अक्षररंग

हँगर आला कुठून?

बालमित्रांनो, आपले कपडे इस्त्री करून नीटनेटके आले घरी की आपण पहिल्यांदा काय करतो , तर त्याना छान व्यवस्थित कपाटात हँगर वर लटकवतो...

नवशक्ती Web Desk

नवलनगरी

सोनाली कोलारकर-सोनार

बालमित्रांनो, आपले कपडे इस्त्री करून नीटनेटके आले घरी की आपण पहिल्यांदा काय करतो , तर त्याना छान व्यवस्थित कपाटात हँगर वर लटकवतो!

कुठून बाहेरून कार्यक्रमाहुन आल्यावर देखील घरकगे आपल्याला काय सांगतात तर, अरे नीट हँगर वर ठेवा ह कपडे! या कपाटातल्या हँगर चे देखील आता किती प्रकार निघाले आहेत ! अबब! लाकडाचे, स्टील चे, प्लास्टिक चे असंख्य प्रकार आहेत! एकाच हंगारवर 2, 3 कपडे लावता येतील असे देखील प्रकार निघाले आहेत. शाळेचा टाय, रुमाल, शर्ट, कोट ,पॅन्ट, स्कर्ट, साड्या इतकेच कशाला पर्सेस सुद्धा हँगर वर लावता येतात आणि आता तर खास बांगड्या रचून ठेवायला देखील हँगर निघाले आहेत ! आहे न गंमत !

अशी ही बहुपयोगी हँगर! कपाट नीट तर दिसतच त्यामुळे पण जागा पण किती वाचते !

सगळ्यात आधी ही हँगर ची कल्पना कोणाला सुचली असेल बरं ?

तर त्याची एक मजाच आहे !

ही गोष्ट आहे पार 1903, 4 सालातील! मिशिगन इथल्या एका वायर च्या कंपनीत एक सेल्समन आणि लोहार अशी दुहेरी भूमिका निभावणारा कंपनीचा कामगार होता. त्याच नाव होतं अल्बर्ट पार्कहाऊस ! रोज कंपनीत आल्यावर इतरांसारखाच तिथे ठोकून ठेवलेल्या हूक्स वर अल्बर्ट आपला कोट टांगून ठेवत असे. तिथे असे खूप हूक्स ठोकून ठेवले होते. एका भल्या सकाळी कडाडत्या थंडीत मात्र त्याची वेगळीच पंचाईत झाली. त्या दिवशी मिशिगन ला भलतीच थंडी पडली होती. त्यामुळे ऑफिस च्या लोकांनी एका ऐवजी दोन दोन कोट घातले होते. कामावर आल्यावर एक कोट हुक ला टांगून दुसरा कोट घालून सगळे काम करायला लागले.

अलबर्ट कामावर आला आणि बघतो तर काय एकही हूक त्याचा कोट अडकवायला रिकामा नव्हता! सगलीकडे शोधले त्याने पण कुठे जगा नाही. चरफडत अलबर्ट ने काय केलं असेल? तर तिथेच असलेली एक लेड ची वायर घेतली आणि त्याला मधून वाकवली आणि अजून एक गुंडाळी करून तिला टांगता येईल असे हूक तयार केलं. त्या लांबोळ्या वायर वर त्याने आपला कोट अडकवला आणि त्या हूक ला एका अडकणीला लटकवून टाकलं ! अलबर्ट चा कोट आता दिमाखात त्या हँगर सदृष्य वायर वर लटकत होता। सगळ्यांनाच हा प्रकार बघून गंमत वाटली.

अलबर्ट चा बॉस इतक्यात इथे आला आणि हा लटकलेला कोट बघून त्याला मजाच वाटली. पण अलबर्ट चा बॉस मोठा चलाख माणूस होता. त्याने गुपचूप न बोलता हे हूक कसं तयार केलं अलबर्ट ने ते जाणून घेतले आणि चक्क त्याचं पेटंट घेतलं. पहिली हँगर अशी तयार झाली. अलबर्ट पार्क हाऊस ला त्याच्या या कल्पनेची मोठी रक्कम मिळाली असेल असं तुम्हाला वाटतं असेल तर साफ चूक ! त्याच्या चलाख मालकाने त्याला या कल्पनेचा एक पैसाही दिला नाही!

अलबर्ट मुळे मात्र आपल्याला हँगर मिळाला!

पुढे खूप जण आले गेले ज्यांनी या हँगर ला विविध रूपं दिली, अनेक पेटंट मिळवलेत ! पण 1960 -70 च्या दशकात जे एच बॅट्स ने प्लास्टिक च्या हँगर चे पेटंट मिळवले आणि आधुनिक हंगर्स चा सिलसिला सुरू झाला !

मग काय , आता शाळेतून आल्यावर आपला ड्रेस नीट हँगर वर लटकवायला विसरायचे नाही!

पर्यावरण शिक्षक, प्रकाशक-संपादक

sonalikolarkarsonar@gmail.com

Mumbai : वांद्रे-सी लिंक ते गोरेगाव आता सुसाट; ५० मिनिटांचा प्रवास १५ मिनिटांत, उन्नत मार्ग दीड वर्षांत पूर्ण होणार

Mumbai : ठाकरे बंधूंचा आज गर्जना मोर्चा

मल्ल्याचे ८७५१ कोटी कर्ज फेडणे बाकी; SBI चे उच्च न्यायालयात स्पष्टीकरण

MPSC आंदोलनात फूट? पुण्यात तीन ठिकाणी विद्यार्थ्यांची आंदोलने, विद्यार्थ्यांमध्येही मतभेद

डेव्हिड हेडलीची साक्ष भारतासाठी ठरली 'मास्टरस्ट्रोक'; उज्ज्वल निकम यांचा गौप्यस्फोट