मनोरंजन

जय श्री राम! अजय-अतुल यांचं भक्तीरसपूर्ण गाणं आलं समोर

'आदिपुरुष' चित्रपटातील नव्या गाण्याचं थाटात लॅांच

निलीमा कुलकर्णी

ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' हा चित्रपट येत्या १६ जूनला प्रदर्शित होत आहे. प्रभास आणि कृती सनोन यांचा हा चित्रपट प्रभू रामचंद्र यांच्या पराक्रमाची कहाणी मोठ्या पडद्यावर थ्रीडी रुपात मांडणार आहे.

या चित्रपटातील 'जय श्री राम' हे गाणं सध्या लोकप्रिय झालं आहे. याच गाण्याचं संपूर्ण व्हिडिओ व्हर्जन आज पत्रकारांना दाखवण्यात आलं. यावेळी चित्रपटाचे संगीतकार अजय-अतुल आणि अभिनेता देवदत्त नागे, दिग्दर्शक ओम राऊत हजर होते.

हे गाणं जगभरात गाजतंय आणि जगातून वेगवेगळ्या ठिकाणाहून रामभक्तांचे मेसेज येत आहेत, ते पाहून मी अक्षरशः भारावून गेलोआहे. या भावना मी कोणत्या शब्दांत मांडू हे मला कळत नाहीए ", असं म्हणत ओम राऊत भावूक झाला. 

"गाणी खूप येतात पण असं गाणं मिळायला भाग्य लागतं, हे गाणं आम्ही केलं नसून प्रभू श्रीरामचंद्रांनीच जणू हे गाणं आमच्याकडूनकरवून घेतलंय, कारण अशा प्रकारची भक्तीरसात ओथंबलेली आणि अंगावर शहारा आणणारी गाणी ही रोज होत नसतात, ती क्वचितच होतात " असं म्हणाले संगीतकार अतुल गोगावले. 

या गाण्याचा शानदार लाईव्ह परफॅार्मन्स यावेळी ढोलताशांसह सादर करण्यात आला. जय श्री राम या जयघोषात अवघं थिएटर निनादून गेलं.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत