नवी दिल्ली : मार्च २०२७ पर्यंतच्या पुढील तीन आर्थिक वर्षांमध्ये भारताचा जीडीपी वृद्धी दर ६.५-७ टक्क्यांच्या दरम्यान वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. पायाभूत सुविधांवर खर्च आणि खाजगी वापर वाढीची गती पाहता एस ॲण्ड पी ग्लोबल रेटिंग्सने गुरुवारी अंदाज व्यक्त केला.
आपल्या ‘जागतिक बँक आऊटलूक अहवालात एस ॲण्ड पी ने म्हटले आहे की, चांगल्या आर्थिक वाढीच्या शक्यतेने बँकांच्या मालमत्तेच्या गुणवत्तेचा मदत होईल तर उत्तम कॉर्पोरेट ताळेबंद, कडक मानके आणि सुधारित जोखीम व्यवस्थापन पद्धती मालमत्तेची गुणवत्ता आणखी स्थिर करतील. संरचनात्मक सुधारणा आणि चांगल्या आर्थिक शक्यता भारताच्या वित्तीय संस्थांच्या लवचिकतेस समर्थन देतील, असे या अहवालात म्हटले आहे.
भारताचा पायाभूत सुविधा खर्च आणि खासगी ग्राहकोपयोगी वस्तुंच्या विक्रीत मजबूत वाढ आर्थिक वाढीस समर्थन देतील. त्यामुळे आम्ही अंदाज वर्तवला आहे की, भारताचा जीडीपी २०२५-२०२७ (३१ मार्च रोजी समाप्त होणारे वर्ष) मध्ये वार्षिक ६.५ -७.० टक्के वाढेल. भारताच्या चांगल्या आर्थिक विकासाच्या शक्यता बँकांच्या मालमत्तेच्या गुणवत्तेला समर्थन देत राहतील, असे एस ॲण्ड पी म्हणाले.
चालू आर्थिक वर्षासाठी रिझर्व्ह बँकेने जीडीपी वाढीचा अंदाज ७.२ टक्के कायम ठेवला आहे, जो २०२३-२४ मधील ८.२ टक्क्यांपेक्षा कमी आहे. मजबूत बँक भांडवलीकरणासह उच्च मागणी बँक कर्जाच्या वाढीला चालना देईल परंतु ठेव वाढ कमी होईल.
आमचा अंदाज आहे की, बँकिंग क्षेत्राची कर्जे ३१ मार्च २०२५ पर्यंत एकूण कर्जाच्या ३.५ टक्क्यांवरून ३ टक्क्यांपर्यंत घसरतील. यापूर्वी, ३१ मार्च २०२४ पर्यंत कर्ज वितरण ३.५ टक्के होतील, असा अंदाज व्यक्त केला होता. हे पाहता उत्तम कॉर्पोरेट ताळेबंदाला काही प्रमाणात फटका बसू शकतो. मात्र, कडक मानके आणि सुधारित जोखीम-व्यवस्थापन पद्धतीचा लाभ होऊ शकतो, असे या अहवालात म्हटले आहे.
अनुत्पादित कर्जांमध्ये वाढीचा अंदाज
भारतातील किरकोळ कर्जासाठी मानके उत्तम आहेत. या कर्जांचे व्यवस्थापन करणे शक्य आहे. तथापि, असुरक्षित वैयक्तिक कर्जे झपाट्याने वाढली आहेत आणि वाढीव अनुत्पादित कर्जांमध्ये वाढ होऊ शकते, असेही त्यात नमूद केले आहे.
पत आणि ठेवी गुणोत्तर कमकुवत होईल
एस ॲण्ड पी ने सांगितले की कॉर्पोरेट कर्ज घेण्यास वेग आला आहे, परंतु अनिश्चित बाह्य परिस्थितीमुळे भांडवली खर्चाशी संबंधित वाढीस विलंब होऊ शकतो. ठेवींना गती ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो. त्यामुळे पत आणि ठेवी गुणोत्तर कमकुवत होईल. असे असले तरी बँकांचे एकंदर कर्ज वाटपाचा आकडा चांगला राहील.