बिझनेस

रिलायन्स इंडस्ट्रीजला १८,५४० कोटी नफा

रिलायन्स इंडस्ट्रीजने २०२४-२५ च्या तिसऱ्या तिमाहीत १८,५४० कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. गेल्यावर्षी कंपनीला याच कालावधीत १७,२६५ कोटी रुपये नफा मिळाला होता.

Swapnil S

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजने २०२४-२५ च्या तिसऱ्या तिमाहीत १८,५४० कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. गेल्यावर्षी कंपनीला याच कालावधीत १७,२६५ कोटी रुपये नफा मिळाला होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात ७.३८ टक्क्यांची वाढ झाली.

ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात कंपनीचा महसूल २.४४ लाख कोटी झाला आहे. गेल्यावर्षी कंपनीला याच काळात २.२८ लाख कोटी रुपये महसूल मिळाला होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा महसूलात ७ टक्के वाढ झाली.

जिओला ६,८६१ कोटी नफा

रिलायन्स जिओला ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत ६,८६१ कोटी रुपयांचा नफा झाला. गेल्यावर्षी कंपनीला ५,४४७ कोटी रुपये नफा झाला होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात २६ टक्के अधिक वाढ झाली. तर कंपनीचा महसूल ३३,०७४ कोटी रुपये झाला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत महसूल २७,६९७ कोटी रुपये होता.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video