अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे संग्रहित छायाचित्र 
बिझनेस

सीतारामन इतिहास रचणार! सलग ७वा अर्थसंकल्प उद्या मांडणार: आज आर्थिक पाहणी अहवाल सादर करणार

अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी आर्थिक २०२४-२५ साठी सलग सातवा अर्थसंकल्प सादर करताना माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा विक्रम मागे टाकत इतिहास रचणार आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी आर्थिक २०२४-२५ साठी सलग सातवा अर्थसंकल्प सादर करताना माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा विक्रम मागे टाकत इतिहास रचणार आहेत.

सीतारामन या पुढील महिन्यात ६५ वर्षांच्या होतील तर २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर भारताची पहिली पूर्ण-वेळ महिला अर्थमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून, सीतारामन यांनी या वर्षी फेब्रुवारीमध्ये अंतरिम अर्थसंकल्पासह सलग सहावेळा अर्थसंकल्प सादर केले आहेत.

मोरारजी देसाई यांचा विक्रम मोडणार

अर्थमंत्री म्हणून २०२४-२५ आर्थिक वर्षासाठी (एप्रिल २०२४- ते मार्च २०२५) पूर्ण अर्थसंकल्प हा त्या सादर करणारा त्यांचा सलग सातवा अर्थसंकल्प असेल. तर यापूर्वी १९५९ ते १९६४ या कालावधीत सलग पाच पूर्ण अर्थसंकल्प आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर करणाऱ्या मोरारजी देसाई यांचा विक्रम त्या मोडतील आणि सीतारामन ह्या नवा विक्रम करून इतिहास रचतील.

दरम्यान, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प २६ नोव्हेंबर १९४७ रोजी देशाचे पहिले अर्थमंत्री आर. के. षण्मुखम चेट्टी यांनी सादर केला. तर माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावावर सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम आहे. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि नंतर पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून त्यांनी एकूण १० अर्थसंकल्प सादर केले आहेत. तर माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी नऊ वेळा अर्थसंकल्प सादर केला. पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त आघाडी सरकारच्या काळात त्यांनी १९ मार्च १९९६ रोजी पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर केला. प्रणव मुखर्जी यांनी अर्थमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात आठ अर्थसंकल्प सादर केले. तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पी. व्ही. नरसिंह राव सरकारमध्ये अर्थमंत्री असताना सलग पाच अर्थसंकल्प सादर केले.

या वर्षी दोन अर्थसंकल्प

या वर्षी दोन अर्थसंकल्प सादर केले जात आहेत. एक फेब्रुवारीमध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला आणि या महिन्यात पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जात आहे. कारण सत्ताधारी सरकार सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी पूर्ण अर्थसंकल्प सादर करू शकत नाही. गेल्या महिन्यात लोकसभा निवडणुकीत पुन्हा निवडून आल्यानंतर २३ जुलै रोजी सादर होणारे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचे पहिले अर्थसंकल्प असेल.

आज (सोमवारी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२४-२५ चा आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर करणार आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. मोदी सरकार तिसऱ्यांदा स्थापन झाल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प असेल. त्यामुळे या अर्थसंकल्पातून जनतेला काय मिळणार, याकडे सर्वांची उत्सुकता लागून राहिली आहे. हे पावसाळी अधिवेशन १२ ऑगस्टपर्यंत चालणार असून त्यात १९ सत्रे आयोजित केली आहेत. या अधिवेशनात सहा विधेयके मांडली जाण्याची शक्यता आहे.

सीतारामन यांचा अर्थसंकल्पीय भाषणाचा विक्रम

सीतारामन यांनी १ फेब्रुवारी२०२० रोजी सादरीकरण दोन तास ४० मिनिटे चालले तेव्हा सर्वात लांब अर्थसंकल्पीय भाषणाचा विक्रम केला. त्यावेळी, त्यांनी आपले भाषण अजून दोन पाने शिल्लक ठेवून लहान केले.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले