अमेरिकेत गेल्या वर्षभरापासून चिनी शॉर्ट व्हिडिओ मेकिंग ॲप 'TikTok' च्या संभाव्य बॅन विषयी चर्चा रंगल्या आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव बायडेन सरकारने TikTok बॅन संदर्भात पावले उचलली. अमेरिकेत येत्या रविवारी TikTok बॅन होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. अशातच TikTok ने आपल्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) खात्यावर केलेली पोस्ट व्हायरल होत आहे. पाहा TikTok ने आपल्या पोस्टमध्ये काय म्हटले आहे.
स्पष्टता आणि आश्वासन नसल्यामुळे TikTok बंद होईल
TikTok ने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, बिडेन व्हाईट हाऊस आणि न्याय विभाग दोघांनीही जारी केलेल्या विधानांमधून आम्हाला स्पष्टता आणि आश्वासन मिळालेले नाही. अमेरिकेतील 170 मिलिअन वापरकर्त्यांना TikTok ची सेवा पुरवण्यासाठी ही स्पष्टता आणि आश्वासन मिळणे आवश्यक आहे.
यासंदर्भात बायडेन प्रशासनाकडून आम्हाला (कायद्याची) तातडीच्या प्रभावाने अंमलबजावणी न करण्याबाबत समाधानकारक स्पष्टता मिळाली नाही तर दुर्दैवाने रविवारपासून (दि.19) आम्हाला अमेरिकन वापरकर्त्यांसाठी आमची सेवा थांबविण्यास भाग पाडले जाईल.
गुगल-ॲपलकडून TikTok प्ले स्टोअरमधून रिमूव्ह करण्याची अपेक्षा
TikTok वर बंदी आल्यानंतर गुगल आणि ॲपल कंपन्यांकडून प्ले स्टोअरमधून TikTok ॲप काढून टाकण्याची अपेक्षा तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. तसे न केल्यास TikTok उपलब्ध केल्याबद्दल त्यांना कायदेशीररित्या दंड ठोठावला जाऊ शकतो. रविवारी TikTok बंद झाल्यानंतर नवीन वापरकर्ते ते ॲप स्टोअरमधून डाऊनलोड करू शकणार नाही. मात्र, ज्यांच्याकडे हे ॲप सुरुवातीपासूनच डाऊनलोड केलेले आहे. ते नवीन अपडेटशिवाय जोपर्यंत TikTok पूर्णपणे कार्यकरणे बंद करत नाही तो पर्यंत त्याचा वापर करू शकतात.