अमेरिकेसोबत ८ जुलैपर्यंत अंतरिम व्यापार कराराची शक्यता, संग्रहित छायाचित्र  X @ANI
बिझनेस

अमेरिकेसोबत ८ जुलैपर्यंत अंतरिम व्यापार कराराची शक्यता

भारत आणि अमेरिका यांच्यात ८ जुलैपूर्वी अंतरिम व्यापार करारावर सहमत होण्याची शक्यता आहे

Swapnil S

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका यांच्यात ८ जुलैपूर्वी अंतरिम व्यापार करारावर सहमत होण्याची शक्यता आहे आणि नवी दिल्ली देशांतर्गत वस्तूंवरील २६ टक्के परस्पर कर आकारणीतून पूर्ण सवलत देण्याचा आग्रह धरत आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

अमेरिकेने २ एप्रिल रोजी भारतीय वस्तूंवर अतिरिक्त २६ टक्के परस्पर कर लादला होता परंतु तो ९ जुलैपर्यंत ९० दिवसांसाठी स्थगित केला होता. तथापि, अमेरिकेने लादलेला १० टक्के मूळ कर कायम आहे.

सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, भारताच्या संवेदनशील क्षेत्रांचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नात काही ‘कोटा’ किंवा किमान आयात किंमत (एमआयपी) लागू होऊ शकते. अशा क्षेत्रांमध्ये कृषी वस्तू आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहे.

वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल व्यापार चर्चेला चालना देण्यासाठी या आठवड्याच्या सुरुवातीला वॉशिंग्टनमध्ये होते. त्यांनी यूएस व्यापार प्रतिनिधी (यूएसटीआर) जेमिसन ग्रीर आणि यूएस वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांची भेट घेतली. ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये, गोयल म्हणाले की त्यांनी भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्याला गती देण्यासाठी अमेरिकेच्या वाणिज्य सचिवांशी उत्तम चर्चा केली.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती