६१ व्या वर्षी आमिर खानने थाटला तिसरा संसार; गौरी स्प्रॅटसोबतच्या रजिस्टर मॅरेजचे Photo समोर 
मनोरंजन

६१ व्या वर्षी आमिर खानने थाटला तिसरा संसार; गौरी स्प्रॅटसोबतच्या रजिस्टर मॅरेजचे Photo समोर

Aamir Khan Wedding: बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांनी मुंबईतील वांद्रे येथील निवासस्थानी कुटुंबीयांच्या उपस्थितीत रजिस्टर मॅरेज केले. लग्नानंतरचे फोटो समोर आले असून सोशल मीडियावर त्यांची जोरदार चर्चा रंगली आहे.

Mayuri Gawade

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि गौरी स्प्रॅट अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. रविवारी (५ जुलै) मुंबईतील वांद्रे येथील आमिरच्या निवासस्थानी कुटुंबीय आणि मोजक्या जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत दोघांनी नोंदणीकृत विवाह (रजिस्टर मॅरेज) केला. विवाहानंतरचे त्यांचे पहिले फोटोही समोर आले असून ते सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे.

वांद्रेतील निवासस्थानी नोंदणीकृत विवाह

'इंडिया टुडे'च्या वृत्तानुसार, आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांनी दुपारी सुमारे १२.४५ वाजता विवाह नोंदणीच्या कागदपत्रांवर सह्या केल्या. हा सोहळा अत्यंत खासगी ठेवण्यात आला होता. विवाहासाठी केवळ कुटुंबीय आणि निवडक जवळच्या व्यक्तींनाच आमंत्रित करण्यात आले होते.

समोर आला लग्नाचा पहिला फोटो

समोर आलेल्या छायाचित्रात आमिर खान विवाह नोंदणीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना दिसत आहे, तर त्याच्या शेजारी आयव्हरी रंगाच्या पारंपरिक पोशाखात गौरी स्प्रॅट बसलेली आहे. दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसून येत आहे.

या सोहळ्याला आमिरचा किरण रावसोबतचा मुलगा आझाद राव खान, आमिरची आई झीनत हुसेन, मुलगी आयरा खान, मुलगा जुनैद खान, जावई नुपूर शिखरे, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, उद्योगपती अंबानी कुटुंबातील सदस्य, अभिनेत्री एली अवराम, माजी क्रिकेटपटू इरफान पठाण तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह काही निवडक पाहुण्यांची उपस्थिती होती.

यावर्षीच नात्याची केली होती कबुली

यावर्षी मार्च महिन्यात आपल्या ६० व्या वाढदिवसानिमित्त आमिर खानने प्रथमच गौरी स्प्रॅटची माध्यमांशी ओळख करून देत त्यांच्या नात्याची अधिकृत कबुली दिली होती. त्यानंतर गौरी अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आमिरसोबत दिसली होती.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार ६,९०८ रुपयांचा बोनस

Kolkata Stampede : कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत

FSSAI चा नेस्ले इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हरला दणका; दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमुळे नोटीस

दांडिया खेळताना अचानक कोसळला लाइटचा स्टँड; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू, हादरवणारा VIDEO

दसऱ्याला दारात लावा झेंडू-आंब्याच्या पानांचं खास तोरण; पाहा ७ सुंदर, हटके आणि बजेट-फ्रेंडली डिझाईन्स