अक्षररंग

वेळच्या वेळी

घरी येऊन पाहतो तर, राजाचा हुकूम आला रणभूमीवर युद्धासाठी, बोलावले होते त्याला...

नवशक्ती Web Desk

काव्यकट्टा

एकनाथ आव्हाड

एक सरदार घोड्यावर,

दूरवर फिरून आला

फिरताना त्याच्या घोड्याचा,

नाल निखळून गेला

माझ्या पुढ्यात एवढे काम,

वेळ आहे कुणाला

केव्हातरी मारू नाल,

सरदार मनात म्हणाला

घरी येऊन पाहतो तर,

राजाचा हुकूम आला

रणभूमीवर युद्धासाठी,

बोलावले होते त्याला

घोड्यावर तो स्वार होऊन,

रणभूमीवर आला

घोडा मात्र वेगाने,

आज पळेनासा झाला

नाल नाही खुराला,

घोडा हळूच चालला

सरदाराचा चाबूक,

घोड्याशी खूप बोलला

वेग मंदावला घोड्याचा,

सरदार मागे राहिला

शत्रूच्या हाती सापडून,

अखेर बंदिवान झाला

म्हणून कुठल्याही गोष्टीचा,

वेळीच विचार करावा

वेळच्या वेळी कामाचा,

सतत आग्रह धरावा

साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त लेखक

eknathavhad23@gmail.com

Mumbai : गणपती विसर्जनासाठी उद्या कुठे वाहतूक बंद? लोकल, मेट्रो आणि पार्किंगबाबतही महत्त्वाचे अपडेट

बंगळुरूतील CEO ची मोठी घोषणा; "४ राज्यांतील पुरुषांना नोकरी देणार नाही", सोशल मीडियावर चर्चेला उधाण

ठाण्यातील क्लस्टर, पुनर्विकासाला गती; १५ वर्षांत ३० लाख घरांचे लक्ष्य, सिद्धेश्वर नगरचे काम तीन वर्षांत पूर्ण करणार

IIT Bombay Student Suicide Case : साहिल वाकोडेचे वडील पोलिसांच्या ताब्यात; उपोषणासाठी IIT बॉम्बेकडे जाताना रोखले

राज्यात ४७ नवीन अतिरिक्त तहसीलदार कार्यालये