बिझनेस

बँकांनी व्याजदर परवडणारे करणे आवश्यक - अर्थमंत्री सीतारामन यांचे आवाहन

काही लोकांसाठी बँकांचे व्याजदर खूप जास्त आहेत आणि ते परवडणारे बनवण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी म्हटले आहे. विशेष म्हणजे दोन दिवासंपूर्वीच उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी एका कार्यक्रमात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना व्याजदर कमी करण्याची मागणी केली होती.

Swapnil S

मुंबई : काही लोकांसाठी बँकांचे व्याजदर खूप जास्त आहेत आणि ते परवडणारे बनवण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी म्हटले आहे. विशेष म्हणजे दोन दिवासंपूर्वीच उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी एका कार्यक्रमात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना व्याजदर कमी करण्याची मागणी केली होती. त्यावेळी दास यांनी यासंदर्भात पतधोरण समितीच्या आगामी बैठकीत चर्चा केली जाईल, असे सांगितले होते. मात्र, आता अर्थमंत्री सीतारामन यांनीच व्याजदर परवडणारे असावेत, असे म्हटल्याने आगामी पतधोरण समितीच्या बैठकीत व्याजदर कमी केले जातील का? याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.

अर्थव्यवस्था मंदावण्याची चिंता व्यक्त केली जात असताना अर्थमंत्र्यांनी आश्वासन दिले की, सरकारला देशांतर्गत आणि जागतिक आव्हानांची पूर्ण जाणीव आहे आणि अनावश्यक चिंता करण्याची गरज नाही.

जेव्हा तुम्ही भारताच्या वाढीच्या गरजा पाहता तेव्हा महत्त्वाचे असते की, तुमच्याकडे बरेच वेगवेगळे ‘आवाज’ येऊ शकतात. कारण कर्जाचे व्याजदर खूप जास्त असल्याने ताण देणारे बाब आहे. त्यामुळे जेव्हा आम्हाला व्यवसाय, उद्योग वाढवायचे आहेत आणि क्षमता वाढवण्याची इच्छा आहे, तेव्हा बँकांचे व्याजदर अधिक परवडणारे असावेत, असे सीतारामन म्हणाल्या.

एसबीआयने आयोजित केलेल्या वार्षिक व्यवसाय आणि आर्थिक संमेलनात अर्थमंत्री सीतारामन यांनी बँकांना कर्ज देण्याच्या त्यांच्या मुख्य कार्यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. तसेच विमा उत्पादनांचे ‘मिससेलिंग’ देखील अप्रत्यक्षपणे एखाद्या संस्थेसाठी कर्ज घेण्याच्या खर्चात भर घालते.

एसबीआय शाखेच्या स्मरणार्थ १०० रुपयांच्या नाण्याचे अनावरण

सीतारामन यांच्या हस्ते एसबीआय शाखेच्या स्मरणार्थ १०० रुपयांच्या नाण्याचे अनावरण केले. कार्यक्रमात बँकेच्या १९८१ ते १९९६ कालावधीतल्या इतिहासाचे दस्तावेजीकरण करणाऱ्या खंडाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच कार्यक्रमात बँकेच्या १९८१ ते १९९६ कालावधीतल्या इतिहासाचे दस्तावेजीकरण करणाऱ्या खंडाचे प्रकाशन करण्यात आले. सीतारामन म्हणाल्या की, २०१४ पासून सुरू झालेली एसबीआयची अनोखी प्रगती दाखवणारे समान दस्तावेज तयार केले जाईल, ज्यामध्ये देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा समावेश असेल. एसबीआयच्या देशभरात ४३ शाखा आहेत, ज्या १०० वर्षांहून जुन्या आहेत.

एसबीआय ५०० नवीन शाखा उघडणार

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी सांगितले की, एसबीआय ५०० नवीन शाखा उघडणार असून आर्थिक वर्ष २०२५ च्या अखेरीस त्याचे एकूण जाळे २३,००० होईल.

मुंबईतील एसबीआयच्या मुख्य शाखेच्या १००व्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना सीतारामन यांनी आठवण करून दिली की, १९२१ साली तीन प्रेसिडेन्सी बँकांचे विलनीकरण होऊन इम्पीरियल बँक ऑफ इंडिया (आयबीआय) तयार झाल्यानंतर बँकेचा आकार लक्षणीयरीत्या वाढला आहे. १९५५ साली सरकारने संसदेत एक विधेयक मंजूर करून एसबीआयची स्थापना केली, जी पूर्वी आयबीआय म्हणून ओळखली जात होती. १९२१ मध्ये असलेल्या २५० शाखांचे जाळे आता २२,५०० शाखांपर्यंत पोहोचले आहे, असे त्या म्हणाल्या.

आज एसबीआय २२,५०० शाखांपर्यंत वाढली आहे आणि वित्त वर्ष २०२५ मध्ये आणखी ५०० शाखा उघडल्या जातील. त्यामुळे एकूण २३,००० शाखा असतील, असे सीतारामन म्हणाल्या. एसबीआयच्या या वाढीला जागतिक विक्रम मानले जावे, विशेषतः भारतातील आर्थिक विषमता लक्षात घेता, असे त्या म्हणाल्या. त्यांनी सांगितले की, एसबीआयचा देशातील एकूण ठेवींमध्ये २२.४ टक्के वाटा असून, जवळपास पाचव्या भागाइतका मोठा हिस्सा आहे. एसबीआय ५० कोटींहून अधिक ग्राहकांना सेवा देते.

सीतारामन म्हणाल्या की, बँकेच्या डिजिटल गुंतवणुका भक्कम आहेत आणि बँक दररोज २० कोटी यूपीआय व्यवहार हाताळण्यास सक्षम आहे. १९२१ मध्ये तीन प्रेसिडेन्सी बँकांच्या विलनीकरणाच्या उद्दिष्टांपासून आजपर्यंतची ही प्रगती लक्षणीय आहे, असे त्या म्हणाल्या. त्या काळातील मुख्य उद्दिष्ट बँकिंग सेवा जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे होते. मुंबईतील मुख्य शाखा वारसा वास्तूमध्ये असून, ती १९२४ मध्ये उद्घाटन करण्यात आली होती. सध्या ही शाखा देशातील एकूण ठेवींपैकी जवळपास चतुर्थांश ठेवी हाताळते.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या

(एसबीआय हॉर्निमन शाखा) मुख्य शाखेच्या शताब्दी सोहळ्यात १०० रुपयांच्या नाण्याचे अनावरण सोमवारी मुंबईत एनसीपीए येथील कार्यक्रमात करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, एसबीआयचे अध्यक्ष सी. एस. सेट्टी आणि इतर अधिकारी.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी