अक्षररंग

बँकिंग महर्षी

आपला बँकेशी जो संबंध येतो तो म्हणजे पैसे भरणे, काढणे, मुदत ठेवी ठेवणे, कर्ज घेणे यासाठीच. पण हा बँकिंग व्यवसाय देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. कोविड काळ असतानाही बँका सुरूच ठेवाव्या लागल्या यातून त्याचे महत्त्व लक्षात येते. पण हा बँकिंग व्यवसाय जितका आपल्याला समोर घडताना दिसतो, त्याहीपेक्षा अनेक घडामोडी बँकिंग क्षेत्राच्या आतल्या बाजूस होत असतात.

नवशक्ती Web Desk

बुक कट्टा

संतोष तळाशीलकर

आपला बँकेशी जो संबंध येतो तो म्हणजे पैसे भरणे, काढणे, मुदत ठेवी ठेवणे, कर्ज घेणे यासाठीच. पण हा बँकिंग व्यवसाय देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. कोविड काळ असतानाही बँका सुरूच ठेवाव्या लागल्या यातून त्याचे महत्त्व लक्षात येते. पण हा बँकिंग व्यवसाय जितका आपल्याला समोर घडताना दिसतो, त्याहीपेक्षा अनेक घडामोडी बँकिंग क्षेत्राच्या आतल्या बाजूस होत असतात. हे असे बँकिंग क्षेत्र समजून सांगण्याची प्रक्रिया मोहन टांकसाळे यांनी केली आहे.

सामान्य कुटुंबात जन्माला येऊन सार्वजनिक बँकेचे अध्यक्षपद भूषवण्याची किमया मध्य प्रदेशातील मोहन टांकसाळे यांनी केली. अतिशय मेहनत, चिकाटी व मोठ्या जिद्दीने सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, पंजाब नॅशनल बँकेचे माजी कार्यकारी संचालक अशा पदांपर्यंत मजल मारली. निवृत्तीनंतरही त्यांनी बँकिंग क्षेत्रातील नवनवीन बाबी शिकण्याचा झपाटा कायम ठेवला. बँकिंग क्षेत्रात प्रवेश केल्यापासून बँकेच्या अध्यक्षपदी पोहचताना त्यांनी ‘एकलव्या’प्रमाणे शिकण्याची भूमिका कायम ठेवली.

मोहन टांकसाळे हे मूळचे मध्य प्रदेशातील. घरची आर्थिक परिस्थिती बेतास बात. महाविद्यालयात शिकत असतानाच आपल्या आई-वडिलांना मदत करावी ही इच्छा त्यांच्या मनात प्रबळ झाली. त्यातूनच महाविद्यालयात शिकता शिकता त्यांनी १९७० च्या दशकात सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये लिपीक म्हणून काम करायला सुरुवात केली. तेव्हा ते अवघे साडेएकोणीस वर्षांचे होते. लिपीक म्हणून काम करायला सुरुवात केली, तरीही मोहन यांची इच्छा तिथेच थांबून राहण्याची नव्हती. त्यामुळेच लिपीक म्हणून काम करताना टांकसाळे यांनी बँकिंग व्यवहाराचा पाया मजूबत करायला सुरुवात केली. बँकेत काम करताना त्यांनी बँकिंग क्षेत्रातील बारकावे व नवीन गोष्टी शिकायला सुरुवात केली. त्यानंतर एसबीआय या भारतातील सर्वात मोठ्या बँकेत लिपीक म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. झपाटून काम करण्याच्या सवयीमुळेच टांकसाळे यांना बँकेतील वरिष्ठांनी भारतीय बँकिंग क्षेत्रातील ‘सीएआयआयबी’ ही परीक्षा देण्यासाठी मार्गदर्शन केले. पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा ते पास झाले. स्टेट बँकेत बँकिंगचे विस्तृत धडे गिरवल्यानंतर आणखी पुढे जाण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण झाली. ते युनियन बँक ऑफ इंडियाच्या प्रोबेशनरी ऑफिसरच्या परीक्षेला बसले. अखेर युनियन बँकेच्या ग्वाल्हेर शाखेत अधिकारी म्हणून लेखकाची नियुक्ती झाली. ग्रामीण भागात काम करतानाही लेखकाने आपली छाप सोडली. आपल्या बँकेशी विविध स्तरांना जोडण्याचे काम त्यांनी सुरू केले. आपल्या बँकेचा व्यवसाय कसा वाढवता येईल, असा विचार त्यांनी केला. त्यादृष्टीने त्यांनी पावले टाकली. अनेक अभिनव मार्केटिंग कल्पना त्यांनी राबवल्या. त्यातूनच त्यांच्या बँकेची व्यवसाय वाढ झाली. विशेष म्हणजे बँकेत काम करताना आपला ग्राहक अत्यंत महत्त्वाचा आहे याची जाणीव त्यांनी कायम ठेवली. त्यातूनच बँकेच्या खातेदारांना कोणतीही अडचण आली तर ते सोडवण्याचा प्रयत्न करत होते. त्यातून त्यांच्या बँकेचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला. टांकसाळे बँकिंग क्षेत्रात काम करत असताना जागतिकीकरण सुरू झाले. त्याचबरोबर संगणक युग बँकिंग क्षेत्रात आले. त्यातून बँकिंगमध्ये प्रचंड बदल झाले. खासगी बँकांच्या तुलनेत सरकारी बँकांमध्ये संगणकीकरण उशिरा झाले. तरीही सरकारी बँकांनीही खासगी बँकांशी स्पर्धा केली. विशेष म्हणजे प्रत्येक बदल लेखकाने अत्यंत बारकाईने समजून-उमजून घेतले. त्यानुसार स्वत:मध्ये बदल केले. जाणीवपूर्वक आपले कौशल्य विकसित केले. लेखकाचे शिक्षण हिंदी माध्यमातून झाले. पण, भविष्यात वरिष्ठ पदी जायचे असल्यास इंग्रजी आले पाहिजे, हे त्यांनी ओळखले आणि इंग्रजी शिकून घेतले. तसेच मुंबईत बदली झाल्यानंतर त्यांचा आंतरराष्ट्रीय बँकिंग क्षेत्राशी संबंध आला. हा व्यवसायही त्यांनी शिकून घेतला. तसेच एनआरआय खाती मिळवणे आदी बाबी त्यांना शिकता आल्या.

ग्राहकाला कर्ज देताना कोणती काळजी घ्यावी, याचे मार्गदर्शन त्यांनी केले. सरकारी व्यवसाय, व्यापारी वित्त पुरवठा, विविध बँकांकडून होणारी स्पर्धा आदींबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

टीमचे नेतृत्व करताना अनेक गोष्टी त्यांनी कटाक्षाने पाळल्या. तसेच लोकांना ओरडण्यात अर्थ नसतो, समोरच्या व्यक्तीला नीटपणे समजेल, असे तुम्ही सांगितले पाहिजे हे त्यांनी आपल्या अनुभवातून सहकाऱ्यांना शिकवले.

ज्या व्यक्ती बँकिंग व्यवसायात कार्यरत आहेत, ज्यांना पुढे जायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे अनुभवाचा ठेवा आहे. त्यामुळे हे पुस्तक संग्राह्य असणे गरजेचे आहे.

n लेखक : मोहन वसंत टांकसाळे

n प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन

n किंमत : ३०० रुपये n पृष्ठे : १७४

...म्हणून कौटुंबिक पेन्शनला नकार नाही; महाराष्ट्र नागरी सेवेच्या तरतुदीमध्ये नमूद - न्यायालय

'लाडक्या बहिणी' चिंताग्रस्त! e-KYC करताना अनेक अडचणी; OTP न येणे, पोर्टल बंदच्या वाढत्या तक्रारी; योजनेतून बाद होण्याची भीती

राज्यात आता इंडस्ट्रियल मॅग्नेट जिल्हे; चंद्रपूर, गडचिरोलीला मान; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये परीक्षा लांबणीवर; शासकीय रेखाकला परीक्षा आता १ ते ५ ऑक्टोबरदरम्यान; स्वतंत्र वेळापत्रक जाहीर

Asia Cup 2025 Final : भारताचा पाकवर दणदणीत विजय! पाकिस्तानला २१ दिवसांत तिसऱ्यांदा धूळ चारली