WhatsApp Scam Alert : एअरटेलच्या नावाने दिवाळीत २ हजार रुपयांची ऑफर! बँक खातं होऊ शकतं रिकामं; फसवणूक कशी टाळाल?

दिवाळीनिमित्त एअरटेलकडून २ हजार रुपये मिळणार असल्याचा मेसेज WhatsApp वर व्हायरल होत आहे. ही ऑफर खरी आहे का? बनावट लिंक आणि ऑनलाइन फसवणूक कशी टाळाल?
WhatsApp Scam Alert : एअरटेलच्या नावाने दिवाळीत २ हजार रुपयांची ऑफर! बँक खातं होऊ शकतं रिकामं; फसवणूक कशी टाळाल?
WhatsApp Scam Alert : एअरटेलच्या नावाने दिवाळीत २ हजार रुपयांची ऑफर! बँक खातं होऊ शकतं रिकामं; फसवणूक कशी टाळाल?
Published on: 

दिवाळी जवळ येताच अनेक कंपन्या ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स आणि सवलती जाहीर करतात. मात्र, सणासुदीच्या काळात याच ऑफर्सच्या नावाखाली सायबर भामटे लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. सध्या व्हॉट्सॲपवर एअरटेलच्या नावाने २ हजार रुपये मिळणार असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमधील लिंकवर क्लिक करून पैसे मिळवण्याचं आमिष दाखवलं जात आहे. मात्र, या संशयास्पद लिंकवर वैयक्तिक किंवा बँकेची माहिती दिल्यास आर्थिक फसवणूक होऊ शकते.

'Airtel- Diwali ka Tyohaar' नावाने मेसेज व्हायरल

'डिजिट'ने दिलेल्या वृत्तानुसार, इन्स्टाग्रामवरील @arbajahmad009 या अकाऊंटवरून या संशयास्पद मेसेजबाबत सावध करणारा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 'Airtel- Diwali ka Tyohaar' अशा नावाने हा मेसेज अनोळखी मोबाईल नंबरवरून पाठवला जात असल्याचं सांगण्यात आलं आहे.

या मेसेजमध्ये पाठवणारी व्यक्ती एका लिंकवर क्लिक करून आपल्याला २ हजार रुपये मिळाल्याचा दावा करते. तुम्हालाही हे पैसे मिळू शकतात, असं सांगून त्याच लिंकवर क्लिक करण्यास सांगितलं जातं. मोफत पैसे मिळण्याच्या आमिषामुळे अनेकजण कोणतीही खात्री न करता लिंक उघडू शकतात. मात्र, अशा लिंकवर बँकेची माहिती किंवा पासवर्ड दिल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं.

WhatsApp Scam Alert : एअरटेलच्या नावाने दिवाळीत २ हजार रुपयांची ऑफर! बँक खातं होऊ शकतं रिकामं; फसवणूक कशी टाळाल?
Cyber Fraud Alert : तुम्हालाही व्हॉट्सॲपवर लग्नपत्रिका आलीय? सावधान... APK फाइलमुळे क्षणात खातं होईल रिकामं

ओळखीच्या व्यक्तींकडूनही फसवणुकीचे मेसेज फॉरवर्ड

दरम्यान, व्हॉट्सॲपवर फिरणाऱ्या अशाच एका मेसेजबाबत वृत्त आहे. या मेसेजमध्ये 'मला वाटलं हा मेसेज खोटा आहे, पण मला खरंच २ हजार रुपये मिळाले. तुम्हीही प्रयत्न करा,' असं लिहिलेलं असतं. विशेष म्हणजे, हे मेसेज केवळ अनोळखी नंबरवरूनच नाही, तर मित्र किंवा नातेवाईकांकडूनही फॉरवर्ड केले जात आहेत. त्यामुळे ओळखीच्या व्यक्तीकडून मेसेज आला म्हणजे तो खरा आहे, असं समजू नका.

अशा मेसेजमधील लिंकवरून बनावट वेबसाइटवर नेलं जाऊ शकतं. तिथे मोबाईल नंबर, बँक खात्याची माहिती किंवा इतर वैयक्तिक तपशील मागितले जाऊ शकतात. ही माहिती चुकीच्या व्यक्तीच्या हाती गेल्यास आर्थिक फसवणूक होण्याचा धोका असतो. काही लिंकच्या माध्यमातून मोबाईलमधील माहिती चोरण्याचाही प्रयत्न केला जाऊ शकतो.

एअरटेल खरंच २ हजार रुपये देत आहे का?

व्हॉट्सॲपवर फिरणाऱ्या या ऑफरला एअरटेलकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे कंपनीच्या नावाने मेसेज आला किंवा त्यावर एअरटेलचा लोगो दिसला, तरी त्यावर लगेच विश्वास ठेवू नका. अशी कोणतीही ऑफर खरी आहे का, हे कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा ॲपवर तपासा.

WhatsApp वरील फसवणूक टाळण्यासाठी काय कराल?

१. अनोळखी लिंक उघडू नका : मोफत पैसे, भेटवस्तू किंवा बक्षीस मिळणार असल्याचे मेसेज आल्यास त्यातील लिंकवर क्लिक करू नका. ओळखीच्या व्यक्तीने पाठवलेली लिंक असली, तरी आधी खात्री करा.

२. ऑफर खरी आहे का, ते तपासा : कोणत्याही कंपनीच्या नावाने आलेल्या ऑफरची माहिती तिच्या अधिकृत वेबसाइट किंवा ॲपवरूनच घ्या.

३. बँकेची माहिती देऊ नका : संशयास्पद वेबसाइटवर बँक खाते क्रमांक, कार्डची माहिती, यूपीआय पिन, पासवर्ड किंवा ओटीपी टाकू नका.

४. मेसेज पुढे पाठवू नका : खात्री नसलेले मेसेज मित्रांना किंवा नातेवाईकांना पाठवू नका. ओळखीच्या व्यक्तीकडून असा मेसेज आल्यास त्यांनाही सावध करा.

WhatsApp Scam Alert : एअरटेलच्या नावाने दिवाळीत २ हजार रुपयांची ऑफर! बँक खातं होऊ शकतं रिकामं; फसवणूक कशी टाळाल?
Cyber Scam : व्हॉट्सॲपवर आलेल्या 'त्या' मेसेजला 'NO' रिप्लाय करताय? बँक खातं होऊ शकतं रिकामं; पोलिसांचा इशारा

५. संशयास्पद नंबर ब्लॉक करा : फसवणुकीचा मेसेज आल्यास संबंधित नंबर व्हॉट्सअॅपवर रिपोर्ट करून ब्लॉक करा.

६. फसवणूक झाल्यास तक्रार करा : चुकून लिंक उघडली असेल, तर पुढे कोणतीही माहिती भरू नका. बँकेची माहिती दिली असेल किंवा पैसे गेले असतील, तर तात्काळ बँकेशी संपर्क साधा. आर्थिक फसवणूक झाल्यास १९३० या सायबर हेल्पलाईनवर किंवा cybercrime.gov.in या वेबसाइटवर तक्रार करा.

दिवाळीच्या काळात मोफत पैसे किंवा आकर्षक भेटवस्तू देण्याचे मेसेज अनेकांना येऊ शकतात. मात्र, कोणतीही कंपनी विनाकारण पैसे वाटत असल्याच्या दाव्यावर लगेच विश्वास ठेवू नका. थोडी सावधगिरी बाळगल्यास अशा ऑनलाइन फसवणुकीपासून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवता येईल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)