बिझनेस

शाहरूख बनला करदाता ‘बादशाह’, क्रिकेटपटूंमध्ये कोहलीच 'किंग'!

बॉलिवूड किंग अभिनेता शाहरूख खान याने वर्ष २०२४ साठी तब्बल ९२ कोटी रुपये आयकर भरला आहे.

Swapnil S

मुंबई : बॉलिवूड किंग अभिनेता शाहरूख खान याने वर्ष २०२४ साठी तब्बल ९२ कोटी रुपये आयकर भरला आहे. बॉलिवूडमध्ये सर्वाधिक टॅक्स भरणारा शाहरूख नंबर १चा अभिनेता बनला आहे तर त्याच्या पाठोपाठ क्रिकेटर विराट कोहली याने सर्वाधिक ६६ कोटी रुपये इतका आयकर भरून आयकर भरणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे.

सर्वाधिक आयकर भरून अभिनेता शाहरूख खाने बॉलिवूडच्या टॉम क्रूझ यालाही पिछाडीवर टाकले आहे. शाहरूख खान याची एकूण मालमत्ता ७,३०० कोटी रुपये असून त्याने आयकरापोटी ९२ कोटी रुपये विभागाकडे जमा केले आहेत़ शाहरूखच्या पाठोपाठ तमिळ सुपरस्टार थलापती याचा क्रमांक लागतो. त्याने एकूण ८० कोटी रुपयांचा आयकर भरला आहे़ थलापतीची एकूण मालमत्ता ८०० कोटी रुपये इतकी आहे़ बॉलिवूडच्या टॉपच्या ५ आयकरदत्यांमध्ये सलमान खान आणि महानायक अमिताभ बच्चन यांचाही समावेश आहे.

क्रिकेटपटूंमध्ये विराट कोहली नंतर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने ३८ कोटी रुपये इतका आयकर भरला आहे. फॉर्च्यून इंडियाने सर्वाधिक आयकर भरणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींची यादी नुकतीच जाहीर केली. त्या यादीतील या सेलिब्रिटींनी कोट्यवधींचा कर भरला आहे.

टाॅपचे करदाते!

  • शाहरूख खान ९२ कोटी, मालमत्ता ७३०० कोटी

  • थलापती ८० कोटी, मालमत्ता ८०० कोटी.

  • सलमान खान ७५ कोटी, मालमत्ता २९०० कोटी

  • अमिताभ बच्चन ७१ कोटी, मालमत्ता १६०० कोटी

  • विराट कोहली ६६ कोटी, मालमत्ता १००० कोटी

  • अजय देवगन ४२ कोटी, मालमत्ता ५४० कोटी

  • महेंद्रसिंग धोनी ३८ कोटी, मालमत्ता १०४० कोटी

राज्यातील २६५ तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

'लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी एकत्र या'; SIR विरोधात ४ ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

सोनं-दागिने दाखवत बनवायची Reel; चोरट्यांनी VIDEO पाहून साधली संधी, घरातून १ कोटींचा ऐवज लंपास

यवतमाळमध्ये वेल्डिंग करताना भीषण स्फोट; दोघांचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर जखमी, Video

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक; खिडक्यांच्या काचा फुटल्या, Video व्हायरल