लग्नाच्या वाटेतील अडथळा ठरला लिव्ह-इन पार्टनर; अभिनेत्रीने प्रियकरासोबत रचला खुनाचा डाव, तब्बल १२ दिवस…

बंगळुरूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधातील गुंतागुंतीतून एका अभिनेत्रीने आपल्या प्रियकराच्या मदतीने लिव्ह-इन पार्टनरची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
लग्नाच्या वाटेतील अडथळा ठरला लिव्ह-इन पार्टनर; अभिनेत्रीने प्रियकरासोबत रचला खूनी खेळ, तब्बल १२ दिवस…
लग्नाच्या वाटेतील अडथळा ठरला लिव्ह-इन पार्टनर; अभिनेत्रीने प्रियकरासोबत रचला खूनी खेळ, तब्बल १२ दिवस…'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

बंगळुरूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधातील गुंतागुंतीतून एका अभिनेत्रीने आपल्या प्रियकराच्या मदतीने लिव्ह-इन पार्टनरची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

लिव्ह-इनमध्ये राहत असताना दुसरे संबंध

मिळालेल्या माहितीनुसार, उर्मिला उर्फ बिंदू असे आरोपी अभिनेत्रीचे नाव आहे. ती ‘बजरंगी’, ‘पोलीस क्वार्टर्स’ आणि ‘कालभैरव’ यांसारख्या चित्रपटांत झळकली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिंदू ही मोहन राव नावाच्या व्यक्तीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दोघांनी दोन महिन्यांपूर्वी बंगळुरूच्या मंजुनाथ नगर परिसरात घर भाड्याने घेतले होते. दरम्यान बिंदूचे विनय नावाच्या तरुणासोबतही संबंध होते आणि त्याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय तिने घेतल्याचे समोर आले आहे.

पार्टीतच रचला हत्येचा कट

तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बिंदू आणि विनय यांनी मिळून मोहन राव यांच्या हत्येचा कट रचला. योजनेनुसार त्यांच्या राहत्या घरात पार्टी ठेवण्यात आली. पार्टीदरम्यान दारू पिल्यानंतर मोहनवर हल्ला करण्यात आला. विनय आणि त्याचा मित्र धनुष यांनी चाकूने वार केल्याचे सांगितले जाते. मोहन मदतीसाठी ओरडू लागल्यावर बिंदूने त्यांच्या तोंडावर आणि नाकावर टेप लावून हातपाय बांधल्याची माहिती पोलिसांनी दिली. गंभीर जखमा आणि गुदमरल्यामुळे मोहन राव यांचा मृत्यू झाला.

लग्नाच्या वाटेतील अडथळा ठरला लिव्ह-इन पार्टनर; अभिनेत्रीने प्रियकरासोबत रचला खूनी खेळ, तब्बल १२ दिवस…
मातृत्वाला काळिमा! रडणाऱ्या तान्ह्या बाळाच्या तोंडात कोंबला कापडाचा बोळा अन् जिवंत जाळलं

१२ दिवसांनी उघड झाला प्रकार

घटनेनंतर आरोपी तिथून पसार झाले. दरम्यान जवळपास १२ दिवस घर बंदच राहिले. काही दिवसांनी घरातून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी घरमालक नटराज यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी घर उघडून पाहिले असता मोहन राव यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला.

तिघांना अटक, पुढील तपास सुरू

या प्रकरणी पोलिसांनी अभिनेत्री उर्मिला उर्फ बिंदू, तिचा प्रियकर विनय आणि त्याचा मित्र धनुष अशा तिघांना अटक केली आहे. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in