Pinterest (FPJ)
अक्षररंग

नैसर्गिक रंगपंचमी

निसर्ग आपल्याला भरभरून देतो. त्याचा उपयोग केला तर नवीन काहीतरी केलेल्याचा आनंद नक्की मिळेल.

नवशक्ती Web Desk

निसर्ग आपल्याला भरभरून देतो. त्याचा उपयोग केला तर नवीन काहीतरी केलेल्याचा आनंद नक्की मिळेल. दरवर्षी रंगपंचमीला आपण इको फ्रेंडली रंग बाहेरून आणतो आणि रंगपंचमी खेळतो. यंदाही रंग बाहेरून आणले असतील तर ते वापरा. पण काही रंग निसर्गात असतात. त्यांचाही उपयोग तुम्ही करू शकता.

गावात सागाची झाडं असतात. त्याची पाने चुरडली की हाताला लाल रंग लागतो. मेंदीची पाने चेचली की भगवा रंग दिसतो. गोकर्णची फुलं पाण्यात उकळवली की जांभळा रंग तयार होतो. बीट तर लाल असते. खातानाही तोंड लाल होतं. हे निसर्गाने दिलेले रंग आहेत.

विविध रंगांची फुले-पाने असतात त्यापासून तुम्ही छान फ्रेम तयार करू शकता.

या रंगपंचमीला तुम्हाला गारेगार रंगीबेरंगी बर्फाचे घरगुती रंग वापरून क्युब खायचे असतील किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शायनिंग मारायची असेल तर ही रंगीत, आंबट-गोड रेसिपी नक्की ट्राय करा.

प्रथम लिंबू सरबत बनवा. दोन लिंबू, पाच ते सहा चमचे साखर, चवीनुसार मीठ, चिमूटभर हिंग किंवा जिरे पावडर आणि मोठे दोन ग्लास पाणी. आता बिटाचे तुकडे, गोकर्ण फुलं किंवा जांभळा कोबीचे तुकडे, हळद २ चमचे यांपैकी घरात जे उपलब्ध असेल ते घ्या आणि एक कप गरम पाण्यात यातील एक किंवा दोन गोष्टी वेगवेगळ्या भांड्यात उकळून घ्या. त्या पाण्याला तो रंग येईल. दोन बर्फाचे ट्रे घ्या. दोन भांड्यात लिंबू सरबत घ्या. त्यात बीट, हळद याचं उकळवून थंड केलेलं पाण्याचे खाण्याचे चार चमचे पाणी लिंबू सरबतात टाका. आता सरबताचा रंग बदलेल. हे सरबत बर्फाच्या ट्रेमध्ये ओता. लाल-पिवळे-जांभळे बर्फाचे क्युब तयार. मित्र-मैत्रिणींबरोबर हे क्युब शेअर करा. ही तुमची रेसिपी त्यांना सांगून चकित करा. आहे की नाही मज्जा.

Navi Mumbai : सुट्टीच्या दिवशीही कर संकलन कार्यालये सुरू राहणार

Chandra Grahan 2026: वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण ३ मार्चला; आकाशात 'ब्लड मून'चा देखावा, विदर्भात सर्वाधिक वेळ दर्शन

WhatsApp युजर्सना अलर्ट! आजपासून नवे नियम लागू; Web वापरावरही परिणाम

गिग कामगारांसाठी राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळ; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची विधानसभेत माहिती

Navi Mumbai : लालफितीत अडकला DPS फ्लेमिंगो तलाव; शासन निर्णयाअभावी संवर्धन रखडले; प्रशासकीय दिरंगाईचा फटका