१२ लाखांत बनवली Lamborghini Lamborghini
बिझनेस

वाह रे पठ्ठ्या! फक्त १२ लाखांत बनवली Lamborghini; नेमकं काय केलं जुगाड? जाणून घ्या

एका युवकानं केवळ १२ लाख रुपये खर्च करून लॅम्बोर्गिनी कार बनवली आहे. जुगाडातून बनवलेल्या या लॅम्बोर्गिनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Suraj Sakunde

मुंबई: जुगाड करण्यात भारतीयांचा कुणी नादच करायचा नाही . कोण उठेल आणि काय करेल याचा नेम नाही. म्हणजे जुगाड करायला जे काही कौशल्य लागतं, ते काही लोकांमध्ये अगदी ठासून ठासून भरलेलं असतं. त्यामुळंच तर तुम्हाला सोशल मीडियावर देसी जुगाडाचे असंख्य व्हिडिओ पाहायला मिळतील. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय.

१२ लाखांत बनवली Lamborghini-

एका युवकानं केवळ १२ लाख रुपये खर्च करून लॅम्बोर्गिनी कार बनवली आहे. हो...तुम्ही बरोबर वाचलं...जुगाडातून बनवलेल्या या लॅम्बोर्गिनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. तन्ना धवल नावाच्या युट्यूबरने त्याच्या होण्डा सिविकला (Honda Civic) फ्यूचरिस्टिक Lamborghini Terzo Millennio कॉन्सेप्ट कारमध्ये रूपांतरित केले. विशेष म्हणजे मूळ कारची किंमत करोडो रूपये असताना या केवळ १२.५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

भारतीय यूट्यूबर तन्ना धवलने अपलोड केला व्हिडिओ-

भारतीय यूट्यूबर तन्ना धवलने त्याच्या यूट्यूबवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये होंडा सिविक फ्युचरिस्टीक लॅम्बोर्गिनी टेर्झो मिलेनियोमध्ये बदलताना दाखवली आहे. मॉडिफाय करतानाची संपूर्ण प्रक्रिया त्यांनी व्हिडिओमध्ये स्पष्ट केली आहे.

तन्ना धवलचे हे कार्य केवळ भारतातच नाही तर जगभरातील लोकांना प्रेरणा देत आहे. हे मॉडिफिकेशन पाहून सर्वानाच आश्चर्य वाटलं आहे. कारण हा जुगाडआधुनिक नवनिर्मितीचा एक उत्तम नमुना आहे.

कमी बजेटमध्ये अप्रतिम मॉफिफिकेशन-

एकीकडे तन्ना यानं आपली कल्पनाशक्ती आणि कौशल्य वापरून एक अप्रतिम मॉडिफिकेशन घडवले आहे. यासोबतच तुमच्याकडे डोकं असेल, तर कमी बजेटमध्येही खूप काही गोष्टी साध्य करता येऊ शकतात, हेही त्यांनी सिद्ध केलं आहे.

तन्ना धवल यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची कार हे नियोजन 2008 मॉडेल होंडा सिविक 1.8 कार खरेदी करून सुरू झाली. त्यांने सिविकचे इंजिन आणि काही भाग वापरले. इतर आवश्यक वस्तू गोळा करून प्रोजेक्ट पूर्ण केला.

एक वर्षाहून अधिक काळ मेहनत केल्यानंतर धवलने होंडा सिविक सारख्या सेडानला आकर्षक पिवळ्या इटालियन लक्झरी कारसारखे बनवले. असं असलं तरी या कारमध्ये खऱ्या लॅम्बोर्गिनीसारखा उच्च वेग आणि फीचर्स नाहीत.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?