रास होण्याची शक्यता कायदेशीर क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी आपल्या कामाशी प्रामाणिक राहणे जरुरी आहे अन्यथा त्याची फळे भविष्यात भोगणे क्रमप्राप्त आहेत आपल्या कार्यक्षेत्रात निरनिराळ्या समस्या उद्भवू शकतात कामाची गती संथ झालेली दिसेल संयम ठेवण्याची गरज आहे व्यवसाय नोकरीत प्रतिकूलता जाणवेल आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रात यश मिळवण्यासाठी अतिरिक्त मेहनत व परिश्रम घ्यावे लागतील निरंतर प्रामाणिक प्रयत्नांची आवश्यकता आहे अशा स्थितीत नवीन कामे सुरू करू नका संघर्षमय कालावधी आहे ज्या जातकांना नोकरी नाही व ते नोकरीच्या शोधात आहेत अशा जातकांना अजून थोडी वाट बघावी लागेल नवीन उधार उसनवारी देण्याचे टाळा. मानसिक शांतता ढळू शकते. त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो परिवारातील परिस्थिती सामान्य राहील परंतु कुटुंबातील सदस्यांकडून आपल्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत जीवन क्रमात चढ-उतार जाणवतील. शांत राहून वाद-विवाद टाळा. आपल्या जीवनसाथी बरोबर मतभेद होऊ शकतात प्रेमप्रसंगातही जपून पाऊले टाका वाहन चालवताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
शुभ दिनांक - ३, ४, ७, ९, १०, ११, १९, २१, २८
अशुभ दिनांक - २, ५, १२, १५, १६, १७, २२, २७, ३०
वृश्चिक रास
भावनेचा उद्रेक टाळा
वक्षस्थळ डोळे यांचे आकार मोठे कमरेच्या वरच्या भागापेक्षा खालचा भाग तोकडा अवयव तोकडे उंची कमी नाक मोठे व फुगीर बांधा मजबूत कुढ्या मनाचा गुप्त विचारांनी सूडं घेणारा, बालपणी रोगी पिंगट वर्णाचा निरनिराळ्या वेळी निरनिराळे विचार प्रगट करणारा, शूर त्यागशील गंभीर दुसऱ्याच्या मनाला लागेल असे बोलणारा साहसी पित्त रोगी कुटुंब संपन्न मतलबी लोकांच्या जाळ्यात सहज अडकणारा राजसेवक शत्रूंशी नेहमी झगडणारा परस्त्रीशी मैत्री ठेवणारा गुरु व मित्र यांच्याशी द्रोह करणारा स्त्रियांचा शौकीन व एकांतात राहण्याची आवड असणारा हलक्या कानाचा गर्विष्ठ दुसऱ्यावर वचक ठेवणारा संतती जास्त कन्या संतती अधिक असे वृश्चिक राशीच्या व्यक्तींचे स्वभाव वर्णन आहे डॉक्टर रसायनिक शास्त्रज्ञ वैद्य निरनिराळ्या भानगडींचे धंदे करणारे गुप्त स्वरूपाचा व्यवसाय करणारे अशा व्यक्ती व त्यांचे व्यवसायिक राशीमध्ये आढळते.
शिक्षण - सध्याचा कालावधी शिक्षणासाठी सर्वसाधारणपणे अनुकूल असेल त्यामुळे आपणास अभ्यासात सातत्य ठेवणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे ठरेल कुसंगती पासून दूर राहणे हिताचे ठरेल त्याचप्रमाणे वेळेचे नियोजन आवश्यक राहील जास्त प्रयत्न करावे लागल्यामुळे योग्य प्रयत्न झाल्यामुळे चांगले यश मिळू शकते परदेशासंबंधी शिक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळू शकते कला व क्रीडाक्षेत्र चांगले यश मिळेल
पारिवारिक- सुरुवातीला काही विरोध सहन करावा लागेल त्यामुळे अति आत्मविश्वास व मस्ती टाळा परिवारात नात्यांना महत्त्व द्या तरुण-तरुणींनी कुसंगत टाळणे महत्त्वाचे आहे व्यावसायिकांनी उधार उसनवारीचे व्यवहार सांभाळून करावे पति अथवा पत्नीचा भाग्योदय होऊ शकतो मौजमजा घडेल मनोरंजनाकडे कल राहील मात्र भावनेचा उद्रेक टाळा स्त्री वर्गाशी सांभाळून वाला बाहेर अथवा परिवारामध्ये हे महत्त्वाचे ठरेल जुन्या गुंतवणुका फलदायी ठरतील पौर्णिमे जवळ सहकुटुंब सहपरिवार प्रवास होऊ शकतात परंतु प्रवासामध्ये संसर्ग जपा उत्तरार्धातील ग्रहमान मोठे दैवी चमत्कार घडवू शकते एखादे आर्थिक संकट आपोआप टळेल परमेश्वराचे आभार माना अमावस्ये जवळ शारीरिक वेदना जाणवण्याची शक्यता आहे.
नोकरी व्यवसाय धंदा - हा महिना तसा धावपळीचा जाऊ शकतो कमी वेळात जास्त उत्पन्नाच्या अभिलाषा निर्माण होऊ शकतात त्यावरती नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे राहील व्यापार व्यवसाय धंद्यात तसेच नोकरीत कामाचा ताण जाणवू शकतो आयत्या वेळेस पूर्वीच्या नियोजनात बदल घडू शकतो काही वेळेस नोकरीतील वातावरणाने मनस्वास्थ्य बिघडू शकते पण जास्त चिंता करू नका मात्र संशयात्मक आर्थिक व्यवहारातून चिंता निर्माण होऊ शकते कोणतेही लहान मोठे व्यवहार करताना शांतपणे पूर्ण विचारांती निर्णय घेऊन व्यवहार पूर्ण करा कायदेशीर बाबी पाळा कायद्याच्या चौकटीत राहूनच कार्य पूर्ण करा. सरकारी नोकरीमध्ये लहान मोठ्या प्रलोभनांपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करा शेअर मार्केट सट्टा बाजार जुगार सदृश्य व्यवहार यापासून दूर राहा नवीन गुंतवणूक सध्या तरी करू नका कुटुंब परिवारात आपल्या जीवनसाथी बरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात अशा प्रसंगांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे हिताचे ठरेल ते परिवारातील शांतता टिकवण्यासाठी महत्वाचे ठरेल कुटुंबातील मुला मुलींच्या कडे व्यवस्थित लक्ष देणे गरजेचे ठरेल राजकीय क्षेत्रात गुप्त शत्रूंचा त्रास संभवतो काही वेळेस आपल्याजवळील व्यक्ती आपल्या विरोधात जाऊ शकतात सावध राहणे महत्त्वाचे ठरेल व्यवसाय धंद्यातील उत्पन्न ठीकठाक राहील त्यामुळे आर्थिक परिस्थिती सर्व साधारण राहील.
शुभ दिनांक - ३, ९, १३, १८, २१, २९, २५
अशुभ दिनांक - २, ५, १२, १५, १६, १७, २२, २७, ३०