बिझनेस

भारत-ब्रिटनदरम्यान मुक्त व्यापार करारावर २४ जुलैला स्वाक्षऱ्या

भारत-ब्रिटन दरम्यान मुक्त व्यापार करारावर २४ जुलैला स्वाक्षऱ्या होणार आहेत. या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यापार मंत्री पियूष गोयल हे जाणार आहेत. दोन्ही देशांनी ६ मे रोजी व्यापार कराराची घोषणा केली होती.

Swapnil S

नवी दिल्ली : भारत-ब्रिटन दरम्यान मुक्त व्यापार करारावर २४ जुलैला स्वाक्षऱ्या होणार आहेत. या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यापार मंत्री पियूष गोयल हे जाणार आहेत. दोन्ही देशांनी ६ मे रोजी व्यापार कराराची घोषणा केली होती.

या करारात चामडे, बूट, कपडे आदींवर निर्यातीवरील कर हटवण्यात येणार आहे. तर ब्रिटनमधून व्हिस्की, कार आदी स्वस्त करण्याचा प्रस्ताव आहे. २०३० पर्यंत दोन्ही देशातील व्यापार १२० अब्ज डॉलरपर्यंत पोहचणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारपासून ब्रिटन व मालदीवच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण आदी क्षेत्रातील द्विपक्षीय संबंधित मजबूत करणे आहे.

या दौऱ्यात पंतप्रधानांसोबत व्यापार मंत्री असतील. मुक्त व्यापार करार झाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी भारताच्या मंत्रिमंडळ बैठकीत व ब्रिटनच्या संसदेत मंजुरी आवश्यक असेल. या करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर या कराराची अंमलबजावणी व्हायला एक वर्ष लागेल.

मुंबईकरांसाठी आनंद वार्ता! वर्षअखेर ५० किमी मेट्रो मार्ग येणार सेवेत; MMRDA चे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांची माहिती

IND Vs ENG: भारतापुढे बरोबरी साधण्याचे आव्हान! आजपासून इंग्लंडविरुद्ध चौथी कसोटी, योग्य संघनिवडीचा गिल-गंभीरसमोर पेच

येऊर परिसरात गटारीला ‘नो एन्ट्री’; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

सोने पुन्हा १ लाखांवर; चांदीचा भाव ३,००० रुपयांनी वाढला

‘मिग-२१’ लढाऊ विमान निवृत्त होणार; ‘उडती शवपेटी’ म्हणून ओळख, १९ सप्टेंबरला एक ‘अध्याय’ संपणार